मित्रांनो आपल्या आसपास आपणाला अनेक प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात आणि या वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. तर अशा काही वनस्पती आहे त्यांचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदा होत असतो. परंतु आपल्याला अपुऱ्या माहितीमुळे आपण या वनस्पतींकडे दुर्लक्ष करीत असतो. तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतींपैकीच पिंपळ हे एक वनस्पती आपण सर्वांनाच माहिती आहे. तर आज आपण पिंपळपान हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कसे फायदेशीर आहे हेच पाहणार आहोत. तर पिंपळ या वनस्पतीचे पान, खोड, मूळ, फळ हे खूपच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. तर हे पिंपळाच्या वनस्पतींचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कसा फायदा होणार आहे याविषयी आपण जाणून घेऊयात.
जर महिलांच्या बाबतीत काही मासिक पाळी संदर्भात काही अडचणी असतील तसेच पीसीओडी तसेच अनेक शरीरातील पेशीविषयी काही समस्या असतील तर तुम्ही पिंपळाच्या पानाचा रस किंवा पिंपळाच्या पानाचा काढा करून देखील सेवन केला तरीही चालतो. जर तुम्ही तीन-चार पिंपळाची पाने घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून मिक्सरच्या साह्याने याचा रस काढायचा आहे आणि दोन चमचे रस तुम्हाला सकाळी उपाशीपोटी प्यायचं आहे.
जर तुम्ही काढा करणार असाल तर दोन पाने पिंपळाची घेऊन ती पाण्यामध्ये घालून नंतर तुम्ही त्याचा काढा बनवून देखील पिऊ शकता. तर असे हे तुम्ही सकाळी उपाशीपोटी पिले तर स्त्रियांच्या मासिक संदर्भातील अडचणी असतील किंवा पीसीओडी ची समस्या असेल ती नक्कीच दूर होईल.
तसेच जर तुम्हाला कावेळीचा त्रास असेल तर तुम्ही या पिंपळाची ची साल आहे ही साल वाटून तिची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ती दररोज जर तुम्ही मधासोबत किंवा एक ग्लास पाण्यासोबत ही पेस्ट खाल्ली तर खूपच उत्तम आहे.
तसेच आपल्यापैकी बऱ्याच स्त्रियांमध्ये वांजपणा असेल तसेच पुरुषांमध्ये काम शक्तीपण देखील कमी असतो. तर अशा वेळेस तुम्ही या पिंपळाचे फळ सावलीत वाळवायचे आहे आणि नंतर त्या फळाची पेस्ट बनवून म्हणजेच ते फळ बारीक करून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करायचे आहेत आणि या गोळ्या दररोज तुम्ही मधासोबत जरी सेवन केल्या तरी यामुळे काम शक्तीपणा जो काही पुरुषांमधला असेल तो नक्कीच कमी होईल. तसेच महिलांच्या मध्ये जो वांजपणा आहे हा देखील कमी होणार आहे.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना जर भूक लागत नसेल तर या पिंपळाची पाने सावलीत वाळवायचे आहेत आणि त्याची पेस्ट बनवायची आहे आणि नंतर या पानांची पेस्ट बनवलेली आहे त्याच्या गोळ्या तयार करायचे आहेत आणि त्या गोळ्या तुम्ही गुळासोबत दररोज एक एक खायचे आहे. यामुळे तुमची भूक वाढण्याची क्षमता वाढेल.
एखाद्याचा आवाज जर खराब झाला असेल तर या पिंपळाच्या पानांचा रस दररोज दोन चमचे घेतला तर तुमचा आवाज नक्कीच चांगला होणार आहे. काही जणांना वातावरणातील बदलानुसार नाकातून रक्त येण्याची समस्या असते. यावर तुम्हाला नक्की काय उपाय करायचा असाही प्रश्न पडतो. त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या पानाचं चूर्ण खडीसाखरेबरोबर योग्य प्रमाणात बनवून घ्या. हे चूर्ण रोज दिवसातून तीन वेळा तुम्ही पाण्यातून नियमित प्या. असे केल्यास नाकातून अथवा कानातून रक्त येण्याची समस्या दूर होईल.
तसेच आपल्यापैकी घरात काम करणाऱ्या महिलांना नेहमीच पायाला भेगा पडण्याची समस्या उद्भवते. तुम्हाला तुमचे पाय अधिक कोमल आणि मऊ मुलायम हवे असतील तर तुम्ही पिंपळाच्या पानांचा चीक अथवा रस पायांना लावा. यामुळे तुम्हाला पायांवरील भेगांपासून सुटका मिळेल.
त्याचप्रमाने मित्रांनो टायफॉईड हा नक्कीच गंभीर ताप आहे. यावर उपाय म्हणून तुम्ही पिंपळाच्या सालीचा उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या सालीचं चूर्ण करून घ्या. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळी तुम्ही मधासह हे चाटण खा. यामुळे तुमचा टायफॉईड निघून जायला मदत होते.
तर अशाप्रकारे तुम्ही आपल्या आसपास असणाऱ्या पिंपळ या वनस्पतीचा जर वापर केला तर आपणाला आपल्या आरोग्यावरती खूपच प्रभाव झालेला नक्कीच दिसणार आहे. असे काही आयुर्वेदिक घरगुती उपाय केल्याने आपल्या आजारांपासून आपली सुटका नक्कीच होईल. तर तुम्ही देखील पिंपळाच्या वनस्पतीचा वापर आपल्या या जीवनामध्ये आवश्य करून पहा. तुमची देखील अनेक आजारांपासून सुटका नक्कीच होईल.