हे ८ विचार – जे कटू आहेत पण सत्य आहेत? १) तुमचे सिक्रेट बायकोलाही सांगू नका, हृदयाला भिडणारे चांगले सुविचार ……!!!!!

Uncategorized

मित्रांनो, आपला जीवनामध्ये काही परिस्थिती अशा येतात त्यामुळे आपण खूप कोलमडून जाते आणि या कोलमडलेल्या जीवनामध्ये जर आपल्याला कोणाचा प्रभाव होत असेल तर तो म्हणजे चांगला विचारांचा. आपल्या हृदयाला भेटणाऱ्या चांगला संस्कारांचा. म्हणूनच आज आपण जे कटू आहे पण सत्य आहे. असे काही हृदयाला भेटणारे आठ चांगले विचार जाणून घेणार आहोत.

 

1)ज्याने त्याच्या जीवनातले पहिले 30 वर्ष मेहनत करून घेतली ना तो त्याचे शेवटचे 30 वर्ष राजासारखं आयुष्य जगतो.आणि ज्याने आपल्या जीवनातले पहिले 30 वर्ष आळस करण्यात, मज्जा मस्ती करण्यात घालवले ना तो त्याच्या जीवनातले शेवटचे 30 वर्ष भिकाऱ्यासारखे जगतो.हो, त्याची इच्छा नसतांना सुद्धा त्याला तसं आयुष्य जगावं लागतं. त्यामुळे आत्ताच वेळं आहे. मेहनत करा, प्रयत्न करा.अश्याचं काही गोष्टी ज्या कटू आहेत…. पण सत्य आहेत.

 

2)जर तुम्हाला तुमच्या आई-वाडिलांना खुश ठेवायचंय ना; तर त्यांची respect करा.आणि जरी तुम्हाला कधीकधी त्यांच्यावर खूप जास्त राग येतोय ना तर तुमच्या मुलांसामोर किंवा तुमच्या बायको समोर तुमच्या आईवडीलांवर चिडू नका. यामुळे त्यांना खूप जास्त वाईट वाटतं.आणि जर आपण आपल्या आईवडीलांवर दुसऱ्यांसामोर चिडलो ना; तर दुसरे सुद्धा आपल्या आईवडीलांची respect नाही करतं.

 

3)आयुष्यात कधीही जर तुमची एखादी गुपित गोष्ट असेल एखादं सीक्रेट असेल, जर ते खरोखरं सांगण्यालायक नसेल ना; तर ते कुणालाही सांगू नका. कुणावरचं विश्वास ठेऊ नका.कारण आजच्या जगातं सांगता नाही येतं कोण कधी केव्हा कसं बदलून जाईल. आणि तुमचा कसा विश्वासघात करेल ते. म्हणून भावनेच्या भरात येऊन कुणालाही तुमचं top secret सांगू नका.

 

4)कुणाकडूनचं अपेक्षा ठेऊ नका. कारण सगळ्यात जास्त दुखः या अपेक्षा देतात. आपण दुसऱ्याकडून जितकं expect करतो ना; तितका आपल्याला त्रास होतो. कारण प्रत्येकजण आपल्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकतं. म्हणून ज्या काही अपेक्षा करायच्या आहेत ना, त्या फक्त स्वतःकडून करा. सोडून द्या लोकांकडून अपेक्षा करणं.

 

5)चांगल्या लोकांच्या संगतीत रहाल, तर चांगले म्हटले जालं. आणि जर toxic लोकांबरोबर रहाल, तर तुम्ही सुद्धा तसेचं समजले जालं.आणि हळूहळू वेळेनुसार तुम्ही जश्या लोकांमध्ये रहालं ना तसं तुम्ही बनतं सुध्दा जालं. म्हणून तुम्ही ठरावा तुम्हाला तुमची संगत कशी ठेवायची आहे ते.

 

6)जगात आपल्या आईवडीलांशिवाय आपल्या भावा-बहीणींनासुद्धा असं वाटतं नाही की आपण त्यांच्यापेक्षा पुढे जावं. हेचं सत्य आहे की,आपल्या आईवडीलांशिवाय जास्त प्रेम आपल्यावर कधीचं कुणीचं नाही करू शकतं.

 

7)प्रत्येक व्यक्ति असं म्हणतो, कधी ना कधी तुम्ही सुद्धा म्हटलं असाल की, एक ना एक दिवस मी खूप फिरेल. खूप मजा करेल, खूप मस्ती करेल. मला हवं ते करेल, हवं तिथे जाईल. आनंदी आयुष्य जगेल. जीवनाचा आनंद घेईल. एक ना एक दिवस नक्कीच करेल.पण तो एक दिवस कधीचं नाही येतं. आणि त्या एक दिवसाची वाट बघता बघता आपलं पूर्ण आयुष्य निघून जातं, म्हणून आता आयुष्य जगा. आता तुमच्याकडे जे आहे त्याला भरभरून जगा. त्याची भरभरून मजा घ्या. आजपासूनचं तुमच्य स्वप्नाना पूर्ण करण्यामागे लागून जा. जीवन एकाचं दिवसात पूर्ण नाही जगता येतं ते रोज थोडं थोडं जगावं लागतं. आणि त्यातचं कुठेतरी जीवनाची मजा आहे.

 

8)जवळ जवळं 50 ते 60% मुलं अभ्यासाकडे लक्ष न देता मुलींच्या मागे लागतात. आणि यामुळे काय होतं माहितीय; ना त्यांना ती मुलगी मिळते, ना करियर. कारण त्या सगळ्या सुंदर मुली ज्या या 70% मुलांना हव्या असतात ना, त्या मुली त्या 30% मुलांच्या मागे पळतात जे successful असतात.जे अभ्यास करून त्यांचं करियर बनवतात. जे काहीतरी बनून जातात. आणि मग त्या 30% मुलांना करियर ही मिळतं आणि सुंदर मुलगी सुद्धा.म्हणून असे बना, की इतर लोकं स्वतःहून तुमच्याकडे attract होतील.

 

अशा प्रकारे हे काही चांगले विचार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.