मित्रांनो आपल्यातील बऱ्याच व्यक्तींना पाठदुखीचा, कंबरदुखीचा, गुडघेदुखीचा, सांधेदुखीचा असे अनेक प्रकारचे आजार असतात. यासोबतच हाडे ठिसूळ होणे, हाडे कमकुवत होणे अशा व्यक्तींची हाडे मजबूत करण्यासाठी आपण घरी सहज सोपा आणि त्यासोबतच आपले जी डोकं दुखी आहे किंवा आपल्याला आलेला जो थकवा आहे तो घालवण्यासाठी एकदम अतिशय साधा सोपा उपाय पाहणार आहोत. तुम्ही दररोज जो चहा घेता त्या चहामध्ये एक चमचा ही पावडर टाकायची आहे. ती पावडर कशी करायची, कधी घ्यायची, कशासोबत घ्यायची हे सर्व आपण पाहुया.
मित्रांनो ही पावडर आहे ती म्हणजे सुंठ पावडर. जे ओले आले असते त्यापासून आपण सुंठ पावडर करत असतो. आल्याचा कंद वाळवला जातो त्याला सुंठ म्हणतात. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामध्ये आलेला अशक्तपणा या सर्वांना सुंठीचा शिरा देतात. या शिऱ्यामुळे आम्लपित्त सुद्धा कमी होते आणि सुंठ पावडर रात्रभर एरंडेल तेलात भिजवावी सकाळी हे मिश्रण पिटात टाकून पोळ्या खायला द्याव्यात याने आमवात निश्चित कमी होतो.
आणि तसेच याचे जे गुणधर्म आहेत भूक वाढवून अन्नाचे पचन करणे, आमवाताचा नाश करणे, श्वासाचे जे त्रास आहेत, खोकला, हृदयरोग, मूळव्याध, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास या समस्येवर सुंठ अत्यंत गुणकारी असते. याचा वापर आपण करणार आहे. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे जायफळ. तर मित्रांनो काही विशिष्ट पदार्थांमध्ये आपण जायफळाचा वापर करतो. परंतु जायफळाचे आपल्या शरीरास खूप चमत्कारिक असे फायदे होतात. जायफळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. पोट दुखणे, पोटातील घाण बाहेर काढणे, रक्त शुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे, रक्त पुरवठा सुरळीत ठेवणे असे अनेक कार्य जायफळ करत असते.
आणि त्याचबरोबर मित्रांनो हा एक असा मसाला आहे जो जेवणामध्ये कमी प्रमाणात वापरला जातो पण त्याचे फायदे शरीराला मिळतात. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात आणि तिसरा जो महत्त्वाचा पदार्थ वापरणार आहोत तो आहे लवंग. लवंगाच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास, तोंडाची दुर्गंधी जाण्यास मदत होते. यानंतर आपण पदार्थ वापरणार आहोत तो म्हणजे दालचिनी. पचन विकार, सर्दीसाठी खूप उपयुक्त असते. यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे यांचा समावेश असतो.
यानंतर आपण आपण वापरणार आहे ते काळे मिरे. काळ्या मिरीमध्ये पायप्यारीन नावाचा घटक असतो आणि पायप्यारिनमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. या सर्वांचे एकत्रितपणे मिश्रण करायचे आहे आणि यापासून आपल्याला एक मसाला करायचा आहे. सुरवातीला आपल्याला सुंठ घ्यायची आहे. सुंठामध्ये दहा ते पंधरा लवंगा टाकायच्या आहेत. त्याचप्रमाणे काळे मिरे टाकायचे आहे आणि सहा ते सात वेलची पावडर मिक्स करायची आहे आणि दालचिनी मिक्स करायची आहे.
यापासून आपल्याला मसाला बनवायचा आहे की जो आपल्या शरीरासाठी, आपल्या हाडांसाठी एकदम चांगल्या प्रकारे उपयोगी येईल आणि त्यामुळे आपली जी कमकवूत झालेली हाडे आहेत ते पूर्णपणे मजबूत होण्यास मदत होईल. तर हा मिक्स केलेला मसाला मिक्सरच्या साहाय्याने त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर तयार झालेली ही पावडर तुम्हाला चहामध्ये चिमूटभर टाकायची आहे.
ज्या ज्या वेळेस तुम्ही चहा पिणार आहात त्या त्या वेळेस चहामध्ये टाकून याचे जर सेवन केले ते तुमची कंबरदुखी, वजन कमी होण्यास अनेक प्रकारचे रोग दूर होण्यास यापासून मदत मिळते. या सर्वच पदार्थांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिनची भरपूर मात्रा असते आणि त्यामुळे तुमची जी हाडे आहेत किंवा तुम्हाला आलेला जो थकवा आहे तो थकवा पूर्णपणे बरा होतो.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.