मित्रांनो तुम्ही कोणत्याही देवी देवतांची पूजाअर्चना, व्रत किंवा सेवा करत असाल तर ती अगदी मनोभावे आणि श्रद्धेनेच करायला हवे. मित्रांनो जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने जर सेवा केली तर त्याचे शुभफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होतात. तसेच स्वामी समर्थ यांच्या जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्ही कधीही मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार आणू नका. अगदी मनोभावे स्वामींच्या सेवेमध्ये गुंतून रहा. यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील हे सर्व संकटे स्वामींची होऊन जातात. स्वामी या संकटातून आपणाला बाहेर काढत असतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे कायम स्वामींचे वाक्य आपल्या कानी असायला हवे आणि त्या पद्धतीने आपण अगदी मनोभावे स्वामींची सेवा आवश्यक करा.
यामुळे तुम्हाला स्वामींचे अनुभव नक्कीच येतील आणि प्रचिती देखील तुम्हाला नक्कीच येईल. तर आज मी तुम्हाला असाच एक अनुभव सांगणार आहे. हा अनुभव शोभा शामभाऊ पवार मेशी तालुका देवळा जिल्हा नाशिक यांचा आहे. म्हणजेच हा अनुभव आपण त्यांच्याच शब्दांमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात हा थरारक अनुभव.
नमस्कार मी शोभा. आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे. हा अनुभव मी कधीच विसरणार नाही. तेव्हा मला स्वामींची प्रचिती आली. स्वामी माझ्या संकटांमध्ये धावून आले त्या संकटातून आम्हाला बाहेर काढलं. माझा नातू हा नववीत शिकत होता आणि तो आपल्या वडिलांना सोडण्यासाठी गेलेला होता.
वडिलांना सोडून तो गाडीवरून परत येत असतानाच मागून त्याला जोराची एका वाहनाने धडक दिली आणि तो सहा फूट उडून रोडवर पडला. यामुळे त्याच्या डोक्याला खूपच जबर मार लागला होता. आम्ही तातडीनेच मग त्याला नाशिकच्या सर्वात चांगल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की याची परिस्थिती खूपच गंभीर आहे. काहीही सांगता येत नाही.
कारण याच्या डोक्याला मार लागल्यामुळे रक्तस्त्राव भरपूर झाला होता आणि याच्या डोक्यामधील कवटीचे ऑपरेशन करायला हवे आणि या ऑपरेशनमध्ये काय होईल काहीही सांगता येत नाही. मला काहीही वाचता लिहिता येत नव्हतं. मी अडाणी होते. मला काय करावं काही सुचत नव्हतं. काही रिपोर्ट आलेले ते नेमके काय आलेत हे देखील मला काहीच समजत नव्हतं.
परंतु माझ्या नातवाची तब्येत खूपच नाजूक आहे हे वाक्य फक्त माझ्या कानी पडलं. त्यावेळेस मला स्वामींची खूपच आठवण आली. माझ्या नातवाला या मृत्यूतून बाहेर काढण्याचं काम फक्त स्वामी करणार यासाठी मग मी स्वामींच्या फोटो जवळ जाऊन बसले आणि फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत राहिले .
मला वाचायला येत नसल्यामुळे कोणतीच सेवा मी करू शकत नव्हते. फक्त मी स्वामींच्या नामाचा जप चालू केला. जवळजवळ मी चार ते पाच तास स्वामींचा नाम जप करत होते. मग त्यावेळेस एकदम अचानकच ऑपरेशन झालं हे वाक्य काणी पडलं. त्यावेळेस माझ्या नातवाची तब्येत चांगली आहे असे डॉक्टरांनी सांगितलं.
आम्ही सगळेजण खूप खूश झालो. त्यावेळेस मग मी स्वामींचे आभार मानले. कारण डोक्याच्या कवटीचे ऑपरेशन करणे म्हणजे खूपच धाडसाचे काम होतं. ते डॉक्टरांनी केलं परंतु त्याच बरोबर स्वामींनी देखील माझी खूपच मदत केली. कारण स्वामी आमच्या पाठीशी त्यावेळेस राहिले.
फक्त मी नाम जप करत असताना स्वामींपुढे एकच मागण मागितलं होतं की, माझ्या नातवाला या प्रसंगातून त्याला बाहेर काढ त्याची तब्येत सुधारू दे एवढेच मी मागणं मागितले होते आणि स्वामींनी मला ते मागणं दिलं होतं. माझं मागणं ऐकलं होतं. स्वामी माझ्या पाठीशी राहिले आणि हा विश्वास त्यावेळेस मला आणि माझ्या कुटुंबीयांना आला आणि तेव्हापासूनच आम्ही स्वामींची भक्ती सेवा करणे अजिबात सोडलं नाही.
मला वाचता लिहिता येत नाही परंतु मी तेव्हापासून स्वामींचा नामस्मरण जप दररोज करते आणि तेव्हापासूनच मला स्वामींची अनेक अनुभव आले. पन हा अनुभव जो आहे हा अनुभव न विसरणारा आहे आणि हाच अनुभव मी तुम्हाला सांगितला.
तर तुम्ही देखील स्वामींची सेवा करत असाल तर अगदी मनोभावे, श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच करा. स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहतील. ते प्रत्येक संकटात भक्ताच्या पाठीशी राहतात. त्याला संकटातून बाहेर नक्कीच काढतात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.