मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक आजारांचा सामना बऱ्याच लोकांना करावा लागतो. या आजारामुळे जगणे देखील काही लोकांना नकोसे होते. कितीही औषधे, दवाखाने केले तरी त्यांची ही समस्या कमी होत नाही. कंबरेच्या वेदना किंवा कंबर दुखणे, पाठदुखी, गुडघेदुखी ही घरोघरी दिसणारी समस्या झाली आहे. व्यायामाचा अभाव, आधुनिक जीवनशैली, कोणत्याही शारीरिक स्थितीमध्ये बसणे, एकाच जागी खूप वेळ बसून काम करणे यांसारख्या गोष्टींमुळे अगदी तरुण वर्गात सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. तसेच हाड जर दुखत असतील हाडांचे जॉईंट दुखत असतील किंवा एखादी शीर जर दबलेली असेल, हाड ठणकत असेल आणि दुखत असतील गुडघेदुखी आहे किंवा कंबर दुखी आहे. पायांमध्ये वेदना होत असतील तर या या सर्व प्रकारच्या समस्यांवरती एक अत्यंत प्रभावशाली घरगुती उपाय आम्ही सांगणार आहोत.
मित्रांनो, यासाठी जे साहित्य लागतं ते आपल्या सर्वांच्या किचनमध्ये अगदी सहजासहजी उपलब्ध होणार आहे. पहिला पदार्थ आहे काळी मिरी. तीन ते चार काळी मिरी लागणार आहेत. काळे मिरी कुटून बारीक कुटून घ्यायच्या आहेत.
मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला दुसरा पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे आलं म्हणजेच अद्रक. आल्याचा छोटासा एक तुकडा घ्यायचा आहे आणि तो वाटून किंवा आपण ठेचून घेऊ शकतो.
मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये एक तिसरी वस्तू ॲड करायचे आहे ती म्हणजे दूध. एक ग्लास दुधात मिरी आणि आल्याच मिश्रण घालून तापवण्यासाठी गॅस वरती ठेवा. चार ते पाच मिनिटे दुधात उकळू द्या. यामुळेच मिरी आल्याचा पूर्ण अर्क दुधात उतरेल. दुध गाळून घ्यायच आहे. यात आणखी एक पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे खडीसाखर. एक चमचाभर खडीसाखर दुधात विरघळू घ्या. अशा प्रकारे तयार केलेल दुध दररोज जेवणानंतर अर्ध्या तासाने झोपण्यापूर्वी सेवन करायच आहे. हे दूध एकदाच प्या.
मित्रांनो, हा उपाय इतका प्रभाव आहे की फक्त दोन ते तीन दिवसात जर आपण तीन दिवस लागतात. हा उपाय जर केला तर या उपायांमुळे नसा मोकळ्या करण्याचं काम हा उपाय करतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की, जे प्रमाण सांगत आहोत अगदी बरोबर तंतोतंत तितकच प्रमाण आपण वापरायचा आहे. कारण आपण याचं प्रमाण हे जास्त घेतलं तर त्यामुळे आपल्याला मुळव्याध किंवा उष्णतेचा त्रास या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.
मित्रांनो आलं किंवा काळी मिरी यांच्यामध्ये नसा मोकळ करण्याचा सामर्थ्य असतं. याच्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत की आपल्या बंद पडलेल्या आखडलेल्या नसा मोकळ्या होतात. हाडांना मजबूतपणा येतो. तसेच सांध्यांचे वंगण पूर्ववत करण्याचं काम मिरी आणि आल करतात.
मित्रांनो, या उपायासोबत तुम्ही सकाळी उठल्यानंतर कोवळ्या सूर्यप्रकाशात पंधरा-वीस मिनिटे बसा आणि दुसरी गोष्ट तिळाचं तेल. या तिळाच्या तेलाने आपण मालिश करा. यामुळे तुमचे सांधे दुखतात गुडघे दुखतात पाठदुखीचा त्रास आहे कंबर दुखी आहे त्या तिळाच्या तेलाने कमी होईल. तसेच अक्रोड सारख्या पदार्थाचे सेवन करा. सात ते आठ दिवसात तुमची गुडघेदुखी किंवा हाडांचा दुखणे कमी होतं.
मित्रांनो हा उपाय सलग एक महिना करावा लागेल. या उपायाने तुमची गुडघेदुखी बंद होईल. घोटेदुखी बंद होईल. टाच दुखणे पूर्णपणे बंद होईल. पोटरीमध्ये गोळा येणे बंद होईल. अखडलेल्या नसा मोकळ्या होतील. हा उपाय करून पहा. पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला फरक जाणवू लागेल. सहज सोपा उपाय आहे मित्रांनो नक्की करून पहा.
तर मित्रांनो घरच्या घरी करता येणारा हा आयुर्वेदिक उपाय नक्की करून पहा. ज्यामुळे तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही आणि तुमचे हे रोग देखील पूर्णपणे निघून जातील.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.