हे करून बघा घरामधे नावालाही झुरळ शोधून सापडणार नाही फक्त हा उपाय करा…..!!

Uncategorized

मित्रांनो, तुमच्या घराभोवती झुरळं उधळताना पाहून तुम्हाला कंटाळा आला आहे का? आपले घर स्वच्छ आणि नीटनेटके असावे असे प्रत्येकालाच वाटते. प्रत्येक गृहिणी याकडे विशेष लक्ष असते. मात्र, घरात कितीही स्वच्छता ठेवली तरी घरातील झुरळ काही जायचं नाव घेत नाहीत. शिवाय झुरळं नाहीत असं एकही घर शोधून सापडणं कठिण आहे. झुरळं कधी कधी जेवण बनवताना एखाद्या पदार्थात पडतात आणि अन्न खराब करतात.

 

अनेकांना तर झुरळांची खूप भिती वाटते तर काहींना त्यांचा किळस येतो. पण सर्वात मोठी अडचण ही आहे की, त्यांना मारण्यासाठी कितीही उपाय केले तरी ते पुन्हा ते आपणाला घरात दिसतात. जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर आजच्या लेखामध्ये आपण काही उपाय जाणून घेणार आहोत. झुरळ मारण्यासाठी बाजारात विविध केमिकल्स उपलब्ध आहेत, पण हे केमिकल्स आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

 

कारण झुरळांचा मुख्य वावर हा स्वयंपाक घरात असतो आणि स्वयंपाक घरात अशा केमिकल्सचा वापर केल्यास खाद्यपदार्थांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र, आता केमिकल्सचा वापर न करता झुरळ घालवण्याचे काही घरगुती उपाय करून झुरळांना घरातून कशाप्रकारे दूर करायचे याबद्दलची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

हा उपाय करण्यासाठी प्रथम आपल्याला कोणत्याही प्रकारचे पीठ घ्यायचं आहे. हे पीठ तुम्ही ज्वारीचे घेऊ शकता, गव्हाचे घेऊ शकता, डाळीचे घेऊ शकता किंवा बाजरीचे असा कोणत्याही प्रकारचे पीठ तुम्हाला दोन चमचे इतक्या प्रमाणात घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कडुलिंबाची पाने घालायचे आहेत. ही पाने जर ताजी मिळाली तर त्यांची पेस्ट बनवून आपल्याला यामध्ये घालायचे आहे. साधारण एक चमचा इतकी पेस्ट आपल्याला या ठिकाणी लागेल. जर तुम्हाला कडुलिंबाची वाळलेली पाने मिळाली तर ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. जर तुम्हाला कडूलिंबाची पाने मिळणे शक्य नसेल तर तुम्ही कडुलिंबाचे तेल एक चमचा इतक्या प्रमाणात देखील घालू शकता.

 

अशाप्रकारे तुम्ही यापैकी कोणत्याही वस्तूचा वापर करू शकता. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा इतकी कॉफी यामध्ये घालायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बोरिक पावडर घालायची आहे. बोरिक ऍसिड हे कीटकांना विषारी गुणधर्मांमुळे झुरळांसाठी अत्यंत प्रभावी घरगुती उपायांपैकी एक आहे. जेव्हा झुरळे बोरिक ऍसिडमधून जातात तेव्हा पावडर त्यांच्या पायांना आणि शरीराला चिकटते. ते स्वत: ला तयार करताना ते खातात, जे त्यांना अंतर्गत विष बनवतात. याव्यतिरिक्त, जेव्हा इतर झुरळे बोरिक ऍसिडने मारल्या गेलेल्यांचे शव खातात तेव्हा त्यांना देखील विषबाधा होते.

 

हे बोरिक ऍसिड हे झुरळांच्या लोकसंख्येच्या मोठ्या भागाला लक्ष्य करण्याचा एक प्रभावी मार्ग बनवते. ही बोरिक पावडर जर आपण पीठ दोन चमचे घेतले असेल तर बोरी पावडर तीन चमचे इतक्या प्रमाणात घ्यावी लागेल. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी घालून कणके प्रमाणे त्याचा गोळा तयार करावा व या कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून ज्या ठिकाणी झुरळांचा प्रादुर्भाव जास्त असेल त्या ठिकाणी ठेवावा. अशाप्रकारे आपण हे गोळे रात्रीच्या वेळेस ठेवले तर नक्की सकाळी तुम्हाला झुरळे त्या बाजूला मरून पडलेले दिसेल. असा हा साधा सोपा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून बघा. कमीत कमी पाच वर्षे तर तुम्हाला झुरळापासून सुटका मिळेल.

 

अशाप्रकारे हा घरगुती उपाय तुम्हाला देखील नक्की करून बघा.

Leave a Reply

Your email address will not be published.