डॉक्टर असूनही आम्ही दोघेही आयुष्याचा शेवट करायला निघालो होतो, त्या दिवशी आमचे सर्व काही संपले होत पण पुढे जे झाले ते वाचून थक्क व्हाल ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त आहोत. आपण ज्या त्या वारी जा त्या देवी देवतांची विधिवत पूजा देखील करीत असतो. बरेच जण हे शंकरांचे तर कोणी विठ्ठलाचे तर कोणी गणपतीचे भक्त आहेत. अनेक व्रत उपासना ते देवी-देवतांचे करीत असतात. आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे सेवेकरी देखील आहेत. अनेक मठांमध्ये, केंद्रांमध्ये जाऊन ते सेवेकरी स्वामींची सेवा करण्यात मग्न असतात. आपल्या अडचणीतून स्वामींनी बाहेर काढावे तसेच आपणाला योग्य तो मार्ग दाखवावा यासाठी ते स्वामींकडे प्रार्थना देखील करीत असतात.

स्वामी हे आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत. स्वामी हे भक्त श्रीमंत आहे हे न पाहता तर तो जो सेवा करतो ती मनापासून करतो का याकडे स्वामींचे लक्ष असते. तर आज मी तुम्हाला अश्याच एका डॉक्टर पती-पत्नींचा आलेला अनुभव सांगणार आहे आणि हा अनुभव आपण डॉक्टरांच्या शब्दांमध्ये जाणून घेणार आहोत. हा अनुभव डॉक्टर आदित्य यांचा आहे आणि तो आपण त्यांच्या शब्दांमध्ये जाणून घेऊयात.

नमस्कार मी डॉक्टर आदित्य. माझी बायको देखील डॉक्टर आहे आणि आम्ही कळवा येथे राहतो. आमचे कुटुंबीय हे गावाकडे राहत होते. माझी मिसेस आणि मी डॉक्टर असल्यामुळे आमच्या दोघांचेही क्लिनिक वेगवेगळे होते. आमचे दोघांचे लव मॅरेज झाले होते. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये प्रेम खूपच होते.

परंतु नंतर थोड्या दिवसांनी मात्र आमच्या दोघांमध्ये भांडण होऊ लागले. लग्नाला सहा वर्षे झाली तरीही आम्हाला मूल नव्हते. त्यामुळे सतत काही ना काही गोष्टीवरून आमची भांडणे होत राहिली. तसेच घरच्यांकडून देखील प्रेशर होत असल्यामुळे काय करावे काही सुचत नव्हते. कारण आम्हाला मूल होत नव्हते.

दोघांमध्येही काहीही प्रॉब्लेम नसताना देखील आम्हाला या समस्यांचा सामना करावा लागत होता. आम्ही दोघेही डॉक्टर असून देखील आम्ही देखील काहीच करू शकत नव्हतो. आमची भांडणे खूपच व्हायला लागली. नंतर मग आम्ही ज्योतिषांचा देखील आधार घेतला आणि जे ज्योतीष सांगतील तसे आम्ही करायला लागलो.

जेव्हा ते जोतिष पैसे मागतील ज्या त्यावेळी ते पैसे जेवढे मागतील तेवढे मी देत होतो. नंतर नंतर तर आम्ही कर्ज देखील काढून त्यांना पैसे दिले. नंतर आमचा क्लिनिक देखील व्यवस्थित चालेना आणि आमच्या वर भरपूर मोठे कर्ज झाले आणि नंतर आम्हाला समजले की त्या ज्योतिषांनी आम्हाला फसवलं आहे. त्यांनी पैसे काढून घेण्यासाठी आम्हाला फक्त काही उपाय करायला सांगितले.

त्यावेळेस मात्र आम्ही खूपच दोघेजण डिप्रेशनमध्ये आलो. काय करावे काहीच सुचत नव्हते. मग आम्ही दोघांनी शेवटचा पर्याय म्हणून सुसाईड करायचे ठरवले. सर्व काही आम्ही तयारी केली होती आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सुसाईड करणार होतो तर इतक्यातच आमच्या सासूबाई आणि माझी आई दोघीही अचानक आल्या.

त्यांनी अचानक आल्यानंतर आम्हाला एकदम धक्काच बसला. त्यांनी येताना स्वामी समर्थांचा फोटो आणलेला होता आणि त्या फोटोवरती भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य लिहिलेलं होतं आणि त्यांनी तो फोटो आमच्याकडे दिला. ते वाक्य वाचल्यानंतर आम्हाला दोघांनाही एक धीर आल्यासारखा झाला.

माझ्या सासूबाईंनी, आईने आम्हाला स्वामींच्या सेवेबद्दल सांगितले आणि ती सेवा करण्यासाठी देखील सांगितले आणि सर्व काही ठीक होईल असे सांगितले. मग त्यांच्या मनासाठी आम्ही दोघांनीही स्वामींची सेवा करण्यास सुरुवात केली. पहाटे चारला उठून आम्ही स्वामींचे गुरुचरित्र पारायण तसेच स्वामी सारांमृत वाचण्यास सुरुवात केली.

संध्याकाळी मग तारक मंत्र 108 वेळा म्हणण्यास सुरुवात केली. असे हे आम्ही सलग चालूच ठेवले. कारण शेवटी एक आधार म्हणून आम्ही स्वामींना निवडले. नंतर सहा महिन्यातच आम्हाला गुड न्यूज समजली आणि आम्हाला विश्वासच बसला नाही हे सर्व काही स्वामींनीच घडवून आणले होते.

नंतर काही दिवसांनी आमचे क्लिनिक देखील व्यवस्थित चालायला लागले आणि आम्हाला स्वामींचा अनुभव आला. आमच्या दोघांमधील जे काही वादविवाद होत ते पूर्णपणे दूर झाले होते. म्हणजेच आमच्या दोघांमध्ये भांडणे होणे कमी झाले होते आणि आमच्या घरातील सर्वच जण खुश झाले.

नंतर हळूहळू आमचे कर्ज देखील फिटून गेले. खरंच हे मी सांगताना तुम्हाला वाटेल की हे डॉक्टर असूनदेखील हे अंधश्रद्धांना बळी पडतात. परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये खूपच फरक आहे. श्रद्धा ही श्रद्धा असते आणि अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा असते.

परंतु स्वामींची सेवा ही एक श्रद्धा आहे आणि स्वामी आपल्यात आहेत. हे स्वामींनी आम्हाला दाखवून दिले. सेवेकरांच्या भक्तांच्या अडचणी या स्वामींच्या होतात आणि त्या दूर देखील स्वामी करतात. प्रत्येक सेवेकर्‍यांची अडचणीतून सुटका स्वामी करतात याचा प्रत्यय आम्हाला त्यावेळेस आला.

आणि तेव्हापासून आम्ही दोघेही स्वामींच्या सेवेमध्ये बुडून गेलो. तेव्हापासून आम्ही स्वामींच्या सेवेची जी सुरुवात केली ती आजपर्यंत आम्ही करत आहोत आणि स्वामींचा असा हा न विसरणारा अनुभव मला त्यावेळेस अनुभवायला मिळाला.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.