मित्रांनो, प्रत्येक माणूस जगत असताना त्याला अनेक सुख आणि दुःख ही येतच राहतात. कधी आपल्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येतात. तर कधी दुःखाचे वादळ हे येत असतात. परंतु त्या दुःखाच्या वादळातून आपणालाच बाहेर पडावे लागते. तर मित्रांनो आज मी तुम्हाला डॉक्टर अभिजीत सोनवणे यांनी सांगितलेली एक सत्य घटना सांगणार आहे. त्यांच्या शब्दांमध्ये यामुळे ही सत्य घटना ऐकल्यानंतर तुमच्याही डोळ्यांमध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हे ऐकून थक्क व्हाल!जाणून घेऊयात ही सत्य घटना डॉक्टर अभिजीत सोनवणे यांच्याच शब्दात.
त्यावेळेस माझ्या दवाखान्यांमध्ये एक आजी दररोज यायची. परंतु ती स्वतःसाठी कधीच औषध मागत नव्हती. ती कायमच गोळ्या, औषधे घेऊन जायची. फक्त मागायची ती फक्त आपल्या मुलासाठी. प्रत्येक वेळेस यायची आणि आपल्या मुलासाठीच मागायची. स्वतःसाठी कधी तीने काहीही मागितले नाही. परंतु एकदा ती दवाखान्यांमध्ये आली आणि तिच्या डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी माझ्यापाठी लागली. मग मी त्यावेळेस ऑपरेशन देखील केले.
परंतु नंतर ती ज्यावेळेस आली त्यावेळेस मी तिला विचारले की आजी आज तुला काय हवं आहे? तर त्यावेळेस मला म्हणाली की मला काही नको जे हवं आहे ते माझ्या मुलासाठी दे. म्हणजेच ज्या गोळ्या तू दरवेळेस देतोस त्याच गोळ्या माझ्या मुलासाठी दे. त्यावेळेस मग मात्र मला आजीची थोडीशी थट्टा करावीशी वाटली आणि मग मी आजीला म्हणालो की तुझे एवढे वय झालेले आहे तू काबाड कष्ट करतीस भीक मागून तू आपल्या मुलासाठी गोळ्यांनी नेतेस. परंतु त्या मुलाला काय वाटत नाही का?
त्याला काहीतरी काम धंदा करायला का सांगत नाहीस त्यावेळेस ती आजी म्हणाली की माझा मुलगा हा अपंग आहे तो काहीच करू शकत नाही आणि येड्या माणसांना कोणीच काहीही काम देऊ शकत नाही. हे ऐकून मला देखील खूपच वाईट वाटलं.
त्यावेळेस मी आजीला म्हणालो की आजी मी तुझी थट्टा केली तू मनाला लावून घेऊ नकोस. त्यावेळेस आजीला विचारलं की नऊ महिने पूर्ण व्हायच्या अगोदर तुझे मूल जन्माला आले आहे का? त्यावेळेस आजी काय माहित असे म्हणाले. आजीच्या या उत्तरावर मी देखील भारावून गेलो.
मग त्यावेळेस मग मात्र आजीने आपली कथा सांगण्यास सुरुवात केली. हे मुल माझ्या सवतीच आहे म्हणजेच आजीचे लग्न झालं बरीच वर्षे गेले परंतु आजीला मूल होईना. त्यामुळे नवऱ्याने घराबाहेर काढले आणि सवत आणली व त्यावेळेस सवतीने घरातील कामे तू कर आणि तुला झोपायला आणि खायला देईन असे म्हणून तिला घरात ठेवलं होतं. काही दिवसांनी सवतीला मुलगा झाला.
परंतु सहा महिन्यातच नवरा एका अपघातात मरून गेला आणि त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर सवतीला कोणत्यातरी रोग होऊन तीही मरून गेली. मग त्यावेळेस ही आजी मात्र सवतीला बाळ म्हणून कधीच त्या मुलाकडे लक्ष देत नव्हती. त्या मुलाला आपण टाकून यावं यासाठी ती घरातून त्या बाळाला घेऊन गेली. परंतु त्या मुलान या आजीला आई म्हणूनच मिठी मारली. मग त्यावेळेस आजीने त्या बाळाला फेकून न देता त्या मुलाचा सांभाळ केला. परंतु हे बाळ अपंग होतं.
आजीने त्या मुलाला बरे करण्यासाठी आपल्याजवळ असणारे सोने तसेच घर देखील विकले होते. परंतु तिचे मूल ठीक झाले नव्हते. मग त्यावेळेस मी आजीला म्हणालो की आजी तू एवढे करते आहेस याची जाणीव तुझ्या मुलालाही नाही किंवा त्याला कळतही नाही आणि तुला तो ओळखतही नाही. तरीदेखील तू त्याच्यासाठी का एवढे करते आहेस.
त्यावर आजी आपल्या डोळ्यातून अश्रू काढून म्हणाले की कोणतेही झाडावर लागलेले फुल हे मंदिरात जाणार का स्मशानभूमी मध्ये जाणार आहे त्या फुलाला देखील माहिती नसते. त्यामुळे मी देखील तो आज ना उद्या बरा होईल याच आशेने हे सर्व करीत आहे. तो फक्त माझ्याजवळ आहे हेच माझ्यासाठी खूप काही आहे.
आजीच्या या बोलण्यावर मला खूपच वाईट वाटले. नंतर आजी जवळ येऊन मला म्हणाली की, मला तुला एक सांगायचे आहे मी म्हणालो काय सांगायचे आहे. तर आजी म्हणाली की कोणतीच आई अशी म्हणू शकत नाही तरीही मी देवाकडे एक मागण मागणार आहे की माझ्या आधी माझ्या मुलाला मरण यावं.
कारण मी जर मेले तर आठ दिवसानंतर तो तडफडून मरेल. त्यापेक्षा माझ्या अगोदर त्याला मरण यावं. आजीच्या या बोलण्याने माझे मन खूपच थक्क झालं. मला काय बोलावे काहीच सुचत नव्हते. सतरा जागी फाटलेली साडी नेसलेली त्या आजीचे विचार मात्र माझ्या मनाला स्पर्शून गेले. एवढा विचार, दुसऱ्यांबद्दल काळजी घेणारी आजी माझ्या मनात घर करून गेली.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.