नवरात्रीत महिलांनी नऊ दिवस हे नियम अवश्य पाळा, महिलांनो या चुका अजिबात करू नका, नाहीतर मिळणार नाही व्रताचे फळ ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो नवरात्री उत्सव यावर्षी 15 ऑक्टोबर 2023 ते 24 ऑक्टोबर 2023 आहे यामध्ये पंधरा तारखेला घटस्था पना 24 तारखेला दसरा आहे ज्याला आपण विजयादशमी सुद्धा म्हणतो या कालावधीमध्ये नवरात्रीचे उपवास केले जातात देवीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पुजा होम हवन विधी सुद्धा या काळामध्ये केले जातात मित्रांनो आज आपण नवरात्रीमध्ये काय करावे व कोणते नियम पाळावे याबाबत जाणून घेणार आहोत.

 

नवरात्रीचा सगळ्यात पहिला नियम असा आहे घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने मातीच्या घटाची स्थापना करायची असते मातीच्या घटामध्ये पाणी भरून शिपाने लावली जातात आणि त्याच्या खाली आपण जी माती ठेवतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किंवा कोणत्याही एका प्रकारचे धान्य पेरलं जातं त्याला वेदिका म्हणतात तर ज्यांच्या ज्यांच्याकडे कुलदेवीचे टाक आहेत किंवा तुम्ही कुलदेवीची सेवा करत असाल तर त्यांनी आवर्जून घटस्थापना करावे आणि त्या मातीमध्ये धान्य सुद्धा पेरायचे आहे.

 

त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये तुम्ही मंगल कलसाची स्थापना केलेली असेल तर तो मंगल कलश सुद्धा तुम्हाला घटस्थापनेच्या या कालावधीमध्ये तुम्ही जिथे घटाची मांडणी वगैरे केलेली आहे तिथे तो मंगल कलश ठेवायचा आहे ज्यांच्या घरामध्ये मंगल कलश नाही त्यांनी घटस्थापनेच्या या कालावधीमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही घट बसवाल तर नव्याने एक मंगल कलश तयार करून तो सुद्धा ठेवायचा आहे आणि जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत तुम्हाला हा मातीचा घट आणि मंगल कलश अजिबात हलवायचा नाहीये .

 

पुढचा नियम आहे तो म्हणजे जिथे तुम्ही घटाची मांडणी केलेली असेल तिथे तुम्हाला तुमच्या देवघरातले जेवढे देव आहे तिथे ते विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहे म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी त्यांना स्नान घालायचं बाकी तुमच्या घटस्थापनेच्या पूजेबरोबर या सर्व देवी देवतांची भले त्या मूर्ती असू शकतील टाक असू शकतील किंवा देवांचे फोटो असू शकतील सर्व देवी देवतांची पूजा करून स्थापन करायचा आहे.

 

त्यानंतर जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत तुम्हाला या देवी देवतांच्या मूर्तींना किंवा टाकांना अजिबात स्नान घालायचं नाहीये त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही विधिवत पूजा करावी आणि त्यांची स्थापना सुद्धा करावी. यानंतर नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे एकाच घरामध्ये दोन घट बसू नये एका घरात दोन घट म्हणजे काय जर तुम्ही तुमच्या घरापासून दुसऱ्या गावी राहत असाल तुमच्या घरी म्हणजे सासरी जर तुमच्या सासूबाई घट बसवत असतील किंवा तुमच्या गावाकडे जे लोक आहेत ते जर घट बसवत असतील तर तुम्ही दुसरीकडे राहत असला तरी पण तुम्ही देवीची पूजा करू शकता.

 

उपवास करू शकता मात्र तुम्ही घट बसवायचा नाही म्हणजे एकीकडे जर सासू घट बसवत असेल तर मग सून जर वेगळी राहत असेल तर तिने घट बसवण्याची गरज नाही किंवा तुमच्या सासरी घटस्थापना होत नसेल तुम्हाला घटस्थापना करण्याची इच्छा आहे किंवा उपवास धरायची इच्छा आहे तर तुम्ही घटस्थापना करू शकता भले तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तुमचं गाव सोडून तुमचं राज्य सोडून जरी तुम्ही राहत असाल पण तुमच्या घरी जर घटस्थापना होत नसेल तर तुम्ही दुसरीकडे राहत असाल तरी पण घट स्थापनाकरायची आहे.

 

नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे जोपर्यंत तुम्ही नवरात्रीचे उपवास करत आहात नऊ ते दहा दिवस तोपर्यंत तुम्हाला व पुरुषांनी या कालावधीमध्ये दाढी करू नये केस कापू नये नखे कापू नये तर नवरात्री सुरू होण्याच्या अगोदरच तुम्ही या क्रिया करून घेऊ शकता जेणेकरून नऊ ते दहा दिवस बायकांना सुध्दा आयब्रो वगैरे असेल वॅक्सिंग वगैरे असेल तर ते सुद्धा या नवरात्रीच्या अगोदरच करून घ्यावं आणि नंतर दसऱ्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही घट उठवला आणि तुम्हाला जर ते आवश्यक असेल की आता तुमचे केस खूप वाढलेले आहेत किंवा पुरुषांची दाढी खूप वाढलेली आहे तर त्यांनी ते कार्य घटवल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी केलं तरी सुद्धा चालणार आहे .

 

यानंतर नवरात्रीमध्ये पाळणे एक महत्त्वाची गोष्ट एकदा की घट बसवला तर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपल्याला गटाला माळ घालावी लागते नऊ दिवसांमध्ये आपण गटाला किंवा देवीला कोणती माळ घालावी फुलांची की पानांची तर त्यामध्ये मी जरी तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत किंवा काही पर्याय सुचवलेले आहेत तरीपण ऋतुमानानुसार किंवा सीजननुसार आपल्यालातो.

 

आपण गटाला जी माळ घालतो तर ती सुई दोऱ्याने म्हणजे सुईचा वापर करून तयार नाही करायची तर आपण जशी नागपंचमीला हाताने दोऱ्याला गाठी तयार करतो आणि त्यामध्ये एक एक पान किंवा फुल ओवत असतो त्या पद्धतीने आपल्याला गटाला माळ घालायचे असते त्यामध्ये आपल्याला सुई दोऱ्याचा वापर करायचा नसतो देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला जर तुम्हाला माळ घालायची असेल तर त्यामध्ये तुम्ही सुईदराचा वापर करू शकता हा नियम फक्त गटासाठीच आहे गटाला आपण ज्या काही माळी घालतो ते आपल्याला हातानेच ओवायचे आहे बाकी इतर फोटोंना मुरताना किंवा टाकाना तुम्ही सुविधा नाही शिवून घातला तरी देखील चालू शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published.