मित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा अनेक स्वामी सेवेकरी करतात. मनापासून जे पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने स्वामींना शरण जातात त्यांच्यावर स्वामी प्रसन्न होतात. स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहतात. कारण स्वामींनी फक्त प्रयत्न करत रहा, घाबरू नका असे सांगितले आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन आहे. स्वामी त्यांच्या सर्वच भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांचं आयुष्य सुरक्षित करतात, आनंदीत बनवतात. स्वामींची योग्य आणि अचूक,नियम पाळून सेवा केली तर आपल्याला त्याच फळ खूप मोठ मिळतं.
ही सेवा तुमच्या मनात जर कोणतीही इच्छा असेल तर करा, ही एक सोपी स्वामी सेवा आहे. तुम्हाला बिझनेस करायचा असेल, संतती नसेल, चांगली नोकरी हवी असेल, घर हवं असेल किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काहीही गोष्टी असतील त्यासाठी स्वामींची सेवा ही स्वामींच्या केंद्रातून, मठातून दिली जाते आणि जर आपण विश्वासाने, मनोभावाने ती सेवा त्या दिवसापर्यंत म्हणजे 21 दिवस, 3 महिने, 1 महिना जशी असते तशी केली, आपल्याला जशी जी सांगितली आहे ती आपण विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ज्या कार्यासाठी आपण की सेवा करतो ते कार्य सुद्धा आपली पूर्ण होतात.
ही सेवा आहे इच्छापूर्तीसाठी. ही जी सेवा आहे ती तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करा. तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल. सेवा करण्याआधी हे एक छोटे काम करा. आणि तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे, तो संकल्प साध्या सरळ पद्धतीने तुम्ही सोडू शकता.
तुम्ही देवघरासमोर बसा आणि एक ताट ताम्हण घ्या, आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्या आणि जी ही तुमची इच्छा आहे ती बोला, जे काही तुम्हाला हव आहे ते बोलायचे आहे, ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी स्वामी तुमची सेवा करतोय, माझी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करा किंवा जे हव आहे ते बोलायचं नंतर ते पाणी ताम्हणात सोडावे.
त्यानंतर ते पाणी तुळशी मध्ये टाकू शकता व कोणत्याही दिवसापासून, महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा संकल्प करा आणि गुरुवारपासूनच ही सेवा तुम्ही सुरु करावी. तर मित्रांनो कमीत कमी तीन महिने ही सेवा करा. तुमची इच्छा पूर्ण होईल. यासाठी तुम्हाला स्वामींचे सारामृत पारायण करायचे आहे.
रोज तीन अध्याय वाचायच आहे. हे पूर्ण 21 अध्याय पारायण असते. रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचा, सात दिवसात 21 अध्याय पूर्ण होतील आणि मित्रांनो पुन्हा आठव्या दिवसापासून नवीन तीन अध्याय वाचावेत, असे सातत्य तुम्हाला तीन महिन्यापर्यंत ठेवायचे आहे.
त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामी समर्थांची नित्यसेवा हे पुस्तक, पोथी असेल तर त्यामध्ये गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे तो गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला एक वेळेस वाचायचा आहे. सारामृत तीन अध्याय वाचून झाल्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय रोज नित्यपणे वाचायचा आहे.
हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप अकरा माळी किंवा 11 माळी जमत नसतील तर कमीत कमी एक माळ करायची आहे आणि मित्रांनो तुमच्य इच्छापूर्तीसाठी तुम्हाला या तीनच गोष्टी करायचे आहेत. मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने ही सेवा करा. जी इच्छा असेल ती पूर्ण होईल.
संकल्प रोज तुम्हाला सोडायचा नाहीये. ज्या दिवसाची सेवा कराल त्याच दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे, नंतर तुम्ही अगरबत्ती लावून रोज सेवा करू शकतात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.