आयुर्वेदातील आपल्या घराशेजारील चमत्कारिक वनस्पती, मूळव्याधाचे मुळंच नाहीसे करते, मूळव्याध समूळ मुळापासून संपवा ; डॉ ; स्वागत तोडकर टिप्स ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो मूळव्याध हा मानवी शरीराच्या मूळाशी जी व्याधी होते तो आजार आहे. या रोगास संस्कृतमध्ये अर्श असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत यात विनारक्तस्त्राव व रक्तास्त्रावसहित. तर मित्रांनो या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये जे रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्त्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्त्राव झाल्यास रक्त कमतरता निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होउ शकतो. या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे.

मित्रानो मूळव्याध ही समस्या आपल्यातील बऱ्याच जणांना आहे आणि मित्रांनो हा मूळव्याध बऱ्याच आणि त्याचबरोबर उपायांनी बरा होत नाही. कारण मूळव्यादाची कारणे वेगवेगळी असतात. आणि मूळव्यादाचे प्रकार पण वेगळे असतात. आज आम्ही मूळव्याध समूळ नष्ट करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे.

आपण आपल्या आजूबाजूला घाणेरी वनस्पती पाहिली असेल, तिला टंटणी पण म्हणतात. तर तुम्हाला ही वनस्पती कुठे ही मिळून जाईल. तर आपण याचा उपाय कसा करायचा आहे, ते आपण जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तींना मूळव्याध झाला आहे त्यांनी या वनस्पतीची 5 किंवा 10 पाने घ्या.

10 पाने घेतली तर 1 ग्लास पाणी घ्या, 5 पाने घेतली तर अर्धा ग्लास पाणी घ्या. आणि त्यामध्ये ती टाकायची आहेत. नंतर ती उकळून घ्यायची आहेत. उकळून घेतल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचे आहे. आणि ते पाणी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी एक कप म्हणजे एक वेळेला एक कप याप्रमाणे सेवन करायचे आहे प्यायचे आहे.

तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल. त्याच प्रमाणे तुम्ही या पानांचा डायरेक्ट सुद्धा उपयोग करू शकता तर तो कसा… याची 5 पाने घ्या कवळी पण अति कवळी नसावी मध्यम स्वरूपाची 5 पाने घ्या. ती 5 पाने रोज सकाळी उपाशी पोटी चावून खायची आहेत. यावर अर्धा तास तुम्ही काहीही खायचं नाही.

अजून समजा तुम्हाला मुळातूनच मूळव्याध नष्ट करायचा आहे तर या वनस्पतीची मुळे काढा. या घाणेरीची तुम्ही एक 50 ग्रॅम मुळे काढा. जर तुमचा मूळव्याध मोठा असेल तर 100 ग्रॅम काढा. हे मूळ वाळवा आणि त्याचे चूर्ण बनवा. त्यानंतर हिरडा घ्या. तुम्हाला आयुर्वेदिक मेडीकल मध्ये कुठे ही मिळेल. ते हिरडा चूर्ण घेऊन या.

1 चमचा हिरडा चे चूर्ण, 1 चमचा मुळी चे चूर्ण, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकून मिक्स करा. रोज सकाळी उपाशी पोटी हे तुम्ही सेवन करायचं आहे. जोपर्यंत तुमचा मूळव्याध बरा होत नाही. या उपायांमुळे जे रक्त गळू शकते पण त्रासदायक मूळव्याध लवकर बरा होतो.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.