मित्रांनो जळगाव येथील प्रतापनगरमध्ये स्वामीं महाराजांचे केंद्र आहे. मी एके दिवशी स्वामी केंद्रात गेलो आणि स्वामींचे दर्शन घेतले. आणि घरी निघतांना मनात विचार आला कि आपण स्वामींची मूर्ती घरी घेऊन जाऊया. आणि मंदिरात असलेल्या दुकानातून मी महाराजांची पितळी मूर्ती घेउन घरी आलो आणि देवघरात ठेवली… परंतु स्वामींची सेवा कशी करावी हेच मला माहित नव्हते. रोज फक्त देवांची अंघोळ, टिळा आणि आगरबत्ती लावत असे. मग असे हळू हळू कधी तरी केंद्रात जात होतो. परंतु कोणाशी ओळख नसल्याने कोणाला विचारावे हि मनात द्विधा मनस्तीती होती.
एके दिवशी केंद्रात असणार्या दुकानात नजर टाकली आणि तिथे असणार्या अनेक पुस्तकांमध्ये मला ‘नित्यसेवा’ पुस्तक दिसले. हे पुस्तक मला विकत घ्यावेशे वाटले आणि त्यातल्या आरत्या, कालभैरव अष्टक मी रोज म्हणू लागलो. अश्यातच एक स्वामी भक्त माझ्या घरी आले. पण त्यांनाही अनेक गोष्टींचे पूर्ण असे ज्ञान नवते, त्यांनी उलटपक्षी मला संगितले की मी मूर्ती घरी का आणली आणि मूर्तीचे नियम खूप कठीण असतात. मूर्तिऐवजी मी एखादी स्वामींची प्रतिमा आणायला हवी होती. त्यांनी वरती मला सल्ला देखील दिला की, तुम्ही हि मूर्ती देवळात ठेवून या किंवा विसर्जन करून टाका.
मी आणि माझा परिवार विचारात पडलो की, आता काय करावे. पुन्हा माझा पाय केंद्राकडे वळले …पण आपल्याला आता कोणाशीतरी बोलावे लागेलच त्या दिवशी नेमका गुरुवार होता. आणि केंद्रात स्वामी भक्तानंसाठी प्रश्न उत्तराचा दिवस होता . आणि केंद्रात असणार्या एका सेवेकरी दादांना माझ्या समस्या सांगीतल्या. ते माला म्हणाले ‘आपण आपल्या बापाला कधी घराच्या बाहेर काढतो का? नाही ना !!. मग तुम्ही का मूर्ती न ठेवणाचा विचार का करता आहात . तुम्ही स्वामींना रोज अगरबत्ती लावत असालच ना.. मग बस ! स्वामींना हि सेवा देखील पुरी आहे.
आणि स्वतः स्वामींना तुमच्या घरी येण्याची इच्छा असल्यावर तेथे तुमचे काय चालणार..? हे सगळे जे घडते आहे. ते स्वामींच्या इच्छेने. निवांत रहा आणि त्या दिवसापासून स्वामी माझ्या कडून आणि माझ्या परिवाराकडून हळू हळू सेवा करून घेऊ लागले. त्यात स्त्रीसूक्त, पुरुषसुक्त, तारक मंत्र, कालभैरव अष्टक आणि स्वामी मंत्र अशी सेवा आमच्या हातून आपोआप स्वामी करवून घेऊ लागलेत. न चुकता अशी सेवा हातून घडत गेली. आणि दर गुरुवारी केंद्रात जाणाची ओढ लागत गेली.
पण अचानक सगळं व्यवस्थित चालू असताना आमच्या कुटुंबावर एक संकट आले आणि येथून खरी परीक्षा सुरु झाली. सर्वीकडे कोरोना व्हायरस या आजाराने थैमान घातले होते अशातच माझ्या आईची तब्बेत भिघडली आणि डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्यास सांगतले रिपोर्ट नॉर्मल येण्यासाठी स्वामींची अधिका अधिक सेवा कशी करावी हे स्वामी सेवेकरी कडून जाणून घेतले … त्यांनी सांगतले हि सेवा केल्याने रिपोर्ट नॉर्मल येईल ..झाले उलटेच आईचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. ‘शंका आणि संशय हे श्रद्धेच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे’, रिपोर्ट असा आल्याने मनात शंका निर्माण झाले आणि परिणामी स्वामींविषयी असलेली श्रद्धा जवळ जवळ उडाली.
आईचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याने. आम्हा परिवाराला सगळ्यांना टेस्ट करण्यास सांगितले… पुन्हा आपला रिपोर्ट तरी निगेटिव्ह यावा यासाठी पुन्हा माझ्या लहान मुलासह सर्व क्वारंटाइन सेंटर येथे स्वामींची उपासना करू लागलो . पुन्हा माझ्यासह माझ्या परिवाराचे देखील सर्वांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आता या पुढे स्वामी सेवा करायची नाही ,असे मनात ठरवलं. परंतु या मागेही स्वामींची लिलाच असेल हे आपल्या सर्व सामान्य माणसाला कळत नाही. मला स्वामींचा प्रचंड चीड येऊ लागली प्रसंगी मी स्वामींबद्दल अपशब्द बोलू लागलो. परंतु अनेकांना खुप त्रास झाला अनेक जण यात दगावले सुद्धा पण आम्हाला कुठलाच त्रास झाला नाही. आणि सुखरूप सात दिवसांनी आम्हाला घरी सोडण्यात आले.
स्वामी नेहमी आपल्या भक्ताला सुखरूप घरी आणतात. पण स्वामी विषयी मनात श्रद्धा असावी लागते. हे नंतर लक्षात आले. आणि पुन्हा स्वामी सेवा सुरु झाली. हळू हळू सेवा आपोआप स्वामी माझ्या हातून करू लागले. आणि रोज स्वामी चरित्र क्रमश ३ अध्याय आणि ११ माळी श्री स्वामी समर्थ जप करू लागलो. आणि मला स्वामींचा खूप अनुभव येऊ लागला.
आता मी तुम्हाला फोटोसहित माझा एक भयाण अनुभव सांगणार आहे. येत्या २० जानेवारीला म्हणजेच बुधवारी माझ्या आकरा वर्षाच्या मुलीच्या हातून डोक्याला लावण्याची पिन गिळली गेली. तिने आम्ही रागवू नाही म्हणून त्यावर तिने पाणी पिऊन घेतले. आणि काही वेळाने आम्हाला सांगितले ..तर थोडा आम्हाला धक्का बसला..! परंतु तिला कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाही.आम्ही स्वामींवर सर्वा भार सोडून दिला… तसेच मुलीची पण स्वामींवर अफाट श्रद्धा असल्याने मुलीने पुन्हा स्वामींना आम्हाला न सांगता निवेदन ठेवले.
आणि गुरुवारी मला संध्यकाळी कामावरून येतांना महाराजांसाठी हार आणि पेढे आणण्यासाठी सांगितले आणि म्हणाली मी स्वामींना सांगितले आहे. मला कुठलाही त्रास होऊ देऊ नका. मी तिने सांगितल्या प्रमाणे हार आणि पेढे घेऊन आलो. ती देखील खूप आनंदित झाली. आणि स्वामींना हात जोडून प्रसाद म्हणून तिने स्वामीं पुढे पेढे ठेवले. पण मुलीची जात असल्याने आणि वय देखील लहान असल्याने मला स्वामींनी काय बुद्धी दिली आणि मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरांकडून एक्सरेची चिठ्ठी लिहून घेतली. आणि मुलीचा छातिचा आणि पोटाचा एक्सरे काढला तर एक्सरेत तिच्या पोटात पिन दिसत होती पुन्हा सर्व भार आम्ही स्वामींवर सोपवला.
स्वामी आपल्यावरच का संकट आणतात? तिच्या आईने तिला धीर दिला “आणि म्हणाली चूक आपण करावी. त्यात स्वामी काय करतील. पोटात पिन गेली तर ती एक्सरेमध्ये दिसणारच ना..! पण या पिनला अलगद कसे बाहेर काढता येईल हे स्वामींचे काम आहे.” तू फक्त स्वामींचे नाव घे. असे तिला आईने सुचवले इकडे गेस्ट्रो इंडोस्कोपी मध्ये प्रसिद्ध असलेले डॉक्टरांचा पत्ता मी मिळवला .. एक्सरे रिपोर्ट घेऊन डॉक्टरनंकडे गेलो. तेथे गेल्यावर डॉक्टर घरी निघण्याच्या तयारीत होते. काय काम आहे .. असे तेथील कंपाउंडर ने विचारले मी त्यांना माझ्या मुलीची हकीकत सांगितली.. तर त्याने मला पेशंट कुठे आहेत..? असे विचारले , मी सांगितले ती घरी आहे.
आणि तिला मला आणावी लागेल. इतक्यात तो स्वामी रूपात माझ्या मदतीला आला ..आणि म्हणाला तुम्ही मुलीला आणाल तो पर्यंत डॉक्टर निघून जातील. मला रिपोर्ट द्या मी डॉक्टरांना दाखवतो आणि तुम्हाला बोलवतो. मी प्रचंड घाबरलो होतो. आणि माझ्या मनात स्वामी जप सुरूच होता. तितक्यात मला बोलवणे आले आणि त्यात डॉक्टर एम.डी . त्यांची फि ५०० रुपये मी अगोदरच बोर्ड वाचून घेतला होता. आत गेल्यावर डॉक्टरांनी माझ्याशी तब्बल वीस मिनिट चर्चा केली आणि म्हणाले घाबरू नका ..तिला अजून काही त्रास नाही ना..! तर मग आपण विष्टेवाटे निगण्याची वाट पाहू. मी म्हणालो सर उगाच रिस्क नको खर्च लागला तरी लागू द्या पण तुम्हाला योग्य असेल ते करा.
तर डॉक्टर म्हणाले पैसे कोणाला नको असतात परंतु मुलगी लहान आहे. माझे १० मिनिटाचे काम आहे. तुम्ही म्हणत असाल तर अजून उद्या पर्यंत आपण वाट पाहू …डॉक्टरांनी माझ्या कडून कुठलंही फी न घेता पोट साफ होण्यासाठी एक बाटली लिहून दिली. काल रात्री तिला औषध दिली आणि आज सकाळी तिच्या विष्टेवाटे तिची पिन अलगद बाहेर निघाली. दवाखानातील कंपाउंडर, डॉक्टर हे प्रत्येक्ष स्वामीच रूपातच तेथे होते. बघा ना तुम्ही ..! पेशंट सोबत नाही , तरीदेखील कंपाउंडर मदतीला धावून आला. डॉक्टर, सल्ला घेण्याची सुद्धा फी सोडत नाही आणि ते तर माझ्यासोबत वीस मिनिट चर्चा करून मोफत औषधी देखील लिहून दिली. हे सर्व करता करविता आपले स्वामी माऊलीच आहेत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.