वजन कमी करण्यासाठी वेट लॉस, लिंबू पाणी बनवतांना ही एक चुक अजिबात करू नका, नाहीतर या चुकीमुळे अजिबात वजन कमी होणार नाही …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण वजन वाढणे, जाड दिसणे, त्यासोबतच शरीरातील विविध अवयवांवर चरबी चढणे यासारख्या आजाराने आपण त्रस्त आहोत. यावर उपाय करण्यासाठी मार्केटमध्ये मिळणाऱ्या अनेक महागड्या औषधांचा आपण वापर करत असतो. बऱ्याच वेळेला अशा औषधांचा आपल्या शरीरावर विपरीत असा परिणाम होत असतो. त्यासोबतच काही आपण घरगुती उपाय देखील करत असतो. त्यातील लिंबू पाणी हे सर्वांना माहीत असणारे औषध आहे. आपण सर्वजण लिंबू पाणी तयार तर करतच असतो. पण हे लिंबू पाणी तयार करत असताना आपल्याकडून काही चुका घडतात.

त्या चुका जर आपल्याकडून घडल्या नाही तर आपल्या शरीरावरील अनावश्यक साठलेली चरबी कमी होईल. शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी लिंबू पाणी खूप फायदेशीर आहे. असे बऱ्याच जणांकडून ऐकलेल आहे.

मात्र हे लिंबू पाणी कशाप्रकारे करायचे आहे. त्याची पद्धत अजूनही आपल्याला व्यवस्थित माहित नाही. असे म्हटले जाते की सकाळी उठल्यानंतर गरम पाणी आणि लिंबू, मध मिक्स करून पिल्याने शरीरावर वाढलेली चरबी कमी होते. मात्र याचे प्रमाण योग्य असल्यास त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसतील.

आजच्या या लेखांमध्ये आपण त्याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपण जर हे लिंबू पाणी योग्य त्या रित्या तयार करून पिले तर आपल्या शरीरावर चांगले परिणाम दिसून येणार आहेत. त्यासोबतच आपल्याला बऱ्याच आजारांपासून दूर देखील ठेवणार आहे. या लिंबू पाण्यापासून आपल्या शरीरावर कोणकोणत्या प्रकारचे फायदे दिसून येणार आहेत. लिंबू पाणी बनवण्याची पद्धत खूपच सोपी आहे. हे लिंबू पाणी स्त्रिया पुरुष दोघेही घेऊ शकतात.

लिव्हर सारख्या मोठ्या आजारावर लिंबू पाणी खूप फायदेशीर आहे. कारण शरीरातील अनावश्यक घटक या लिंबू पाण्यामुळे नाहीसे होतात. त्यासोबतच पोटदुखीचे ज्या व्यक्तींना त्रास आहे. त्यांच्यासाठी देखील हा उपाय खूप फायदेशीर आहे. रोज लिंबू पाणी घेतल्याने बऱ्याच प्रकारचे फायदे शरीरावर दिसून येतात. दररोज लिंबू पाणी घेतल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.

लिंबू पाणी आपल्या हृदयाचे विकार कमी करतात. त्याचबरोबर बीपी सारखे आजार देखील नियंत्रणात ठेवतात. यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होते. परिणामी हृदयविकारासारखे आजार यामुळे बरे होतात लिंबू पाणी गरोदर महिलांना खूप फायदेशीर आहे. कारण या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी असते. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

ज्यांना चेहऱ्यावर पिंपल्स येणे, चेहऱ्यावर डाग पडणे यासारखे आजार आहेत. त्यांना देखील लिंबू पाणी खूप फायदेशीर आहे. नियमित याच्या पिण्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात. डाग देखील कमी होतात. त्यासोबतच चेहरा गोरा होण्यास मदत होते. नियमित लिंबू पाणी पिल्याने भूक देखील कमी प्रमाणात लागते. त्यामुळे आपण बाहेरील फास्ट फूड खात नाही.

परिणामी याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो. भूक न लागल्यामुळे त्यासोबतच पौष्टिक आहार पोटात गेल्यामुळे शरीरावर वाढणारी अनावश्यक चरबी यामुळे कमी होते. लिंबू पाण्यासोबतच त्यामध्ये थोडे शुद्ध मध मिक्स केले तर सांधेदुखी कमी होते. रोग प्रतिकारशक्ती वाढते. परिणामी आपले शरीर निरोगी राहते. वारंवार आजारी पडण्याचा त्रास कमी होतो. छातीमध्ये साठणारा कप देखील कमी होतो.

ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे त्या व्यक्तीने दररोज सकाळी अनुशापोटी हे लिंबू पाणी प्यायचे आहे. आणि जे लोक निरोगी राहण्यासाठी लिंबू पाणी पिणार आहे. ते दिवसातून एकदा कधीही पिऊ शकतात. नियमित न चुकता जर सकाळी अनुशापोटी लिंबू पाणी घेतले तर सात ते आठ दिवसांमध्येच आपल्याला आपल्या शरीरावर चरबी कमी होत असल्याचे दिसून येईल.

लिंबू पाणी पिल्याने शरीरावर एवढे फायदे होत होता. तर हे लिंबू पाणी कशा पद्धतीने बनवायला पाहिजे याची माहिती घेणार आहोत. अत्यंत उपयुक्त व गुणकारी बनवण्यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी उकळून घ्यायचे आहे. ते पाणी उकळून झाल्यानंतर एका ग्लासमध्ये ओतायचे आहे. पाणी कोमट झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस प्यायचा आहे. त्यानंतर एक चमचा मध घालायचा आहे.

मात्र आपल्याकडून ही चूक होता कामा नये याकडे आपल्याला लक्ष दिले पाहिजे. कारण गरम पाण्यामध्ये कधीही मग मिक्स करायचे नाही. पाणी कोमट झाल्यानंतरच त्यामध्ये मध घ्यायचे आहे. व सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर कोमट असेपर्यंतच प्यायचे आहे. यामुळे आपल्या शरीरावर चांगले परिणाम दिसतील. व अनावश्यक साठलेली चरबी कमी होईल.

आपल्या शरीराला होणाऱ्या बराच आजारांपासून दूर ठेवले जाईल. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे कोणत्याही साथीच्या रोगाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला मध अजिबात घालायचे नाही किंवा मग मिक्स केलेले पाणी पुन्हा गरम देखील करायची नाही. जर आपण मध घालून पाणी गरम केले तर त्या पाण्याचे होणारे फायदे कमी होतील. व आपल्या शरीरावर याचे विपरीत परिणाम होतील.

त्यामुळे लिंबू पाणी पीत असताना कोमट पाण्यामध्ये मध घालायचे आहे. हे लक्षात असायला हवे. लिंबू पाणी पीत असताना शरीराला पोषक असणारे सर्व घटक खाणे आणि पिणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. शरीरावर अनावश्यक साठलेली चरबी कमी करण्यासाठी बाहेरील तेलकट, तुपकट पदार्थ खाणे शक्यतो बंद करणे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच रोजचे जेवण वेळेवर जेवणे, शरीराला आवश्यक तेवढी झोप घेणे यादेखील गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

दररोज एक तास तरी चालणे हे देखील गरजेचे आहे. कारण फक्त लिंबू पाणी घेतल्याने सर्व चांगले परिणाम होतात. हे जरी खरे असले तरी त्यासोबतच आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. योग्य त्या प्रकारे लिंबू पाणी व खाण्याच्या बाबतीत असलेल्या खबरदाऱ्या जर घेतल्या तर शरीरावर अनावश्यक ठिकाणी साचलेली चरबी त्यासोबतच पोटावर साचलेली चरबी यामुळे कमी होईल.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक लेखांची माहिती घेण्यासाठी आताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.