रागाचे औषध जन्मभर तुम्हाला राग येणार नाही…… फक्त एकदा वेळ काढून वाचा ….!!

Uncategorized

मित्रांनो, आपला जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी करत असतात की ज्यामुळे आपल्याला सतत राग येत असतो. काही वेळेस तर आपल्या सोबत असे घडत असते की कारण नसताना देखील आपण खूप रागावतो. आणि रागाच्या भरात काहीही बोलून जातो. आणि त्याचे परिणाम खूप वाईट होत असतात. काहींच्या बाबतीत असे असते की त्यांना त्यांच्या रागावर कंट्रोल ठेवता येतात आणि त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागत असतात. म्हणूनच आज आपण रागावर संयम कसा ठेवावा. याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

 

आपल्या जीवनात रोज काही ना काही असे घडत असते की आपल्याला राग हा येतोच आणि आपली चिडचिड ही होते. पण एक लक्षात घ्या ज्या वेळेला आपल्याला राग येईल त्यावेळेला आपण जर शांत राहिलो तर आपले थोडेही नुकसान होणार नाही आणि आपल्याला जसे हवे तसेच घडत जाईल. यासाठी आज आपण एक कथा जाणून घेणार आहोत.

 

एक गृहिणी असते तिला सतत प्रत्येक गोष्टीवर राग येत असतो. ती घरामध्ये सतत चिडचिड करत असते. तिच्या या स्वभावामुळे घरातील लोक तिला वैतागले होते. तिच्या या स्वभावामुळे घरात सतत तणावपूर्ण वातावरण निर्माण होत असे. घरामध्ये सतत वाद भांडण होत असत. एकदा काय होते त्या गृहिणीच्या दारावर एक साधू येतो. तिने आपली समस्या त्या साधूला सांगितली आणि ती त्या साधूला म्हणाली, ‘महाराज मला सतत राग येतो! प्रत्येक गोष्टीचा खूप म्हणजे खूप राग येतो, माझी कितीही इच्छा असली तरी मी माझा राग शांत करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही मला काहीतरी असा उपाय सांगा की माझ्या रागावर मी नियंत्रण करू शकेन!’

 

त्यानंतर त्या साधूने त्याच्या झोळीतून एक औषधाची बाटली काढली आणि तिला सांगितले की, जेव्हा केव्हा तुला राग येईल तेव्हा या औषधाचे चार थेंब तुझ्या जिभेवर सोड. दहा मिनिट ते जिभेवरचे औषध तोंडातच ठेवायचे. तोंड उघडायचं नाही. जर तोंड उघडलं तर औषध उपयोगी ठरणार नाही. त्यानंतर त्या स्त्रीला तिच्या रागावर नियंत्रण करायचेच होते त्यामुळे तिने साधूने सांगितल्याप्रमाणे ते औषध जेव्हा राग येईल त्यावेळेस खाण्यास सुरुवात केली.

 

सात दिवस हा प्रयोग तिने केला. जेव्हा राग येईल तेव्हा ते औषध तोंडात ठेवल्याने तोंड पूर्णपणे बंद ठेवले. त्या सात दिवसांमध्ये तिच्या रागाचे प्रमाण खूप कमी आले होते. तिची चिडचिड कमी झाली होती. सात दिवसानंतर तो साधू पुन्हा तिच्या दरवाजावर आला. तेव्हा ती त्या साधूला नमस्कार करून म्हणाली, तुमचे औषध माझ्यासाठी उपयोगी ठरली आहे. माझा राग कमी झाला आहे. मी रागावर नियंत्रण करू शकले आहे आणि त्यामुळे माझ्या कुटुंबात खूप शांती आणि समाधानी वातावरण आहे.

 

त्यावेळेला तो साधू म्हणाला, मुली जे मी तुला औषध दिले होते ते औषध नव्हतेच मुळे. त्या बाटलीमध्ये फक्त पाणी होते. साधू म्हणतो, एक लक्षात घे जेव्हा राग येईल तेव्हा शांत बसले तर रागावर नियंत्रण करता येते. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण उलटे-सुलटे बोलायला लागतो. त्यामुळे वाद वाढत जातात म्हणूनच शांत राहून रागाचा इलाज करता येतो. खरं पाहता रागाने फक्त आपले नुकसानच होते. रागामुळे आपण चिडचिडे रागीट बनतो. लोकांच्या नजरेत वाईट बनायला सुरुवात होते. आपले रागावर नियंत्रण असणे खूप गरजेचे असते.

 

अशाप्रकारे आपण आपला राग कमी करू शकतो व आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकतो व येणाऱ्या दुष्परिणामांचा प्रवाह कमी करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.