झणझणीत अंडातवा मसाला मसाला बनवताना त्यात टाका ही एक वस्तू चव दुपटीने वाढेल खाणारे दोन पोळ्या जास्तच खातील …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांना मांसाहारी जेवण करण्याची खूप सवय असते आणि त्याचबरोबर आठवड्यातून किमान दोन वेळा तरी मांसाहार केल्याशिवाय आपल्यातील अनेक जणांना चैनच पडत नाही. परंतु मित्रांनो दरवेळी बाहेर जाऊन मांसाहार करणे किंवा अंडी, मटण, चिकन यांसारखे वस्तू बाहेर जाऊन खाणे आपल्यातील बऱ्याच जणांना परवडत नाही किंवा बऱ्याच वेळा बाहेरचे जेवण न जेवण्याचा आपल्यातील अनेक जणांचा निश्चय असतो आणि मित्रांनो अशावेळी हे लोक घरामध्येच हे मांसाहारी पदार्थ करून खाणे पसंत करत असतात. मित्रांनो घरच्या घरी हे पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेणे यामध्ये एक वेगळीच मजा असते.

तर मित्रांनो आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी
हॉटेलसारखा चव असणारे तवा अंडा मसाला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्यातील अनेक जणांना अंडा मसाला हा खूप आवडतो आणि हाच अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये कशा पद्धतीने आपल्याला करता येतो याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि हॉटेल सारखी करू शकतो. तर मित्रांनो आता आपण ही रेसिपी कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला चार अंडी उकडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर असणारे कवच आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि उकडलेले अंडे आपल्याला मधून कापून घ्यायचे आहेत.

त्यानंतर मित्रांनो आपल्याला गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या तव्यावर थोडसं बटर आणि थोडसं तेल टाकायचं आहे आणि गॅस मध्यम स्वरूपाचा ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे.

त्यानंतर आपल्याला चमचाच्या सहाय्याने व्यवस्थितपणे मिश्रण एकत्रित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ती अर्धी कट केलेले जे अंडे आहेत ती यावर भाजण्यासाठी ठेवायचे आहे आणि मित्रांनो दोन ते तीन मिनिटं एका बाजूने भाजल्यानंतर लगेचच दुसऱ्या बाजूनेही आपल्याला ही अंडी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत. मित्रांनो अशा पद्धतीने ही रेसिपी करण्या अगोदर जर आपण ही अंडी भाजून घेतले तर यामुळे आपल्या रेसिपीला एक वेगळीच हॉटेल सारखी चव येईल.

त्यानंतर मित्रांनो आपण त्या सर्व अंड्यांना गोल्डन कलर आल्यानंतर काढून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या अंड्याचा मसाला तयार करत असताना आपल्याला सर्वात आधी मिक्सरमध्ये तीन बारक्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत.

त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. मित्रांनो हे सर्व पदार्थ टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने हा मसाला तयार झाल्यानंतर आपण तो मसाला एका वाटीमध्ये बाजूला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो ही करत असताना आपल्याला दोन टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत.

त्यानंतर हे मिक्सरच्या साह्याने पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि ही पेस्ट आपल्याला एका वाटीमध्ये बाजूला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो ही रेसिपी करायला सुरुवात करायचे आहे. तर सुरुवात करत असताना सर्वात आधी आपल्याला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक कापून टाकायचे आहेत.

मित्रांनो अशा पद्धतीने चिरलेला बारीक कांदा आपल्याला तव्यावर परतून घ्यायचा आहे आणि मित्रांनो हा कांदा लवकरात लवकर परतवा म्हणजे शिजवा. यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो हा कांदा तव्यामध्ये व्यवस्थितपणे शिजवल्यानंतर आणि त्याचा कलर थोडासा बदलल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जी लसुन, कोथिंबीर, मिरची यांची पेस्ट तयार केली होती ती पेस्ट टाकायचे आहे.

पुन्हा एकदा कांदा त्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे हे मिक्स केल्यानंतर आपल्याला आपण जी टोमॅटोची प्युरी तयार केलेली होती तीही आपण यामध्ये टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा चमच्याच्या साह्याने हे व्यवस्थितपणे आपल्याला हलवून घ्यायच आहे.

अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व पदार्थ यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये आता मसाले ऍड करायचे आहे तर यामध्ये सर्वात आधी आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर टाकायचे आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा गोडा मसाला, पाव चमचा हळद, एक चमचा धने पावडर, टाकायचे आहे.

त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मसाले व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचे आहेत. मित्रांनो हे मसाले तेलामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साधारणता एक कप पाणी आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो थोडस पाणी आपल्याला यामध्ये टाकायच आहे आणि त्यानंतर एक मिनिट तसच ठेवायचं आहे. तर आपल्याला ही गिरवी अशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे आणि मित्रांनो एक मिनिटानंतर या गिरवीला ज्यावेळी कट येईल त्यावेळी आपण यामध्ये जी आपण अंडी भाजून घेतली होती ती अंडी आपल्याला यामध्ये सोडून दयायची आहेत.

पुन्हा एकदा ही अंडी आपल्याला अर्धा मिनिट एका बाजूने आणि अर्धा मिनिट दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायची आहेत. त्यानंतर मित्रांनो आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायचे आहे आणि सजवून घेऊन आपल्याला अंडा मसाला खाण्यासाठी वापरायचा आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.