कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते?… एकदा नक्की वाचा डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही…!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, एखाद्या घरात बाळ येण्याची चाहूल लागते त्यावेळी त्या घरातील प्रत्येकांना मुलगी होईल की मुलगा याची उत्सुकता निर्माण होते. काहीजण असे असतात की, त्यांना मुलगा किंवा मुलगी कोणीही झाले तरीही चालू शकते. तर, काहीजण असे असतात की ज्यांना फक्त मुलगीच हवी असते. या उलट काही जण असे असतात की, ज्यांना फक्त मुलगाच हवा असतो. या लेखनामध्ये आपण मुलगी कुणाच्या घरी जन्म घेते? याची माहिती पाहणार आहोत.

 

ज्यांच्या घरी मुलगीचा जन्म होतो त्या घरी समृद्धी येते. घरचे वातावरण उत्साही आणि चैतन्यमय बनते. ते घर अगदी आनंदी होते आणि त्या घरातील सर्व दुःख पळून जातात. घरात मुलगी जन्म घेते ते घर उत्साही बनते. घरात लहान लहान पावलांच्या पैंजणांचा आवाज होतो त्या घरात नेहमी समृद्धी व सुख शांती राहते. वैभव राहते आणि सर्व दुःख पळून जातात.

 

असे म्हटले जाते की, ज्या घरी मुलगी जन्म घेते त्या घरी लक्ष्मी येते. पहिली मुलगी धनाची पेटी असेही म्हणतात भगवंत सगळ्यांच्याच घरी मुली पाठवत नाही. जे नशीबवान असतात. मोठ्या मनाचे असतात त्यांचाच खरी मुलगी जन्म घेते. ज्या व्यक्तींकडे दान करण्याचे वृत्ती आहे अशाच घरी मुलींच्या जन्म होतो. त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे मोठे भाग्य मिळते.

 

एकदा स्वामी विवेकानंद डोंगराळ भागातून जात असताना त्यांना वाटेत एक मनुष्य व त्याच्या दोन मुली दिसले. तो मनुष्य आपल्याला लहान मुलीला खांद्यावर घेऊन त्या दुसऱ्या मुलीचा हात धरून डोंगर चालत होता. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी त्या मनुष्याला प्रश्न केला, ‘तू कुठे चालला आहेस?’ त्यावेळी तो मनुष्य म्हणाला, ‘मी देवीच्या दर्शनाला जात आहे’. त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले, ‘तुला मुलीचे ओझे होत असेल तर, माझ्याकडे दे! देवीच्या मंदिरात गेल्यावर त्या मुलीला मी तुला परत करेन!’ असे म्हटल्यावर त्या मनुष्याने स्वामी विवेकानंदांना खूप छान उत्तर दिले. मनुष्य म्हनाला, ‘मुली कधीही बापाला ओझी होत नसते. ती कधीही वडिलांच्या खांद्यावर भार नसते. उलट ती वडिलांचा भार हलका करत असते. ज्या माणसाला मुली ओझी वाटत असते तो मनुष्य कधी बाप आसू शकत नाही.’

 

एक वेळ मुलगा आई वडिलांना दुःखी बघू शकतो परंतु एक मुलगी आपल्या आई वडिलांना कधीच दुःखी बघु शकत नाही. आई वडील दुःखी आहे असे जर मुलीला कळाले तर, ही मुलगीचा जीव कासावीस होऊ लागतो. असेही म्हणतात मुलगी ही कुठेही असली तरीही आई-वडिलांना परकी होत नाही. ती कुठेही असली तर तिला आपल्या आई-वडिलांचे काळजी हे असतेच व त्याच काळजी ती आपल्या आई वडिलांकडे ओढली जाते.

 

असं म्हणतात मुली असते तोपर्यंत घरामध्ये गोकुळ खेळत असत. घरामध्ये समृद्धी सुख शांती असते. म्हणूनच भगवंत अशा लोकांच्या घरी मुली पाठवतो की, जे खरच खूप भाग्यवंत आहे. मुलगी हे लक्ष्मीचं रूप मानले जाते आणि लक्ष्मी त्यांच्याच घरी असते जे लोक खूप भाग्यवंत असता. दान धर्म करत असतात. अशाच घरी मुलगी जन्म घेत असते.

 

अशाप्रकारे मुलींचा जन्म हा फक्त आणि फक्त भाग्यवंत लोकांच्याच घरी होत असतो. त्यांच्यात घरी लक्ष्मी येत असते.

Leave a Reply

Your email address will not be published.