मित्रांनो, आपल्या भारतीय परंपरेत सणांचे मोठे महत्त्व आहे. सध्या सणासुदीचाच हंगाम सुरू आहे. गणेशोत्सव जाऊन आता नवरात्रीचे वेध लागले आहेत. नवरात्री हा देवी दुर्गाला समर्पित एक शुभ हिंदू सण आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात भाविक विविध देवींचे दर्शन घेतात. हा नऊ रात्रींचा प्रतीकात्मक उत्सव आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, हिंदू चार ऋतूतील नवरात्रीचे स्मरण करतात. हे चार नवरात्र म्हणजे चैत्र नवरात्री, माघ गुप्त नवरात्री, आषाढ गुप्त नवरात्री आणि शरद नवरात्री. शारदीय नवरात्र साधारणतः सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये साजरी केली जाते. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर रोजी घटस्थापनेसह सुरू झाली आहे. 5 ऑक्टोबरला दुर्गा विसर्जनाने समाप्त होईल. या नवरात्रीत कोणत्या नियमांचे पालन करायचे ते आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो नवरात्रीच्या काळात भक्त दुर्गादेवीची अनेक प्रकारे पूजा करून आशीर्वाद मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करतात. या शुभ नऊ दिवसांच्या उत्सवासाठी काही महत्त्वाचे नियम पालन करावे असे जाणकार सांगतात. ज्यांचे पालन केले पाहिजे. नवरात्रीमध्ये काही करावे आणि काय करू नये हे आपण जाणून घेतले पाहिजे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणत्याही ते नियम ज्यांचे पालन आपल्याला या नवरात्रीमध्ये करायचे आहे. तर मित्रांनो सर्वात आधी या नवरात्रीच्या काळात खास करून महिलांचा अनादर करू नये. अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे मात्र या दिवसांमध्ये विशेष काळजी घ्यावी. नवरात्र हा एक सण आहे ज्यामध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मित्रांनो एखाद्या महिलेने नवरात्रीचे व्रत केले असेल आणि अचानकपणे जर तिची मासिक पाळी झाली तर अशावेळी अनेकांना भीती वाटते आणि त्याचबरोबर आता ही नवरात्र उत्सव मधील पूजा लक्ष्मी मातेची सेवा, व्रत करायचे की तिथेच सोडायचे हे आपल्यातील बऱ्याच जणांना कळत नाही. तर मित्रांनो अशा वेळी ज्या महिलेने नवरात्रीचे व्रत केले आहे आणि तिची जर अचानकपणे मासिक पाळी झाली तर अशावेळी त्या महिलेने व्रत म्हणजेच उपासना करायचीच आहे. परंतु रोजची जी घटाची पूजा आहे किंवा देवपूजा लक्ष्मी मातेची सेवा आहे ती घरामध्ये असणाऱ्या इतर सदस्याला करायला सांगायचे आहे.
त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा. केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचे आशीर्वाद मिळविण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवा. शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते. तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद, मतभेद किंवा मारामारी टाळा. नवरात्रीच्या काळात मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही नऊ दिवस ‘अखंड ज्योती’ पाळत असाल, तर तुम्ही पूजेच्या कोणत्याही नियमांचे आणि विधींचे उल्लंघन करणार नाही याची काळजी घ्या. दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यात लसूण आणि कांदे नसावेत.
मित्रांनो आपल्यातच असे काही लोक आहेत जे अनुष्ठान मानतात आणि पाळतात. म्हणून त्यांना नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केस कापणे आणि मुंडण करणे टाळावे असे सुचवले जाते. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या श्लोकांचे पठण करणेही शुभ मानले जाते. मात्र आपण ते योग्यप्रकारे करत असल्याची खात्री करा. जर तुम्हाला खात्री नसेल तर ते एखाद्या तज्ञ पंडिताकडून करून घेणे उत्तम. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दारू आणि तंबाखूचे सेवन टाळावे. या नऊ दिवसांमध्ये जो अनुष्ठान विधी पाळतो त्याला या शुभ काळात झोपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. तर मित्रांनो असे हे नियम आपल्याला नवरात्रीमध्ये पाळायचेच आहेत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.