मित्रांनो हिंदू धर्मामध्ये सणांची काही कमतरताच नाही. हे सण जितके उत्साही, आनंदी आहेत तितकेच अर्थपूर्ण सुद्धा आहेत. शेवटचा मराठी महिना म्हणजे फाल्गुन आणि या महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते ती फाल्गुन पौर्णिमा म्हणून संबोधले जाते. पोर्णिमेला होळीची पौर्णिमा सुद्धा असे म्हणतात. वाईट विचार ,वाईट प्रवृत्ती ,वाईट दृष्टीकोण या होळीमध्ये जळून चांगले विचार, सकारात्मक विचार निर्माण करणे हा या होळीचा अर्थ आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी असणारा सण म्हणजे रंगपंचमी आणि आपले आयुष्य सुद्धा या रंगाप्रमाणे नेहमी भरलेले असावे असा संदेश देणारा या सणाचा अर्थ असतो.
जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत पैसा टिकत नाही आर्थिक अडचणी आहेत पैसा येत नाही या सर्व समस्या दूर करण्यासाठी काही तांत्रिक उपाय आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत आणि ही उपाय विशिष्ट तिथीला केल्यामुळे त्यांचे फळ सुद्धा चांगले प्राप्त होते आणि होळी ही पौर्णिमेच्या रात्री असल्यामुळे माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या पौर्णिमेच्या रात्री आणि तसे महत्त्वाचे उपाय केले जातात जेणेकरून माता महालक्ष्मी खुश होईल व आपल्यावर कृपा वर्षाव करील म्हणून आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशा काही वस्तू ज्या आहेत ,त्या आपल्याला होळीच्या आधी आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहेत.
चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत त्या वस्तू ज्या आपल्याला होळीच्या अगोदर आपल्या घरातून बाहेर काढायचे आहेत.
यामधील सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे घरात असणाऱ्या तुटलेल्या तुटलेल्या वस्तू किंवा खूप दिवसापासून जमा झालेले भंगार, मित्रांनो घरामधील काही जुन्या वस्तू तुटलेले असतील आणि ते आपण एक कोपऱ्यांमध्ये तसंच ठेवून दिली असतील, तर मित्रांनो यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये जास्त काळ टिकून राहत नाही म्हणूनच आपल्या घरांमध्ये ही जर तुटलेल्या फुटलेल्या वस्तु असतील किंवा लोखंडाचे भंगार आपण खूप दिवसापासून साठवून ठेवलेले असेल तर ते आपल्याला होळीच्या अगोदर घरातून बाहेर काढायचे आहे.
मित्रांनो त्यानंतर पुढची वस्तू आहेत त्या म्हणजे घरात असणारे जुने कपडे आणि त्याचबरोबर खराब झालेले इलेक्ट्रिक सामान मित्रांनो या वस्तूही आपण आपल्या घरामध्ये जास्त काळ परंतु ठेवल्या तर यामुळे आपल्या घरात असणारे माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरांमधून निघून जाते त्यामुळे शक्यतो खराब झालेले कपडे इलेक्ट्रिक सामान आपल्याला वेळच्यावेळी घरातून बाहेर काढले पाहिजे आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये असणाऱ्या देवी देवतांच्या प्रतिमा किंवा मूर्ती काही खराब झाले असतील तर त्याही आपल्याला होळीच्या आधी आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत.
मित्रांनो वर सांगितलेल्या वस्तू जर आपण होळीच्या आधी घरातून बाहेर काढले नाही तर यामुळे घरांमध्ये नकारात्मक
ऊर्जा निर्माण होते आणि यामुळेच माता लक्ष्मी आणि इतर देवी देवता आहे आपल्यावर नाराज होतात आनंद या वस्तू जर तुमच्या घरांमध्ये असतील तर होळीच्या आधीच तुम्हाला या घरातून बाहेर काढायचे आहेत यामुळे घरावर महालक्ष्मीचा आशीर्वाद राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.