ही काम केल्याने मनुष्याला मिळतो कुत्र्याचा जन्म… एकदा नक्की वाचा कोणती आहेत ती कामे……!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, जन्म आहे म्हटल्यावर मृत्यू हा अटळ आहे. आणि मृत्यू आहे म्हटल्यावर जन्म हा निश्चितच होतो. गरुड पुराणानुसार प्रत्येकाचा जन्म हा त्याच्या पाप पुण्यावर निश्चित होत असतो. गरुड पुराणात असेही म्हटलेले आहे मनुष्याने केलेल्या पापानुसार किंवा पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात स्थानही मिळत असते. जर मनुष्याची पापे जास्त असतील तर, त्याला नरकात स्थान मिळते आणि जर पुण्य जास्त असेल तर, त्यांना स्वर्गात स्थान मिळत असते.

 

त्याचबरोबर त्यांच्या पाप-पुण्यनुसार देखील पुढील जन्म कोणत्या स्वरूपात मिळेल हे देखील निश्चित होत असते. मनुष्याने जर पाप जास्त प्रमाणात केलेले असेल तर, त्याला नरकात स्थान मिळते व त्याचे पापाचे प्रमाण कमी होते. उरलेल्या पापाचे फळ म्हणून त्याला पुढील जन्म हा पशुपक्षांच्या रूपात मिळतो. म्हणूनच आज आपण एक अशी कथा पाहणार आहोत की, ज्यामध्ये आपल्याला कळते की कोणते पाप कर्म केल्यामुळे पुढील जन्म हा कुत्रा स्वरूपात मिळतो.

 

एके दिवशी श्रीराम आपला दरबारामध्ये बसलेले होते. त्याचवेळी त्यांच्या दारावर येऊन एक कुत्रा रडू लागला. त्यावेळी श्रीरामांच्या दुतांनी त्या कुत्र्याला हाकलावून लावले. दुसऱ्या दिवशी परत तो कुत्रा येऊन दारामध्ये रडू लागला. त्यावेळी देखील त्या दुतांनी त्या कुत्र्याला हाकलावून लावल. तिसऱ्या दिवशी पुन्हा तो कुत्रा दारात येऊन रडू लागला. त्यावेळी श्रीराम यांनी त्या कुत्र्याला दरबारात घेऊन येण्याचा आदेश दुतांना दिला.

 

त्याप्रमाणे ते दुत त्या कुत्र्याला श्रीरामांनी आत बोलावले आहे असे सांगण्यास गेले. त्यावेळी तो कुत्रा म्हणाला, ‘माझा जन्म निज योनीत झाला आहे. म्हणून तुम्ही भगवंतांना सांगा की, मला येऊन भेटावे.’ त्याप्रमाणे ते दूत आत जाऊन भगवंतांना कुत्रा चा निरोप दिला. ते ऐकून भगवंत बाहेर येऊन त्या कुत्र्याला रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी तू कुत्रा म्हणाला, ‘माझी कोणतीही चूक नसताना त्या संन्यासांनी मला दगड फेकून मारला आहे. यामुळे माझा पाय मोडला आहे. आता तुम्ही न्याय करा’

 

त्यावर भगवंतांनी त्या संन्यासाला बोलावून घेतले व कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले. त्यावर तो संन्यासी म्हणाला, ‘दुपारची वेळ होती. मी माझी भिक्षा ग्रहण करणार होतो. त्याचवेळी या कुत्र्याने माझ्या भिक्षेला तोंड लावले. त्यावर मी त्याला दगडाने मारले. त्यामुळे त्याचा पाय मोडला. त्यात माझी काय चूक आहे?’ त्यावर भगवंत म्हणाले, ‘ कुत्रा अज्ञानी आहे पण तुम्ही तर ज्ञानी आहात. त्या कुत्र्याला दुखापत झाली म्हणून तुम्ही दंडास पात्र आहात. आता हा कुत्राच तुम्हाला शिक्षा देईल.’

 

तेव्हा कुत्र्याने सांगितलं, ‘या संन्यासाला एखाद्या शिव मंदिराचा महंत करा.’ त्यावर भगवंतांनी त्या संन्याशाला वाजत गाजत शिवमंदिरात नेऊन त्या मंदिराचे महंत पद दिले. त्यावर त्या संन्यासाला वाटले की, “मला किती छान शिक्षा मिळालेली आहे!”. त्यानंतर भगवंताच्या दुताने त्या कुत्र्याला विचारले, ‘तू अशी शिक्षा त्या संन्यासाला का दिली आहेस?’

 

त्यावर तो कुत्रा म्हणाला, ‘शिव्या शाप देणारे, इतरांना छळणारे, अन्याय करणारे, इतरांचे धन लुबाडणारे वाईट कार्य करून अधिक धन मिळवणारे हे सर्व पुढील जन्मात कुत्र्याच्या जन्माला येतात मी ही मागच्या जन्मी एका मठाचा महंत होतो. म्हणूनच हा जन्म मला कुत्राचा मिळालेला आहे. त्या संन्यासाला देखील त्याच्या कृत्याचे फळ मिळावे म्हणून त्याला हे पद देण्यास सांगितले आहे.’ त्याप्रमाणे तो संन्यासी महंत पदावर खूप वाईट कर्म करून इतरांना लुबाडून पुढील जन्म त्याला देखील कुत्र्याचा मिळाला.

 

म्हणून कधीही इतरांना लुबाडून कोणतेही कार्य करू नये. कुणाला शिव्या श्राप देऊ नये. कुणाचे धन लुबाडून घेऊ नये व इतरांना लबाडून आपले धन नव्याने जोडू नये. नेहमी कष्ट करून धन गोळा करावे. जर या जन्मी आपण इतरांना लुबाडून श्रीमंत झालो तर त्याचे फळ हे आपल्याला पुढच्या जन्मात मिळतच असते.

 

 म्हणून कधीही कोणतीही वाईट कर्म करू नये. कारण ज्या त्या कर्माचे फळ हे जात त्या व्यक्तीला मिळतच असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.