चेहऱ्यावरचे जुनाट काळे डाग कायमचे घालवा ते पण मुळापासून फक्त या खास तीन घरगुती टिप्सने एक वेळेस नक्की करून पहा …….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येकालाच सुंदर दिसावं, आपला चेहरा हा कोणत्याही कार्यक्रमात गेल्यानंतर उठून दिसावा असे म्हणून वाटत असते. परंतु मित्रांनो आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या काळ्या डागामुळे आपल्याला कोणत्याही कार्यक्रमात जाणे नकोसे वाटते. काळे डाग चेहऱ्यावर उठल्यानंतर अनेक ब्युटी प्रॉडक्टचा वापर देखील करतो. परंतु काही वेळेस अशा या ब्युटी प्रॉडक्टचा आपणाला साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. मित्रांनो अनेक जणांना आपल्या चेहऱ्यावरती पिंपल उटतात. परत ते पिंपल्स निघून जातात. परंतु आपल्या चेहऱ्यावर त्या पिंपल्समुळे काळे डाग आहेत तसेच राहतात.

तर मित्रांनो या काळ्या डागांवरती आज मी तुम्हाला असा एक घरगुती आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील. तुमचा चेहरा आकर्षक दिसेल. तर हा घरगुती उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती नक्कीच फरक जाणवेल. चला तर मग जाणून घेऊयात हे घरगुती उपाय नेमके कोणते आहेत ते.

तर मित्रांनो आपल्याला काळ्या डागांवरती घरगुती उपाय करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे दही. बऱ्याच जणांना दही सेवन करणे खूपच आवडते. दही हे आपल्या शरीराला खूपच फायदेशीर असते. तर मित्रांनो आज आपण काळ्या डागांवरती दह्याचा वापर करणार आहोत. दह्यामध्ये मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टी तसेच लॅक्टिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. तर हे गुणधर्म असणारे घटक आपल्या चेहऱ्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात. तर तुम्हाला दोन ते तीन चमचे दही घ्यायचे आहे आणि हे दही घेऊन हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावरती मॉलिश करायच आहे. यामुळे मित्रांनो तुमच्या चेहऱ्यावरील जे काही डाग आहेत ते डाग निघून जाण्यास मदत होईल.

दह्याने आपल्या चेहऱ्यावरती मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते. तुम्हाला हा मसाज दोन ते तीन मिनिटे आपल्या चेहऱ्यावरती करायचा आहे. अगदी हलक्या हाताने तुम्हाला हा मसाज करायचा आहे. तुम्हाला हे दही दहा ते पंधरा मिनिटे तसेच आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचे आहे. जरास सुकल्यानंतर तुम्हाला आपला चेहरा धुवायचा आहे. तुम्ही हा उपाय दररोज करू शकता किंवा कधीतरी करू शकता. हा उपाय केल्याने तुम्हाला नक्की जाणवेल की तुमच्या चेहऱ्यावरती जे काही काळे डाग आहेत ते काळे डाग कमी होऊ लागले आहेत ते.

मित्रांनो दुसरा उपाय आहे त्या उपायासाठी आपणाला लागणार आहे लिंबू आणि गुलाब जल. गुलाब जल तुम्हाला मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध होईल. तर मित्रांनो तुम्हाला हे गुलाब जल दोन चमचे घ्यायचे आहे आणि दोन चमचे लिंबूचा रस घ्यायचा आहे. हे दोन्हीही रस एकत्रित मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण तुम्हाला कापसाच्या बोळ्याने आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे.

लावल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवायचे आहे. पंधरा मिनिटे झाल्यानंतर तुम्हाला आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. तर हा उपाय तुम्ही दररोज ही करू शकता किंवा कधीतरीही करू शकता. याच्या एक किंवा दुसऱ्या उपायाने तुम्हाला लगेचच फरक जाणवू लागेल की, आपल्या चेहऱ्यावरील जे काळे डाग आहेत हे कमी होऊ लागले आहेत.

तिसरा उपायासाठी आपणाला लागणार आहे बेसन. बेसन मध्ये स्क्रीन व्हाइटनिंग प्रॉपर्टी भरपूर प्रमाणात असते. तसेच मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात असते. आणखी एक घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे हळद. हळद ही आपल्या चेहऱ्याला चमकदार बनवते. तिसरा घटक जो लागणार आहे तो म्हणजे कच्च दूध. कच्च दूध हे आपल्या स्किनसाठी खूपच फायदेशीर ठरतं. कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड हा गुणधर्म असल्यामुळे जे तुमचे चेहऱ्यावरील काळे डाग आहे ते निघून जाण्यास मदत होईल.

तर तुम्हाला दोन चमचा कच्चे दूध घ्यायचे आहे. एक चमचा बेसन आणि चिमूटभर हळद घ्यायची आहे. हे सर्व पदार्थ एकत्रित मिक्स करायचे आहेत आणि ते आपल्या चेहऱ्याला लावायचे आहे. पंधरा मिनिटे तसेच ठेवून तुम्हाला नंतर आपला चेहरा धुवायचा आहे.

यामुळे तुम्हाला जाणवू लागेल की, आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग हे निघून जात आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या उपायातच तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल. तर मित्रांनो असे होते हे तीन घरगुती उपाय ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे काळे डाग आहेत ते निघून जाण्यास मदत होईल. तर असे हे आयुर्वेदिक घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.