मित्रांनो, हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की मनुष्याला मोक्षची प्राप्ती ही भगवंताच्या आशीर्वादामुळेच मिळू शकते. जर देवाची कृपा संपूर्ण घरात राहिली तर यापेक्षा चांगले काय असू शकते. म्हणूनच प्रत्येक घरात एक उपासनेसाठी देव घर स्थापित केले गेले जाते जेणेकरुन दररोज देवाची उपासना व त्यांना प्रसन्न करता येईल. परंतु पूजाघरात काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर त्या काही गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. तर मित्रांनो काही मूर्ती घराच्या मंदिरात ठेवू नयेत. त्यांना ठेवल्यास घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होतो.
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि आपले शास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार आपल्या देवघरांमध्ये आपण अशा काही विविधतांच्या मुर्त्यांची स्थापना करत असतो की ज्यामुळे आपल्याला याचा खूप त्रास नंतर सहन करावा लागतो आणि मित्रांनो याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो यामध्ये सर्वात जी पहिली देवता आहे किंवा ज्या देवतेची मूर्ती आपण आपल्या देवघरांमध्ये ठेवायला नाही पाहिजे ती म्हणजे बजरंग बली म्हणजेच हनुमान यांची मूर्ती. मित्रांनो यांची मूर्तीची स्थापना जर आपण आपल्या देवघरामध्ये केली तर यामुळे आपल्याला संतान प्राप्ती होत नाही. त्याचबरोबर आपल्या वंशा संबंधित अनेक समस्या निर्माण होतात आणि म्हणूनच भगवान बजरंग बली ची मूर्ती आपण आपल्या देवघरांमध्ये चुकूनही स्थापन करू नये.
त्याचबरोबर मित्रांनो दुसरीची देवता आहे ती म्हणजे सूर्यपुत्र शनिदेव. यांची मूर्तीसुद्धा घराच्या मंदिरात ठेवू नये. जर तुम्ही शनिदेवाची पूजा करत असाल तर ते घराबाहेरच्या मंदिरात करा आणि देवाची पाठ दर्शविणारी कोणतीही मूर्ती किंवा चित्र घरात ठेवू नये. हे अशुभ मानले जाते आणि यामुळे घरात राहणाऱ्या लोकांसाठी दुर्दैव येते. मित्रांनो देव घरात राक्षसाशी लढातांना किंवा राक्षसाला मारताना देव दर्शवितो अशी कोणतीही मूर्ती किंवा चित्र असू नये.
हे देखील एक रौद्र रूप मानले जाते. त्याचे दर्शन केल्यास घरात संकट येते आणि मित्रांनो भंग झालेल्या मूर्ती किंवा फाटलेले देवाचे चित्र घरात ठेवू नये. हे वास्तु आणि ज्योतिष या दोन्ही अनुसार अशुभ आहेत.
देव घराय एकाच ठिकाणी एका देवाच्या दोन मूर्ती ठेवू नयेत. एकाच देवतेच्या दोन मूर्ती अजिबात ठेवू नयेत. जेव्हा हे घडते तेव्हा त्या घरात विवाद हा होतो आणि भगवान शिव यांचा अवतार मानल्या जाणाऱ्या भैरव देवची मूर्ती घरात आणूच नये. भैरव हा भगवान शिवांचा अवतार मानला जातो परंतु भैरव देव तंत्र प्रकारातील देवता आहेत आणि घरात नव्हे तर घराबाहेर या देवाची उपासना करावी.
मित्रांनो देवघरात देवाचे रौद्र रूप असणारी मूर्ती ठेवू नये. रुद्र अवताराची मूर्ती किंवा पेंटिंग लावल्यास घरात उग्र उर्जा निर्माण होते. घरांमध्ये, भगवंताच्या सौम्य स्वरूपाची चित्रे किंवा मूर्ती नेहमी स्थापित केल्या पाहिजेत.
त्याच बरोबर मित्रांनो शनिदेवप्रमाणे राहू आणि केतूची मूर्ती घरात आणू नये. ज्योतिषानुसार शनि, राहू आणि केतु हे तीन पापी ग्रह आहेत. त्यांच्या मूर्ती घरात आणण्याने त्यांच्याशी संबंधित उर्जा देखील घरात आणतो. आणि मित्रांनो नटराजची मूर्ती घरात ठेवु नये.
नटराज हा भगवान शिवांचा उग्र स्वरुपाचा म्हणजे क्रोधित स्थितीचा अवतार आहे आणि अशी मूर्ती घरात आणल्यामुळे अशांतता पसरते आणि त्याचबरोबर मित्रांनो शेवटचा आणि सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण आपल्या पितृ यांचे किंवा आपले जे मृत पावलेले वडीलधाऱ्या व्यक्ती आहेत त्यांचेही फोटो देवघरांमध्ये ठेवत असतो. परंतु मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार यामुळेही आपल्याला भविष्यामध्ये अनेक मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.