मित्रांनो आपण अनेक वेळा स्वामी समर्थांचे वेगवेगळे अनुभव वाचत आणि ऐकत असतो आणि मित्रांनो हे ऐकल्यानंतर आपल्याला स्वामींचे शक्ति बद्दलची जाणीव नक्कीच होते आणि मित्रांनो असाच एक अंगावर शहरांना आणि डोळ्यात पाणी आणणारा एक छोटासा स्वामी आणि आज आपण पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणता आहे तो आजचा स्वामी अनुभव तर मित्रांनो एका छोट्याश्या गावात एक कुटूंब राहत होते त्या कुटूंबात यशोदा मामी या थोड्या वयस्कर होत्या त्याना एक मुलगा होता. यशोदा मामी या काम करत, सत्त स्वामींचे नामस्मरण करत असत एके दिवशी जोराचा पाऊस सुरु झाला होतात.
आणि त्या दिवशी त्यानी पहाटे पासून स्वामींचे गुरुचरित्र वाचण्यास सुरवात केली होती. आणि त्या नंतर स्वामींच्या नामाचा जप सतत चालू असे. अण्णा मामा यांच्या घरात आध्यत्मिक गोष्टीची ओढ जास्त होती. आणि काही वर्षा पूर्वी यशोदा मामीला अण्णा मामा अक्कलकोट घेऊन गेले होते. आणि त्या वर्षा पासून मामीला स्वामींची आराधना करण्याची ओढ लागली ते अजून सुद्धा नामस्मरण चालू आहे. त्याच सोबत मामींचा स्वभाव खुप चागला होता त्यामुळे गावातील सर्व व्यक्ती त्यांच्या सोबत नेहमी बोलत असे. कोणत्याही अडचणी असतील तर ते घरी येऊन त्यांच्या जवळ बोलत असे. गावातील काही व्यक्ती अण्णा मामा आणि यशोदा मामी यांच्या सोबत बसून मार्गदर्सन घेत असे.
पण त्या दिवशी यशोदा मामी थोड्या चिंतेत होत्या काही नव्हे येवढा पाऊस दोन दिवसा पासून सुरु होता. पण घरात आवघडलेली सून शांता, काही वेळा पूर्वी सरकारी नर्स घरी येऊन गेल्या होत्या त्या म्हणाल्या, तुमच्या सुनेला तालुकाच्या गावाला घेऊन जावे लागेल. कारण येथे उपकेंद्रात बाळंत होणे शक्य नाही कारण बाळ फिरले दिसते. त्यावेळे पासून मामीच्या चिंता वाढलेली होती. काय करावे जमजत नव्हते. त्या सोबत स्वामींचे नामस्मरण चालूच होते.
दोन दिवस पासून पाऊस चालू होतात त्यामुळे गाव बाहेर जाणाऱ्या मार्गावर पाणी आले होते. त्यामुळे गावा बाहेर किंवा गावात येण्याचे मार्ग बंद झाले होते. गाडीची व्यवस्था झाली होती पण रस्त्यावर पाणी असल्या मुळे गावा बाहेर जातात येत नव्हते आणि मुलगा हा काही कामा साठी गाव बाहेर गेला होता. त्याला सुद्धा येता जमत नव्हते.
यशोदा मामीला चिंता वाटत होती आता काय होणार करणं सुनेचे दिवस भरले होते, तिला कळा येत होत्या. अण्णा मामाची सुद्धा चिंता वाढली होती. अशा वेळेस मामींनी घरात काम करणाऱ्या व्यक्तीला गावातील सुई मदतीसाठी बोलावण्यास पाठवले होते. पण ती काही कामा साठी बाहेर गेली होती. निरोप देऊन गडी वापस आला. तत्यातच सुनेच्या कळा वाढल्या होत्या.
काही वर्षा पूर्वी मामींनी त्यांच्या मुलीचे बाळंत घरीच केले होते. आपण आत्ताची स्थिती तशी नव्हती. तरी पण मामींनी घरीच सर्व तयारी केली होती. सुती कपडे, नाळ कापण्यासाठी एक ब्लेड. जर अशी वळे स्वामींनी आणली तर त्यांच्या वर भर सोपवून सगळे काम करण्याचे ठरवले होते. मामा देवाचे नामस्मरण करत चिंतेत फिरत होते. तितक्यात एक आवाज आला कोणी आहे का घरात. मामींना वाटले रमा सुई अली म्हणून मामी लगेच बाहेर आपल्या पण त्या ठिकाणी कोणी दुसरीच बाई होती. मामींनी तिला विचारले तू कोण आहेस.
ती म्हणाली रमा आजीने पाठवले आहे. हे ऐकल्यावर मामींची चिंता कमी झाली. हात पाय धून आत येण्यास सागितले. काही वेळानी एका लहानश्या मुलाचा आवाज ऐकू आपला आणि मामा आणि मामीच्या चेहेऱ्यावर आनंद मावेनासा झाला. मामीने मामला संगितले बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहे. अशक्य असणारे काम त्या बाईने चागले केले होते. मामी म्हणाल्या मी चहा करते बस आपण इ म्हणाली नको. मामीने विचारले तुला गावात आधी बघितले नाही ती म्हणली मी रमा आजींच्या दूरच्या नात्यातली असे सागून ती निघाली.
पाऊस कमी झाला होता त्यामुळे सत्यवरील पाणी कमी झाले होते. त्याचा मुलगा घरी आला होता आणि तेवढ्यात रमा आजी अली होती. मामी म्हणाल्या रमा आजीला बरे झाले तुम्ही तुमच्या नात्यातील मुलीला कामा साठी पाठवले. पण रमा आजी म्हणाल्या मी तुमच्या कडे कोणीसुद्धा पाठवले नाही. हे ऐकल्यावर मामा आणि मामी ऐक मेकाकडे बघत राहिले. मामीने गड्याला विचारेल तू कोणाला निरोप देऊन आला होतास त्या वेळेस तो म्हणाल घरी कोणीच नव्हते. हे ऐकल्यावर मामी नि लगेच देवघरात गेल्या आणि स्वामी समोर साखर नैवेद्य म्हणून ठेवला.
मामी हात जोडून स्वामींना म्हणाल्या स्वामी महाराज तुम्ही भक्ता साठी कोणत्या रूपाने समोर येऊन मदत करताल याचा काही नियम नाही. आणि माझ्या नातवाचे भाग्य तुमचे हात त्याला लागले. श्री स्वामी समर्थ!
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.