मित्रांनो आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात. या वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर ठरतात. म्हणजेच आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा देखील या वनस्पती करीत असतात. त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या झाडांची आपण विशेष काळजी देखील करणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपले आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होईल. बरेच जण हे आपले घर सजवण्यासाठी अनेक फुलझाडे लावत असतात. म्हणजेच विविध प्रकारच्या फुलांची झाडे, फळांची झाडे लावत असतात. म्हणजेच एक प्रकारची ते बाग तयार करतात.
अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडे या बागेमध्ये ते लावत असतात. बऱ्याच जणांच्या दारापुढे आपण मोगऱ्याची वनस्पती ही पाहिली असेलच. मोगऱ्याची फुले ही खूपच सुगंधी असतात. तसेच गजरा करण्यासाठी देखील आपणाला ही मोगऱ्याची फुले फायदेशीर ठरत असतात. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की, आपल्या या मोगऱ्याच्या झाडाला जास्त फुले लागत नाहीत. त्यावेळेस काय करावे? तर आज मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहे.
म्हणजे जर तुमच्या घरामध्ये देखील मोगऱ्याचे झाड असेल तर हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या त्या मोगऱ्याच्या झाडाला भरपूर कळ्या नक्कीच येतील आणि तुमचे झाड हे कळ्यांनी भरभरून जाईल. तर हा उपाय कसा करायचा आहे याला कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे हे आता सविस्तर जाणून घेऊयात.
तर मित्रांनो पहिल्यांदा आपण जे मोगऱ्याचे झाड लावलेले आहे त्या कुंडीतील आपणाला पहिल्यांदा माती थोडीफार काढून घ्यायची आहे. म्हणजे त्याची मुळे थोडी आपल्याला दिसतील अशा पद्धतीने थोडीशी माती काढून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये शंभर ग्राम आपल्याला शेणखत हे घालायचे आहे. अगदी पसरवून व्यवस्थित शेणखत घालून घेतल्यानंतर जे आपण काढलेली माती असते ती परत माती आपणाला त्या शेणखत वरती घालायचे आहे.
व्यवस्थित माती घातल्यानंतर आपणाला डीएपी हे दीड ग्रॅम घ्यायचे आहे आणि हे डीएपी आपणाला त्या कुंडीच्या मातीत साईडने टाकायचे आहे म्हणजे त्या मातीमध्ये आपणाला ती डीएपी पूर्णपणे टाकायचे आ.हे दीड ग्रॅम फक्त तुम्हाला ही डीएपी घ्यायची आहे आणि ही डीएपी त्या मातीमध्ये टाकायची आहे आणि मुजरवायचे आहे.
यानंतर आपल्याला एक लिटर पाणी घेऊन त्यामध्ये एक ग्रॅम युरिया घालायचा आहे आणि तो पाण्यामध्ये व्यवस्थितपणे विरघळून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित मिश्रण करून घेतल्यानंतर याची फवारणी तुम्हाला त्या मोगऱ्याच्या झाडावर करायचे आहे. व्यवस्थित फवारणी करून झाल्यानंतर आपल्याला मोगऱ्याच्या कुंडीमध्ये पाणी थोडेफार घालायचे आहे. जेणेकरून ती डीएपी देखील आपल्या मोगऱ्याच्या झाडाच्या मुळाशी विरघळून जाईल.
तर अशा पद्धतीने तुम्ही या मोगऱ्याच्या झाडाची जर काळजी घेतली म्हणजे हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या त्या मोगऱ्याच्या झाडाला नक्कीच भरपूर कळ्या येतील आणि तुमचे झाड हे मोगऱ्याच्या फुलांनी भरभरून जाईल. असा हा कमी खर्चिक असा हा साधा सोपा उपाय घरच्या घरी करता येणार असा आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये मोगऱ्याचे झाड असेल तर हा घरगुती उपाय अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.