मित्रांनो, प्रत्येकालाच आपण आकर्षक दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी आपण पुरेपूर आपल्या त्वचेची आपल्या चेहऱ्याची काळजी ही घेतच असतो. परंतु बदलत्या ऋतूमुळे आपल्याला बरेच अनेक आजार उद्भवलेला सुरुवात होते. म्हणजेच जसा ऋतू बदलतो त्यानुसार मग आपणाला अनेक त्वचेचे विकार देखील उद्भवतात व त्यामध्ये आपल्याला अनेक काळे डाग असतील किंवा खाज, खुजली असा त्रास आपल्याला सहन करावाच लागतो. उन्हाळ्यातील वातावरणात तापमान वाढल्यामुळे किंवा पावसाळ्यातील ओले कपडे असल्याने त्वचेवर घाम आणि चट्टे देखील येतात आणि त्यामुळे आपल्या त्वचेला एक प्रकारची खाज आपणाला होत राहते.
तसेच घट्ट कपडे आपण वापरल्यामुळे देखील आपणाला फंगल इन्फेक्शन चा देखील त्रास होत असतो. तर या डाग खाज खुजली वर आपण अनेक क्रीम्स देखील वापरत असतो. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेतो आणि त्या क्रीम देखील आपण वापरत असतो. परंतु तरीदेखील थोड्या दिवसांसाठी आपला हा त्रास कमी होतो. परत काही दिवसांनी हा त्रास आपल्याला जाणवायला लागतो.
तर मित्रांनो तुम्ही असे काही घरगुती उपाय या रोगावरती केले तर तुमचा हा त्रास नक्कीच कमी होऊन जातो. परंतु हे उपाय आपल्याला माहीत नसल्याकारणाने आपण कोणतेही घरगुती उपाय करत नाही. तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमचे जे काही काळे डाग असतील, गजकर्ण असेल, खरूज, नायटा किंवा खाज खुजली यासंबंधी सर्व आजार हे नक्कीच दूर होणार आहेत.
तर हा उपाय कसा करायचा आणि यासाठी कोणत्या पदार्थांची आपणाला आवश्यकता आहे हे आता आपण जाणून घेऊयात. आपण आपली त्वचा खाजवल्यामुळे आपली त्वचा ही खूपच लालसर होते आणि त्याच्या वेदना देखील आपणाला असह्य होतात. तर मित्रांनो आपल्या घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून आपण हा उपाय करू शकतो. मित्रांनो आज आपण उपाय बघणार आहोत तो पूर्णपणे घरगुती असणार आहे याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही तर हा उपाय करायचा कसा चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
आता अगोदर आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे डाग खाज खुजली ह्याला थांबवण्याचे काम लिंबू करत असते लिंबूला आपल्याला मधून कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या मधले बिया काढून आपल्याला त्या लिंबूचा रस एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे याच्यामध्ये असलेल्या अँटिफिकल्स आपल्या शरीरावर जे काही डाग खाज खुजली आहे त्याला थांबवण्याचे काम करत असतात आणि त्याच्यानंतर ना आपल्याला लागणार आहे ते म्हणजे दुर्वा दुर्वा या सहजपणे आपल्याला कुठेही मिळून जाऊ शकतात
मित्रांनो दुर्वा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि याचा वापर आपण पूजा करायला देखील करत असतो दूर्वा आपल्याला सहजपणे कुठेही मिळून जाऊ शकते आयुर्वेदामध्ये याचे भरपूर असे उपाय देखील सांगितले आहेत आणि तुम्हाला तुमचे जेवढे डाग असतील किंवा खाज खुजली तुम्हाला त्याचे प्रमाण समजतात त्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दुर्वा घ्यायचे आहेत.
व दुर्वा मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ती पेस्ट ज्या वाटीमध्ये आपण लिंबाचा रस काढलेला आहे त्याच्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी दुर्वाचे पेस्ट घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोरफड लागणार आहे या ठिकाणी आपल्याला फ्रेश कोरफड घ्यायची आहे जर फ्रेश कोरफड तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही एलोवेरा जेल देखील या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्धी कोरफड घ्यायची आहे आणि त्याच्या वरची साल काढून आपल्याला त्याच्या आत मधलं जेल काढून घ्यायचा आहे
आणि तुम्हाला अर्धा चमचा या ठिकाणी फक्त त्याचा जेल काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर नेते पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे आणि ती पेस्ट तयार करून झाल्यानंतर ना आपल्याला डाग खाज खुजली याच्यापासून आराम मिळणार आहे आणि हे मुळापासूनच कमी करण्याचं काम करणार आहे तर याचा वापर कसा करायचा आहे आता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला डाग आहेत खाज खुजली येत आहे.
त्या ठिकाणी तुम्ही चमच्याने किंवा हाताने लावला तरी देखील चालू शकतो जर तुमच्याकडे कॉटन असेल तर ते कॉटनच्या मदतीने तुम्ही लावला तरी देखील चालू शकतो त्या पेस्टमध्ये तुम्ही कॉटन किंवा हाताने लावला असाल तर ज्या ठिकाणी डाग आहेत खाज खुजली आहे त्या ठिकाणी ही पेस्ट लावायची आहे ही पेस्ट लावल्यानंतर ना तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटं तसेच सोडून द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला तुमचा हाच स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही जर सलग दोन ते तीन दिवस केला तर तुमच्या जो काही त्रास आहे तो त्रास काहींचा नाहीसा होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला कोणता साईड इफेक्ट देखील होणार नाही तर मित्रांनो साधा सोपा असा हा घरगुती उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.