सहा महिन्यापासून जानवणाऱ्या हार्ट अटॅक च्या या पाच लक्षणाकडे ; अजिबात दुर्लक्ष करू नका ! नाहीतर जीव ही जाऊ शकतो वेळात वेळ काढून एकदा नक्की वाचा आणि आपला जीव ही वाचावा ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे आजार डोके वर काढत आहेत. नवनवीन रोग उद्भवत असल्याने माणसाचे आयुष्यमान हे खूप संकटात सापडलेले आहे. मित्रांनो हार्ट अटॅक हा एक भयंकर रोग आहे. हा कधी कोणाला येईल हे सांगता येत नाही. हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला काही लक्षणे दाखवून देत असते. ती लक्षणे कोणतीही याची माहिती आपल्याला नसते. म्हणून आज आपण या लेखातून या लक्षणांनी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आजकालच्या या ताण-तणावाच्या जीवनामध्ये कोणतेही कारण असताना आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते आणि अलीकडे, हृदयविकाराच्या वाढत्या प्रकरणांमध्ये जीवनशैलीचे अनेक घटक कारणीभूत आहेत. हल्ली तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक आहे. उच्च रक्तदाब, निद्रानाश, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तर मित्रांनो आज आपण याच काही लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो तुम्हालाही ज्यावेळी ही लक्षणे जाणवतील त्यावेळी समजून जा की, आता तुम्हाला सावध राहायला पाहिजे. कारण तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो कोणतेही ती लक्षणे हे हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपल्याला जाणवतात. याबद्दल आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो यामधील सर्वात पहिले लक्षण म्हणजे छातीत दुखणे. सायकल चालवल्यामुळे, जिना चढल्यामुळे किंवा कोणतेही काम करत असताना अचानक जर छातीत दुखायला सुरुवात झाली तर समजुन जा की, ही आर्ट अटॅक येण्याची लक्षणे आहेत. त्याचबरोबर मित्रांनो त्याच्या पुढचे म्हणजे दुसरे लक्षण आहे उलटी येणे किंवा मळमळ होणे. बऱ्याच वेळा आपल्याला मळमळ होत असतात किंवा उलटी येत असते. या वेळी आपण पित्ताचा त्रास किंवा ऍसिडिटी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. परंतु हे लक्षण हृदयाकडून देखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका.

मित्रांनो तिसर लक्षण म्हणजे चक्कर येणे. काही कारण नसताना अचानक जर आपल्याला चक्कर येत असेल तर, हे सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे लक्षण आहे. हार्ट अटॅक येण्याच्या वेळी आपल्या शरीराला रक्त पुरवठा होण्याचा बंद होत असतो आणि त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा न झाल्यामुळे आपल्याला चक्कर येण्याची शक्यता असते. म्हणून ह्याच्याकडे देखील दुर्लक्ष करू नका. चौथ लक्षण म्हणजे छाती जड होणे किंवा छातीवर दडपण आल्यासारखे होणे. असे होणे देखील हार्ट अटॅक येण्याचे लक्षण मानले जाते. पाचवे लक्षण म्हणजे दम लागणे. जर आपल्याला श्वासास त्रास होत असेल, श्वास घेण्यामध्ये त्रास होत असेल तर, समजून जा की हे देखील हार्ट येण्याचे लक्षण आहे.

मित्रांनो पुढचे लक्षण म्हणजे खूप घाम येणे. काहीही श्रमाचे काम न करता जर, आपल्याला घाम येत असेल तर, हे देखील हार्ट अटॅक चे लक्षण आहे. कोरडा खोकला येणे, अचानक पणे जर कोरडा खोकला येत असेल तर हा देखील हार्ट अटॅक येण्याचे लक्षण मानले जाते. अस्वस्थता होणे, होणे चेहरा पडल्यासारखा होणे हे देखील हार्ट अटॅक चे लक्षण असू शकते. डोके जड होणे, डोक्यात खूप कळ येणे हे देखील हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. त्याचबरोबर मित्रांनो हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, एखाद्या व्यक्तीला खांदे, हात, पाठ, मान, जबडा आणि दातांमध्ये अस्वस्थता किंवा वेदना जाणवते. कधीकधी ही वेदना पोटाच्या वरच्या भागात देखील दिसून येते.

मित्रांनो या लक्षणांव्यतिरिक्त, हृदयविकाराच्या झटक्याची इतर लक्षणे म्हणजे छातीत दुखणे जसे की दाब, पिळणे आणि घट्टपणा, थंड घाम येणे, थकवा, अपचन, चक्कर येणे, मळमळ आणि धाप लागणे. तर मित्रांनो अशाप्रकारे ही काही लक्षणे आहेत. ज्यामुळे आपण हार्ट अटॅक येणार असेल तर, तो जाणून घेऊ शकतो व त्याच्यावर योग्य वेळेत उपचार करू शकतो. त्यामुळे अशी काही लक्षणे आपल्यात आढळल्यास आपण लगेच दवाखान्यात जावे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.