मित्रांनो, रसरशीत, लालबुंद आणि भरपूर स्वादिष्ट असे कलिंगड साऱ्यांनाच खायला आवडते. उन्हाळ्यात कलिंगड अतिशय आवडीने खाल्ले जाते. कलिंगडाला उन्हाळ्याचे फळ म्हटले जाते. कलिंगडामध्ये ९२ टक्के पाणी असते. उन्हाळ्यात हे फळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि शरीराला एनर्जी भेटते. कलिंगडामध्ये पोटॅशियम, आर्यन, कॅल्शियम, कॉपर, मॅग्नेशियम, व्हिटामिन ए, व्हिटामिन बी१, बी६, सी आणि डी तसेच लायकोपीन सारखी पोषकतत्वे असतात. यासाठी हे फळ खूप गुणकारी मानले जाते. मात्र हे फळ खाताना काळजी घेतली पाहिजे. नाहीतर उलट त्रास होण्याची शक्यता आहे.
मित्रांनो आज आपण अशाच काही चुका पाहणार आहोत ज्या चुका आपण कलिंगड खाल्ल्यानंतर करायच्या नाहीत, कलिंगडमध्ये साधारण 92 ते 96 टक्के पाण्याचं प्रमाण असते. यामुळे अगोदरच आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण चांगले असते त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे शक्यतो टाळावे. पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या फळांवर पाणी पिल्यास कॉलरा देखील होऊ शकतो. मात्र फळ इंफेक्टेड असेल, तरच असं होऊ शकते. फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून कुणीही ते खाऊ शकत नाही. किडनीचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण आणि हदयाचा आजार ज्यांना असेल, त्यांनी कलिंगड खाणे शक्यतो टाळावे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बऱ्याच लोकांना सवय असते कुढलेही फळ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायचे. मात्र, कलिंगड खाल्ल्यावर पाणी पिणे टाळलेच पाहिजे. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. कारण पाण्याचे प्रमाण कमी होताच आपण आजारी होऊ शकतो. म्हणून शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो.
उन्हाळ्यात स्वत: ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणून, उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी कलिंगड हा एक चांगला पर्याय आहे. कलिंगडमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते.
आणि त्याचबरोबर मित्रांनो उन्हाळ्यात बाहेर फिरल्यामुळे अनेक लोक आजारी पडतात. यामुळे घराच्या बाहेर जाताना कलिंगड खाल्ले पाहिजे. ज्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा भरपूर वेळ टिकून राहते. काम करताना धकवाही जाणवत नाही.रात्री कलिंगड खाल्ल्याने वजनन वाढते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस याचे सेवन नको. तसेच पोटासंबधीचे आजार होतात.दररोज ड्रिंक करणाऱ्यांनी कलिंगड खाऊ नये. डायबिटीज असलेल्या लोकांनी कलिंगडाचे सेवन कमी प्रमाणात करावे नाहीतर शरीरात ग्लुकोजची पातळी वाढू शकते.
आणि मित्रांनो हार्टच्या समस्या हार्टच्या समस्येने वेढलेल्या लोकांनी कलिंगडचे सेवन करणे टाळावे. कारण कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. डॉक्टर म्हणतात की हार्टच्या समस्या असलेल्या लोकांनी कलिंगड खाऊ नये. कारण यामुळे हार्टची समस्या वाढते आणि मधुमेह समस्या मधुमेह एक जीवनशैली संबंधित समस्या असल्याने मधुमेही रूग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात साखर असते. अशा परिस्थितीत साखरेचे रुग्ण अधिक कलिंगड खाल्ले तर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल.
म्हणून मधुमेह रूग्णांनी टरबूज मर्यादित प्रमाणात घ्यावा.दम्याचे रुग्ण आणि कलिंगड दमा हा एक अत्यंत गंभीर आजार आहे. म्हणूनच, या आजाराशी झगडणाऱ्या लोकांनी आपल्या अन्नाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. दम्याच्या रूग्णांसाठी जास्त कलिंगड सेवन करणे योग्य नाही. याचे कारण असे आहे की अमिनो अॅसिड आहे. जर रुग्ण अधिक टरबूजचे सेवन करतात तर दम्याचा त्रास होण्याचा धोका वाढू शकतो. मूत्रपिंडातील समस्या आजकाल लोकांमध्ये किडनीची समस्या देखील सामान्य झाली आहे.
आणि मित्रांनो मूत्रपिंडाच्या समस्या देखील जीवनशैलीशी संबंधित असतात. डॉक्टरांच्या मते, आजकाल तरूणांमध्येही किडनीची समस्या सामान्य झाली आहे. किडनीच्या समस्येने ग्रस्त लोकांनी टरबूज जास्त सेवन करू नये कारण त्यात खनिजांचे प्रमाण जास्त आहे. म्हणून, कोणतीही गंभीर समस्या टाळण्यासाठी, अशा लोकांनी फक्त टरबूज मर्यादित प्रमाणात खावे.
वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.