मोजून फक्त १५ दिवसात १५ किलो वजन हमखास कमी होऊन पोटाची चरबी मेनासारखी वितळून जाणारा हा खास घरगुती उपाय एक वेळेस अवश्य करून पहा …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपण काही वेळेस आपण जंक फूड म्हणजेच पोषक तत्वे नसलेले फूड खातो. त्यामुळे आपल्या पोटाची चरबी वाढते, पोट मोठे व बेढब दिसते, जे आपल्याला आवडत नाही. परंतु मित्रांनो आपण असे एक फॅट कमी करण्याचे ड्रिंक पाहणार आहोत म्हणजेच फॅट कटर ड्रिंक पाहणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल. आपण जे अन्न खातो त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते. परंतु जास्त जेवण केल्याने किंवा संतुलित आहार न घेतल्याने आपले वजन वाढते. अतिरिक्त जेवण केल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर एनर्जीत न होता ते फॅट्स मध्ये रूपांतर होते म्हणजेच चरबी मध्ये रूपांतर होतं.

मित्रांनो जेव्हा आपले वजन वाढायला लागते तेव्हा सर्वप्रथम ही चरबी पोटावर साठते आणि आपल्या पोटाचा घेर वाढतो वेळीच उपचार न केल्यास हा पोटाचा घेर आणखीनच वाढत जातो. मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे ज्याचा तुम्हाला 100 टक्के फायदा मिळेल आणि त्याचबरोबर मित्रांनो एकदा का पोटाचा घेर वाढला म्हणजे चरबी अतिरिक्त प्रमाणात वाढली की, रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि हाय ब्लड प्रेशर हृदयातील ब्लॉकेज यांसारख्या भयानक आजारांना तोंड फुटते.

तसेच डायबिटीस सारखे आजार बळावतात. तर असे हे आजार होऊ नये आणि तुमचे वाढलेले वजन आणि सुटलेले पोट कमी व्हावे यासाठी अत्यंत तुमच्यासाठी एक अत्यंत प्रभावी असे फॅट कमी करण्याचे ड्रिंक घेऊन आलेलो आहोत.

मित्रांनो या फॅट कमी करण्याचे ड्रिंक मुळे तुमच्या पोटावरील चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल आणि तुमचे पोट अगदी सपाट होईल. चला तर मग हे फॅट कमी करण्याचे फॅट कटर ड्रिंक कसे बनवायचे आणि ते कशा पद्धतीने घ्यायचे हे आपण पाहूया. हे पेय तुम्ही सतत काही दिवस घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचे लटकणारे पोट कमी होईल.

आपणाला यासाठी लागणार आहे लिंबू. घरातील वस्तु वापरुन आपण हा उपाय तयार करणार आहोत. लिंबू तर आपल्याकडे असतेच. केवळ तुम्हाला एका लिंबाचा रस घ्यायचा आहे. लिंबू मोठे असेल, तर अर्धेच लिंबू घ्या.

मित्रांनो लिंबू आपल्या शरीराला टोक्सिन म्हणजेच विषारी द्रव्यांपासून वाचविते. ते विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढून टाकते. त्याचप्रमाणे लिंबामुळे आपले वजन कमी करण्यास खूप मदत होते. खूपच उत्तम असे हे ड्रिंक आहे जे तुम्ही काही दिवस घेतले तर तुम्हाला स्वत:ला फरक जाणवेल. एका आठवड्यात तुम्हाला जाणवेल, की तुमचे लटकलेले पोट आहे, ते व्यवस्थित होते आहे आणि सगळ्यात पहिले लिंबाचा रस काढून ह्या आणि हे पेय तुम्हाला दिवसातून दोनदा घ्यायचे आहे.

सकाळी जेवणाआधी किंवा जेवणानंतर घेऊ शकता. तुम्हाला हे पेय गरमच प्यायचे आहे. यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ घ्यायचा आहे तो म्हणजे आले. त्याची साले काढून त्याचे पातळ तुकडे करायचे आहे. आता तुम्हाला जिंगर वॉटर बनवायचे आहे. आले आपल्या पचनास मदत करते. जर आपण आल्याचे पाणी प्यायले तर पचन चांगले होते.

मित्रांनो आपले पचन चांगले असेल, मेटाबोलीसम चांगले असेल, तर आपण जे काही खातो ते पचेल व त्याचे चरबीत रूपांतर होणार नाही त्याची ऊर्जा बनेल. आता १ ग्लास पाणी गरम करत करा.जसे पाणी गरम झाले की आल्याचे तुकडे त्यात टाका. मंद गॅसवर आले पाण्यात उकळायचे आहे.

आल्याच्या पाण्याने भूक नियंत्रित होते. त्यामुळे आपण जास्तीचे खाणे खात नाही. जरुरीपेक्षा जास्त खाल्ले तर वजन वाढते. मित्रांनो हे पाणी चांगले उकळले की हे पाणी गाळून घ्या. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घाला. लिंबू नैसर्गिक ब्लीच आहे. आता आपल्याला त्यात घालायचा आहे मध. मध वजन कमी करण्यासाठी मदत करतो. तर तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करून पहा.

तर मित्रांनो लिंबू, आले, मध आणि पाणी या पदार्थांचा वापर करून तयार केलेले पेय जर आपण घेतले तरी यामुळे आपले वजन कमी होण्यास तसेच चरबी कमी होण्यास देखील मदत होते. तर असा हा घरगुती उपाय एक वेळ तुम्ही अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.