मित्रांनो News38media वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपल्याला खाज, खरूज, नायटा, गजकरण यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासारख्या त्वचाविकार होण्यामागील कारणे सुद्धा आहेत. बहुतेक वेळा आपण आपल्या शरीराची योग्य पद्धतीने स्वच्छता करत नाही तसेच अनेकांना घाम जर जास्त प्रमाणामध्ये येत असेल तर अशा वेळी हा काम सूकून जातो आणि नंतर त्या ठिकाणी खाज सुटू लागते.
बहुतेक वेळा आपल्या शरीरावर बुरशी निर्माण झाल्यामुळे सुद्धा अनेकांना त्वचा विकार उद्भवतात त्याचबरोबर अनेक जण आपल्या शरीराची हवी तशी काळजी घेत नाही, शरीराकडे दुर्लक्ष करतात. सुरुवातीला खाज येऊ लागते परंतु आपण जर या खाजेकडे दुर्लक्ष केले तर ही च खाज नंतर गंभीर त्वचाविकारकडे प्रवास करते आणि अशावेळी आपल्याला खूप सार्या औषध सेवन करावे लागतात. जर तुम्हाला सुद्धा शरीरावर खाज,अंगावर लाल चट्टे निर्माण होत असतील तर अशावेळी सांगितलेला उपाय अवश्य करा चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल..
आपल्या अंगावर खाज,खरुज हे बहुतेक वेळा फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे होत असते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला हळद लागणार आहे परंतु आपल्याला हळद ही दळलेली किंवा बारीक केलेली घ्यायची नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला हळकुंडाचा वापर करायचा आहे वाटल्यास आपण नंतर हळकुंड बारीक वाटू शकतो परंतू बाजारामधून रेडिमेट आणलेली हळद आपल्याला वापरायची नाही.
हळदीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक गुणधर्म सांगण्यात आलेले आहे. हळदी मध्ये अँटी सेप्टिक गुणधर्म असतात आणि त्यामुळे जर आपल्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झाले असतील तर ते दूर होण्यास मदत होते. आपल्याला हा उपाय करण्यासाठी खोबरेल तेल सुद्धा लागणार आहे. खोबरेल तेलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन ई उपलब्ध असते आणि यामुळे आपल्या केसांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते व त्याचबरोबर आपली त्वचा सुद्धा चमकु लागते त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी कापूर घ्यायचा आहे.
कापुरचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक महत्व सांगण्यात आले आहे तसेच कापूरच्या अंगी अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झाला असेल तर तो दूर करण्यासाठी मदत होत असते तसेच आपण पूजेसाठी जो कापुर वापरतो तोच कापूर आपल्याला इथे वापरायचा आहे परंतु कापूर हा उघडा ठेवल्याने हवेत उडून जातो म्हणूनच कापूरची डबी आपल्याला घट्ट करून ठेवायची आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन कापूर च्या वड्या लागणार आहेत त्यानंतर आपल्याला कापूर ची पावडर बनवायची आहे. हे सर्व पदार्थ वापरून आपण आपल्या शरीरावरील फंगल इन्फेक्शन तर दूर करणार आहोत पण त्याचबरोबर आपल्याला काही व्यक्तिगत काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. जेव्हा आपण आंघोळीला जातो तेव्हा आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव स्वच्छ धुणे गरजेचे आहे,साबणाने त्याची साफसफाई करणे गरजेचे आहे व त्यानंतर अंग सुद्धा स्वच्छ व सुकलेल्या कपड्याने टॉवेलने पुसणे गरजेचे आहे.
बहुतेक वेळा आपल्या शरीरावर घाम वारंवार आल्याने किंवा पाणी असल्याने नंतर शरीरावर पांढरे डाग निर्माण होऊ लागतात आणि त्यानंतर हळूहळू त्वचा कोरडी पडून त्यावर खाज सुटू लागते. सुरुवातीला आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण नंतर या सगळ्या गोष्टी भयंकर स्वरूप धारण करत असतात आणि म्हणूनच तुम्हाला व्यक्तिगत काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे.
आता आपल्याला एका वाटीमध्ये एक चमचा हळद घ्यायची आहे व त्यामध्ये कापुरचे पावडर टाकायची आहे व त्यानंतर एक ते दोन चमचा खोबरेल तेल मिक्स करून ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित रित्या बनवण्याची आहे. ही पेस्ट प्रभावित जागेवर लावण्याआधी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुरटी टाकायची आहे. आपल्या सर्वांना तुरटीचे फायदे माहिती आहे.
तुरटी पूर्वीच्या काळापासून जंतु नाशक म्हणून ओळखले जाते तसेच आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झाले असेल तर ते फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असते. जर तुमच्याकडे तुरटी नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेले डेटॉल सुद्धा वापरू शकता.या मध्ये सुद्धा असे काही अँटी सेप्टिक गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्या शरीरावरील जंतू पूर्णपणे नष्ट होतात.
प्रभावित जागा स्वच्छ धुतल्या नंतर आपण बनवलेली जी पेस्ट आहे ती खाज येणाऱ्या जागेवर लावायचे आहे.ही पेस्ट रात्रभर तसेच ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यावर स्वच्छ पाण्याने ती जागा धुवून टाकायची आहे, अशा पद्धतीने जर आपण एक दिवस हा उपाय केला व जर तुम्हाला फरक पडत नसेल तर तुम्ही हा उपाय अजून सातत्याने 15 ते 20 दिवस सुद्धा करू शकता.
हा उपाय केल्याने तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागत नाही कारण की हा उपाय करण्यासाठी आपण जे काही पदार्थ वापरले आहेत ते संपूर्ण नैसर्गिक असल्याने आपल्या शरीराला फायदा होतो परंतु काही काही त्वचाविकार एक दिवसाच्या वापराने दूर होत नाही म्हणून आपल्याला साधारण पंधरा दिवस तरी हा उपाय करायला हवा म्हणून हा उपाय अवश्य करून पहा आणि तुमचे आरोग्य चांगले ठेवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. News38media याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.