मित्रांनो प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे चार चौघात उठून दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी आपण पुरेपूर काळजी देखील घेत असतो. तसेच आपण चार चौघांमध्ये कसे उठून दिसू याकडे सर्वजण लक्ष देत असतात आणि घरगुती उपाय करीत असतात. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेत असतात. परंतु मित्रांनो चार चौघात तुम्ही उठून दिसण्यासाठी तुमच्या चेहऱ्याबरोबर तुमचे केस देखील खूपच महत्त्वाचे असतात.
म्हणजेच लांब सडक, काळेभोर केस हे कधीही सुंदर त्यामध्ये भर घालीत असतात. आज काल अनेक जण केसांकडे अगदी लक्ष देत असतात. परंतु काही जणांचे केस हे वेडेवाकडे असतात आणि त्यामुळे मग त्यांना आपल्या केसांची हेअर स्टाईल देखील करता येत नाही. मित्रांनो जर तुमचे देखील केस हे वेडेवाकडे असतील जर तुम्हाला तुमचे केस हे सरळ करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही एक घरगुती उपाय करू शकता.
यामुळे तुमचे केस हे कायमस्वरूपी सरळ होतील आणि तेही फक्त वीस मिनिटांमध्ये आणि यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील करावा लागणार नाही. तर हा उपाय नेमका कसा करायचा आणि कोण कोणते पदार्थ यासाठी आपणाला हवे आहेत ते आपण जाणून घेऊयात.
तर मित्रांनो तांदूळ हे प्रत्येकाच्या घरी असते. तर तुम्ही तांदूळ घ्यायचे आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे आणि एकदम बारीक झाल्यानंतर तांदळाचे पीठ तुम्ही चाळून घ्यायचे आहे. मित्रांनो नंतर आपणाला दूध देखील आवश्यक आहे. मित्रांनो तुम्ही पाणी न घालता कच्चे दूध एक ग्लास घ्यायचे आहे.
तर मित्रांनो एका बाऊलमध्ये तुम्ही अडीच चमचे तांदळाचे पीठ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्ही एक ग्लास दूध घालायचे आहे. मित्रांनो हे व्यवस्थित मिश्रण तुम्ही मिक्स करायचे आहे. म्हणजेच चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर मित्रांनो तुम्ही हे जे मिक्स केलेले आपण मिश्रण आहे हे गॅस वरती अगदी लहान हळुवार गॅस वरती तुम्हाला हे मिश्रण ठेवायचे आहे.
आणि चमच्याने सतत हलवत राहायचे आहे. जोपर्यंत याची पेस्ट म्हणजेच क्रीम बनत नाही तोपर्यंत तुम्हाला हे मिश्रण चमच्याने हलवत राहायचे आहे. नंतर तुम्हाला याची पेस्ट बनलेली जाणीवेल. त्यावेळेस तुम्ही गॅस बंद करायचा आहे आणि ही पेस्ट बाजूला काढून घ्यायची आहे आणि ही पेस्ट तुम्हाला गार होऊ द्यायचे आहे.
गार झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल एक चमचा त्यामध्ये घालायचे आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे झाले आपले पेस्ट. ही पेस्ट आता आपण केसांना लावायचे आहे. जर तुम्ही केसांना तेल लावले असतील किंवा कोणताही शाम्पू वापरला असेल तर तुम्ही पहिल्यांदा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्ही आपल्या केसांचे पार्ट म्हणजे थोडे थोडे केस घेऊन तुम्ही ही पेस्ट वरून खाली अशा पद्धतीने लावायची आहे.
व्यवस्थित तुम्ही ही पेस्ट लावून घ्यायची आहे आणि तुम्हाला २० मिनिटे ही पेस्ट आपल्या केसांवर तसेच ठेवायचे आहे. वीस मिनिटे झाल्यानंतर तुम्हाला थंड पाण्याने आपले केस धुवायचे आहेत. मित्रांनो आठवड्यातून जर तीन दिवस तुम्ही हा उपाय जर केला तर यामुळे तुमचे केस हे नक्कीच सरळ होतील.
मित्रांनो जशा तुमच्या केसांची वाढ असेल त्या पद्धतीने तुम्ही दूध आणि तांदळाचे पीठ घेऊ शकता. म्हणजे कमी जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही हा उपाय एक वेळा अवश्य करून पहा. यामुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तर हा उपाय अवश्य करा.