मित्रांनो आपल्यातील अनेकांना आपले देवघर घरात कुठे असावे या बदल माहिती नसते. तसेच काही जण नेहमी चिंतीत असते कि देवघरात कोणत्या देवांचे व देवींचे प्रतिमा किंवा मूर्ती असायला हवी. पूजा अशी करवी या बदल बरेच प्रश्न असतात. देवांचे मुख कोणत्या दिशेला असायला हवे या बदल सुद्धा खुप प्रश्न असतात. त्याचे आजच्या लेखात काही प्रश्नांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
सर्वांचे आपल्या घरातील देवघर हे आपले श्रद्धा स्थान असते. आपली ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्या ठिकाणी आपण कोणतीच चूक होऊनये याची खबरदारी घेत असतो. खरेतर देवघराची दिशा आणि स्थान खुप महत्वाची असते. कारण देवघर हे आपल्या घरातील सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा देणारे स्तोत्र असते. आणि घरातील सकारात्मक ऊर्जा आपल्या कामात यश प्राप्त करण्यासाठी खुप महत्वाची असते.
घरातील प्रत्येक व्यक्तीला अनुभव आला असेल आपल्या घरातील देव पूजा झाली कि खुप प्रसन्न वाटण्यास सुरवात होते. तसेच नवीन काम सुरु करण्यासाठी सुधा एक प्रकारची ऊर्जा आपल्यात निर्माण होते.
खुप जणांना आपल्या घरातील देवघर हे कोणत्या दिशेला असले पाहिजे या बदल खुप मोठ्या शंखा आहेत. आपल्या घरातील देवघर हे उत्तर आणि पूर्व दिशा ज्या ठिकाणी एकत्र येतात म्हणजे ईशान्य कोपरा या दिशेला आपले घरातील देवघर असणे खुप चागले असते.
जर का ईशान्य दिशेला आपले देवघर करता येत नसेल तर हि जागा शक्यतो रिकामी ठेवावी. या जागेवर जास्त वजनाचे किंवा घरातील भंगार साहित्य ठेऊ नये. जर का पण ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवले नाही तर इतरत्र दिशेला ठेवल्यास, आपल्या देवघराच्या वरती किंवा खालती टॉयलेट असणार नाही याची काळजी घ्यावी. पूर्व किंवा पश्चिम दिशेला आपण देवघर करू शकतात. पण देवांचे तोंड हे दक्षिण दिशेला येतील अशा पद्धतीने देव घर करुनये.
देवा घरात कोणत्या देवांच्या प्रतिमा ठेवाव्यात या बदल सुद्धा खुप व्यक्तीना प्रश्न असतात. तर आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांची प्रतिमा अवश्य ठेवा. कारण देवपूजा करताना आपल्या इस्ट देवांचे रोज दर्शन होते. तसेच आपली ज्या देवावर किंवा देवीवर श्रद्धा जास्त आहे. त्यांची प्रतिमा ठेवली तरी चालते. शक्यतो आपल्या पूर्वजांची प्रतिमा देवघरात येऊनये.
काही लोक देवघराच्या वरती बरेच अवजड साहित्य ठेवतात हे योग्य नाही. आपण रोज देवासोमर जो दिवा लातो तो आपल्या देवघरात आपल्या उजव्या हाताला असावा, तसेच देवघरात एकाच देवी देवतांची एक पेक्षा जास्त मूर्ती किंवा प्रतिमा असू नये. त्याच बरोबर आपली पूजा करण्याची पद्धत हि आपल्या श्रद्धे प्रमाणे असावी किंवा आपल्या श्रद्धे प्रमाणे करावी.
देवपूजा करताना किंवा झल्यावर दिवा आणि उदबत्ती लावावी. तसेच दिवपूजा झल्यावर घंटा नाद व शंख नाद करावा. तसेच देवपूजा झाल्यावर लगेच त्या जेवरून न उठता दोन ते तीन मिनिट डोळे बंद करून देवाचे नामस्मरण करावे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.