ऋषिकेश शिंदे यांना अक्कलकोट प्रवासादरम्यान आलेला स्वामींचा हा एक थरारक स्वामी घेणार वाचून अंगावर काटा येईल ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक विविध प्रकारचे उपाय करत असतो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताही मार्ग सोडत नाही कारण स्वामी आपल्याला नेहमी अडचणीच्या वेळी मदत करत असतात कोणत्याही संकटातून आपल्याला स्वामी बाहेर काढतच असतात स्वामी नेहमी म्हणत असतात की कोणत्याही संकटांना घाबरून जाऊ नकोस संकटांना तू सांग की मी तुझ्याशी लढायला खंबीर आहे असं म्हणून तूच प्रत्येक संकटांना सामोरे जात जा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींची हे एक वाक्य खूप काही दिलासा देऊन जातो मित्रांनो आजपर्यंत आपण अनेक अनुभव ऐकले वाचले किंवा बघितले असेल तसाच एक अनुभव आज आपण ऋषिकेश शिंदे दादा यांच्या शब्दांमध्ये वाचणार आहोत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो शनिवारचा दिवस होता मी जॉब वरून दोन दिवसाची सुट्टी घेतली होती शनिवार आणि सोमवार साठी कारण मला अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी जायचं होतं मी एसटी स्टँड वर आलो एसटी स्टँड वर आल्यानंतर समजलं की बस थोड्या लेट न येणार आहे मी तिथेच बसून राहिलो पाच वाजले सहा वाजले संध्याकाळचे सात देखील वाजले तरी देखील अजून बस आले नव्हती एक तोपर्यंत लास्ट ची बस आली लगेच जाऊन मी बस मध्ये बसलो .

 

पाच दहा मिनिटांमध्ये बस पूर्णपणे भरून गेली व आमचा प्रवास सुरू झाला स्वच्छ व निर्मळ भावनेने स्वामीं जवळ आपण काहीतरी मागितलं तर ते आपल्याला नक्की मिळतं हा माझा अनुभव गेल्या कित्येक दिवसापासून मला अक्कलकोटला जायचं होतं पण कामामुळे मला जायला वेळच मिळत नव्हता पण आज मी दोन दिवसाची सुट्टी घेऊन अक्कलकोटला जायला निघालो होतो.

 

काय कुठे दर्शनाला चालला वाटतं माझ्या बाजूला बसलेले गृहस्थ माझ्याकडे बघत म्हणू लागले हो हो तसं महिना दोन महिन्यातून मी जातच असतो दर्शनाला खरं सांगू का तुम्हाला आम्हाला मागच्या आठवड्यामध्ये जायचे होते पण खूप प्रयत्न करूनही मला सुट्टी मिळाली नाही. मी म्हणालो तेव्हा योग नसेल आता योग घडून आला आहे तर स्वामिनी आपल्याला बोलवून घेतलं आहे. ते गृहस्थ म्हणाले होते तसेच काहीतरी असेल मी म्हणालो यावर गृहस्थ हसले मला असं शांत राहायला आवडत नाही बघा आणि तेही खास करून प्रवासात तर नाहीच नाही .

 

जर प्रवासामध्ये गप्पागोष्टी केल्या तर अंतर लवकरच पूर्ण होते असं म्हटलं जातं. त्यांनी मला न काही विचारता सुद्धा मी माझं स्पष्टीकरण देत होतो बोला माऊली कुठे जाणार कंडक्टर काका म्हणाले ते मागच्या सीटवर बसून आमच्या गोष्टी ऐकत होते हे आम्हालाही माहीत होतं अक्कलकोट आम्ही दोघांनीही म्हणालो आणि दोघांनीही अक्कलकोटची तिकीट काढून घेतली आमच्या गप्पागोष्टी पुन्हा चालू झाल्या कंडक्टर काकांनी सर्वांचे तिकीट काढले व तेही आमच्या बोलण्यामध्ये सहभागी झाले.

 

स्वामी अनुभव स्वामी उपासना आणि अक्कलकोट या विषयांवरती चर्चा चालू होते प्रत्येक जण आपापले अनुभव सांगत होते खास करून मला कंडक्टर काकांचे किस्से अजूनही आठवतात अजून त्यांचे वय 40 वर्षे होते कंडक्टर होण्याआधी ते स्वामीभक्त होते. कसली नोकरी घेऊन बसलाय साठ-सत्तर वर्षाची नोकरी कंडक्टर काकांची असे बोलणे माझ्या मनामध्ये बसल आता प्रवासाच थकवा थोडाफार जाणवत होता काही जण झोपून गेले होते रात्रीच्या सुमारास एसटी अक्कलकोट मध्ये पोहोचली.

 

आम्ही सर्वजण एसटीमधून उत्तरलो चला मंदिरात येताय ना ते गृहस्थ म्हणाले बाहेर एक वाहन मिळतं का बघूया मी म्हणालो रात्रीचे दीड वाजता आपल्याला कुठे वाहन मिळणार ते गृहस्थ म्हणाले चला तर बघू तरी एखादे वाहन मिळालं तर आपल्यासाठीच ते चांगलं होईल बरं बरं ठीक आहे चल मग बघू आता ते गृहस्थ व मी एसटी डेपोतून बाहेर पडलो व कोणतं वाहन मिळतं का आम्ही बघू लागलो पण एवढ्या रात्री तिथे कोणत्याही प्रकारचे वाहन नव्हते चला मग चालतच जाऊ ते गृहस्थ म्हणाले दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे मी ही तयार झालो.

 

तुम्हाला रस्ता माहित आहे का मी विचारलं हो मग त्याशिवाय चालत येतोय का आपण ते गृहस्थ म्हणाले आता आम्ही मंदिराच्या दिशेने चालत जात होतो पण मला रस्ता माहित नव्हता मी तर त्या गृहस्थाच्या भरोशावर चालत जात होतो रस्त्यावर चालत असताना रस्त्यावरची कुत्री आमच्यावर भुंकत होते माझ्यापेक्षा जास्त त्या गृहस्था वरती भुंकत होती व धावूनच त्यांच्या अंगावर जात होते मला तर खूप भीती वाटत होती की जर आपल्याला कोणी चोर समजलं तर उगाचच नको ती अडचण आपल्यावर निर्माण व्हायची.

 

ती कुत्र्याची भुकणे मला विचित्र वाटत होतं पण ते गृहस्थ अजिबातच कोणत्याही गोष्टीला घाबरत नव्हते. मी तर स्वामींना काही मागायला आलोय एकदम खास असं काही ते म्हणाले मी पण म्हणालो आता ते सांगू लागले माझी वीस एकर फळबाग आहे मुलगा परदेशात असतो आता मला सुद्धा त्याच्याकडे जायचे आहे आणि मी आता असा तरून शोधत आहे की जो माझ्या फळभागची योग्य ती काळजी घेईल. मला वर्षाचा ठराविक मोबदला देऊन तो पूर्ण नफा घेऊन शकतो काय असं सर्व काय बोलत आहे हे मी मनातल्या मनात विचार करू लागलो.

 

मी तर अचिंबित झालो होतो व विचार करत जागेवरच थांबलो ते गृहस्थ दोन-चार पावले पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मी पाठीमागेच राहिलो आहे ते पुढे जात होते तिथेच ते थांबले व माग वळत म्हणाले चल काय झालं हो हो चला मी आता त्यांच्या बरोबरीने चालू लागलो मला स्वामींची सर्व लीला आता समजली होती संपूर्ण घटना माझ्या डोळ्यासमोरून जात होती मला या अगोदरच सुट्टी का मिळाली नाही बस का लेट झाले नंतर मंदिरासाठी वाहन का नाही मिळाले सर्व काही माझ्या लक्षात येत होते .

 

थोड्याच वेळामध्ये आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो व मंदिराच्या पटांगणामध्ये जरा वेळ बसलो व नंतर आवरून वगैरे पटांगणामध्ये येऊन बसलो आता आम्ही सकाळच्या काकड आरतीची वाट बघत बसलो होतो आता सकाळचे पाच वाजले होते व आम्ही काकड आरती साठी पोहोचलो काकड आरती चालू झाली पण माझ्या मनात वेगळीच घालमेल सुरू होती स्वामी खरंच तुम्ही सर्व काही जाणता मी मागायच्या अगोदर मला तुम्ही ते दिलं माझं मन जॉब मध्ये लागत नव्हतं मला गावाला जाऊन फळबाग करायची होती हे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलो होतो .

 

पण तुम्ही लगेच वाटेमध्येच तुमची प्रचिती दिली काकड आरती ते गृहस्थ म्हणाले आम्ही स्वामींचे दर्शन घेतले व नंतर मंदिर परिसरामध्ये फिरून आलो बर ऐक तू काय जॉब करतोस ते गृहस्थ मला विचारत होते मी काही बोलेन या अगोदरच ते पुढे बोलू लागले तू का नाही माझी फळबाग सांभाळत वाटल्यास तर तू येऊन बघ आणि आपली स्वामी दरबारात ओळख झाली आहे आणि मला तर असं वाटतं की स्वामिनी तुलाच निवडल आहे या भागासाठी मी स्वामींकडे माझी हीच दूविधा घेऊन आलो होतो आणि त्यांनी मला वाटतच प्रचिती देखील दिले असं म्हणते गृहस्थ हसू लागले मीही त्यांच्या सुरात सूर मिसळला माझे अंतकरण भरून आले होते .

 

मला वाटलं नव्हते की मला एवढ्या लवकर स्वामींची प्रचिती येईल ते गृहस्थ अजून माझ्या उत्तराची वाट बघत होते स्मितहास्य करत मी म्हणालो हो नक्कीच मलाही शेतीत काम करायला खूप आवडेल खरं सांगायचे झाले तर मला जॉबचा खूप कंटाळा आलेला कारण मला जॉब मध्ये लक्ष लागत नव्हते मला देखील शेतीच करायची होती आणि असा विचार माझ्या मनात देखील खूप वेळा यायचा हे निवेदन घेऊनच मी स्वामींकडे आलो होतो आणि काही घडलं हे सर्व तुम्हाला आता माहीतच आहे .

 

खरंच स्वामींची लीला आघात आहे नंतर त्या गृहस्थांच्या आग्रहातील मी त्यांच्यासोबत गेलो त्यांची फळबाग देखील बघितली जॉब वरून बॉस फोन येत होता की वेळेवर हजर व्हायचं उद्या म्हणजे मंगळवारी नाहीतर तुला बघतोच मला त्यांच्यावर हसू आले मी फोन ठेवला व मनातल्या मनात म्हणाले अहो तुम्हीच काय बघता माझ्या स्वामींनी माझ्यावर आता बघितले आहे मला कसलीही चिंता नाही आता.

Leave a Reply

Your email address will not be published.