सर्दी, कफ, खोकला, घसा खवखवणे या सर्वांवर रामबाण काढा घरातील सर्वांसाठी हा बनवलेला काढा एक वेळेस घ्या, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, फक्त अर्ध्या तासात बंद …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो जुनाट सर्दी कफ खोकला घसा खवखवणे यासारख्या अनेक आजारांवर आपण आजच्या या लेखांमध्ये असा एक काढा पाहणार आहोत. की या काढाच्या सेवनाने अर्ध्या तासांमध्येच आपला घसा खवखवणे, सर्दी, कप, खोकला यासारख्या बऱ्याच आजारांवर जलद परिणाम होणार आहे व याचा त्रास देखील कमी होणार आहे. हा काढा इतका प्रभावशाली आहे. की फक्त याच्या एक वेळेस सेवनाने आपल्याला जी काही सर्दी, खोकला, कप, घसा खवखवणे यासारख्या त्रासातून आपली लगेचच सुटका होणार आहे. यावर जे आपण रामबाण औषध म्हणजेच काढा तयार करणारा आहोत. तो काढा आपण घरच्या घरी असणारा साहित्यातून करणार आहोत.

हा काढा तयार करण्यासाठी आपल्याला तीन घटकांची आवश्यकता लागणार आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन कप पाणी गॅसवर उकळण्यासाठी एका पातेल्यामध्ये ठेवायचा आहे. पाणी उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे हा जिरे हे आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरामध्ये आपल्याला सहज मिळू शकतात.

तेच जिरे एक चमचा त्या पाण्यामध्ये घालायचे आहे आणि पाणी उकळत ठेवायचे आहे. आपण दोन कप पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहेत. ते दीड कप पाणी होईपर्यंत तसंच उकळवायचं आहे. जिरे पाण्यामध्ये टाकून उकळल्यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपले चोंदलेले नाक आहे. ते नाक देखील मोकळे होण्यास मदत होते. सर्दीच्या आणि विकारांवर जिरे खूप प्रभावशाली परिणाम करतात.

पाणी दीड कप उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तुळशीची सत आठ पाने स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुऊन त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. व गॅस मंद करायचा आहे. तुळस देखील आपल्या सर्वांना सहज मिळू शकते. कारण तुळशीचे रोप हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते.

कारण तुळशीला ज्या पद्धतीने धार्मिक महत्त्व आहे. त्याच पद्धतीने औषधे देखील गुणधर्म तुळशीमध्ये खूप आहेत. त्यामुळे वैद्यकीय शास्त्रामध्ये तुळशीला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. तुळशी पासून आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळते त्याचबरोबर आपल्या आजूबाजूची असणारी अशुद्ध हवा देखील शुद्ध होते तुळशीमध्ये दैवी शक्ती आहे. आपण तुळशीला लक्ष्मी मानतो हीच तुळस आपल्याला औषध देखील म्हणून वापरता येते.

काढा तयार करण्यासाठी जो आपण शेवटचा घटक घेणार आहोत. ते म्हणजे आले किसणीच्या साह्याने आले किसून त्याचा कीस किंवा त्याचा रस अर्धा चमचा होईल एवढा त्या काढ्यामध्ये मिक्स करायचा आहे. सर्दी खोकला झाल्यानंतर आल्याचा वापर आपण यासाठी करणार आहोत. जेणेकरून आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढली जाईल.

शरीरामध्ये उष्णता वाढल्यानंतर आपल्याला होणारा सर्दीचा व खोकल्याचा त्रास कमी होतो. मात्र हे आले त्या काढ्यामध्ये वापरत असताना ते योग्य त्या प्रमाणातच घ्यावे. कारण आलं हा पदार्थ खूप उष्ण पदार्थ आहे. याचे प्रमाण जर जास्त झाले तर आपल्याला उष्णतेचे त्रास देखील होतील. त्यामुळे आल्याचा योग्य त्या प्रमाणातच वापर करून घ्यायचा आहे.

हे सर्व मिश्रण पाण्यामध्ये घालून मंद गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचे आहे. जो काढा आपण दोन कप उकळण्यासाठी ठेवलेला आहे. तो एक होईपर्यंत उकळवायचा आहे. आणि गाडीच्या सहाय्याने कपामध्ये गाळून घ्यायचा आहे. हा काढा सकाळच्या वेळी अनुषापोटी जर पिला तर याचे चांगले परिणाम होतील. दिवसातून एक वेळेसच आपल्याला हा काढा घ्यायचा आहे.

मात्र हा काढा घेण्याआधी एक तास व काढा. घेतल्यानंतर देखील एक तास आपल्याला काहीही प्यायची किंवा खायचे नाही. जर आपण हा काढा सकाळी अनुशापोटी पिला तर याचे चांगले परिणाम दिसून येतील. जर आपल्याला हा काढा गरम गरम पिणे शक्य नसेल किंवा याचा स्वाद जर आपल्याला आवडत नाही.अशा व्यक्तींनी हा काढा कोमट झाल्यानंतर त्यामध्ये एक ते दोन चमचे मध मिक्स करून पिण्यास काही हरकत नाही.

मात्र हा काढा पीत असताना गरमागरम मध मिक्स न करता पिलास याचे परिणाम आपल्या शरीरावर चांगले दिसून येतील व आपली सर्दी आणि खोकला लगेचच बरं होतील. तसेच घशामध्ये होणारे खवखव देखील बरी होईल. ज्यावेळी आपण काढा तयार करतो तो काढा गरम असतो. हा गरम गरम काढा जर पिला तर आपला घसा देखील शेकला जातो. आणि घशाची खवखव कमी होते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजेच मित्रांनो ज्यावेळी काढा गरम आहे. त्यावेळी त्या काढ्यामध्ये मध मिक्स करायचे नाही. हे शरीरासाठी हानिकारक असते जर आपल्याला मध मिक्स करून काढा प्यायचाच असेल तर तो काढा कोमट झाल्यानंतरच त्यामध्ये मध मिक्स करून तो काढा प्यायचा आहे.

मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.  अश्याच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.