मित्रांनो, आपल्या देशात एवढ्या भाज्या खाल्ल्या जातात. आपल्या स्वयंपाकाच्या समृद्ध परंपरेमुळे विविध प्रकारच्या भाज्या खायला मिळतात आणि अशा भाज्यांचे बरेच आरोग्य फायदे मिळतात. त्यातलीच एक फळभाजी आणि पालेभाजी म्हणजे शेवगा. शेवग्याचं झाड पूर्वी प्रत्येक अंगणात असे कारण शेवगा खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीरआहे हे पूर्वीच्या लोकांनी ओळखलं होतं आणि मित्रांनो थंडीच्या दिवसांमध्ये खासकरुन अनेक जणांच्या घरी शेवग्याच्या शेंगाची भाजी केली जाते. लांब काठीसारख्या दिसणाऱ्या या हिरव्यागार शेंगा अनेकदा सांबारमध्ये दिसून येतात.
मित्रांनो दुधापेक्षा चार पट जास्त कॅल्शियम शेवग्यामध्ये आहे. दुधापेक्षा चार पट जास्त प्रथिने असतात. केवळ शेवग्याच्या शेंगाच नव्हे तर शेवग्याची पाने, शेवग्याची फुले, शेवग्याच्या बिया, शेवग्याची साल मुळे सुद्धा आयुर्वेदिक औषधिय तत्त्वांनी भरपूर आहेत.
मित्रांनो असे म्हणतात की, शेवग्याची भाजी खाल्ल्याने, शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने आपल्या पोटामध्ये जंत होत नाहीत. पोट दुखत असेल तर ही शेवग्याची भाजी खा. त्यामुळे पोटातील कृमी नष्ट होतात आणि भविष्यातही अशाप्रकारे पोटात कृमी निर्माण होत नाहीत.
ज्या लोकांना अंगी लागत नाही. काहीही खाल्लं कितीही खाल्लं तरी फायदा होत नाही. अशा लोकांनी सुद्धा त्यांच्या आहारामध्ये शेवग्याचा नक्की वापर करावा. कारण त्यामुळे कुपोषणापासून मुक्तता होते. असे अनेक फायदे आहेत. जवळजवळ 108 पेक्षा जास्त रोग जास्त आजार बरे होऊ शकतात.
जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर लक्षात घ्या शेवग्याच्या शेंगा नक्की खात रहा. शेवग्याच्या शेंगाच्या बिया असतात त्यात बी कॉम्प्लेक्सचा साठा भरपूर आहे त्यामुळे आपलं पचन सुधारतं. अपचनाचा त्रास त्यामुळे दूर होतो. शेवग्याच्या शेंगा उष्ण आहेत आणि म्हणून त्यांचे सेवन प्रमाणात करावं.
मित्रांनो याच्या अति सर्वत्र वर्जयेत म्हणजेच कोणतीही गोष्ट अति प्रमाणात आपण करू नये. शेवगा उष्ण असला तरीसुद्धा अनेक प्रकारचे कफविकार, वात विकार यांमुळे बरे होतात. मित्रांनो लोकांना घशामध्ये खवखव होते श्वास घेताना त्रास होतो. कफ आहे. क्षयरोग आहे, अस्थमा आहे तर अशा लोकांनी या शेंगा नक्की खाव्या.
कारण या शेंगांमध्ये असे काही गुणधर्म आहेत की ते आपल्या श्वसनमार्गातील विषारी घटकांना कमी करतात आणि परिणामी घशामध्ये होणारी खवखव कमी होते.
कफाचा त्रास कमी होतो. श्वास घेताना त्रास होतोय तो कमी होतो.
मित्रांनो शेवग्याच्या शेंगा आपल्या आसपास अगदी सहज उपलब्ध होतात. पण आपण महागडी औषधे विकत घेतो. मात्र औषधी गुणधर्मांनी आयुर्वेदिक औषधीय गुणधर्मांनी युक्त असलेल्या शेंगा मात्र खाण्याच पण टाळाटाळ करतो. आजकाल अनेक तरुण तरुणींच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स येतात.
पिंपल्सची समस्या आहे ती का निर्माण होते ? कारण तुमचं रक्त अशुद्ध झालेल आहे आणि मित्रांनो रक्त शुद्ध करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला अँटिबायोटिक एजंट म्हणून एक उत्तम पदार्थ म्हणजे शेवग्याच्या शेंगा. जर आपण शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तर या शेंगांमध्ये असे काही घटक आहेत की जे आपलं रक्त शुद्ध बनवतात आणि मग आपल्याला पिंपल्स त्रास किंवा अजूनही अनेक प्रकारचे त्वचा विकार दूर होतात.
त्या लोकांना मधुमेह आहे किंवा ज्यांना असं वाटतं कि भविष्यामध्ये आपल्याला मधुमेह होऊ नये त्या लोकांनी शेवग्याच्या शेंगा नक्की खायला हव्यात. कारण या शेंगा खाल्ल्याने आपल्या रक्तात साखर ही कंट्रोलमध्ये राहाते. या बरोबरच पित्ताशयाचे कार्य सुद्धा त्यामुळे चांगल्या प्रकारे सुधारते. डायबिटीस होऊ नये यासाठी सुद्धा या शेंगा खूप महत्त्वाचं कार्य पार पाडतात.
मित्रांनो आज-काल आपण पाहतो की, जास्त गोड खाल्ल्याने किंवा चहा कॉफीचं प्रमाण वाढल्याने आपली हाड ही कमकुवत होत आहेत. हाडांमधून कटकट आवाज येतो. त्याला अनेक कारणं ही कारणीभूत आहेत. आपल्या शरीरातील कॅल्शियम, आयर्न विटामिन कमी झालं तरी हे प्रॉब्लेम होतात.
यासर्व प्रॉब्लेमसाठी आपण शेवग्याच्या शेंगा खाऊ शकता. कारण शेवग्याच्या शेंगा मध्ये कॅल्शियम आयर्न विटामिन भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे आपल्या हाडांना मजबुती येते. हाडे बळकट बनतात. मित्रांनो आपली हाडे बळकट असतील तर आपण कोणतीही कार्यवाही सहज करू शकतो.
मित्रांनो वयात येणाऱ्या मुलं-मुली वाढत्या वयाची आहेत अशा मुलांनी तर शेवग्याच्या शेंगा नक्की खायला हव्यात. त्यांच्या पालकांनी त्यांना आवर्जून या शेवग्याच्या शेंगा द्यायला हव्यात. कारण या वाढत्या वयाच्या मुलांमध्ये हाडांची वाढ झपाट्याने होत असते आणि कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी या शेवग्याच्या शेंगा खूप मोठी मदत करू शकतात.
स्त्रियांसाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर ठरू शकतात. कारण यात असणारी व्हिटॅमिन्स आणि मिनरलस् ही गर्भाशयाच कार्य सुरळीत ठेवतात. प्रसूतीनंतर दूध येत नसेल किंवा बाळाला दूध पुरत नसेल तरी दूध वाढण्यास सुद्धा अत्यंत उपयोगी आहेत. कारण या शेंगामुळे दूध वाढण्यास मदत होते.
अलिकडे लोक अगदी लहानसहान आजारांना बळी पडतात. वातावरणामध्ये हानिकारक सूक्ष्मजीव असतात त्यांचा परिणाम म्हणून लोक आजारी पडतात आणि यासाठी आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे फार महत्त्वाचं आहे. इम्मुनिटी पॉवर बुष्ट करणे फार महत्त्वाचे आहे आणि हे काम काम शेवग्याच्या शेंगा करतात.
मित्रांनो शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने आपले रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते. कारण शेवग्याच्या शेंगामध्ये अगदी मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे. जीवनसत्व क आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती आपली रोगप्रतिकारक क्षमता प्रचंड प्रमाणात वाढ होते.
अशा प्रकारे आपल्याला शेवगाच्या शेंगा खाल्ल्याने भरपूर फायदे होतात. यातील काहीच फायदे आपण पाहिले आहेत. तर या बहुगुणी शेवग्याच्या शेंगा तुम्ही जरूर खा आणि तुमच्या आहारात याचा नक्की समावेश करा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.