स्वतःला इतकं बदला की लोक पाहत राहतील…१) नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही….!!

Uncategorized

मित्रांनो, आपला पाहण्यात असे कितीतरी लोक असतात ते ज्या लोकांना लोक किंमत देत नसतात. कामापुरते त्यांचा वापर करून घेत असतात. अशा लोकांनी स्वतःला बदलण्याची खूप गरज असते. तरच त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळेल. म्हणूनच स्वतःला इतकं बदला की लोक पाहतच राहतील. यासाठी आजच्या लेखांमध्ये आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत.

 

१) नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही.

२) तुम्ही तुमच आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्यांचे आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचेच महत्व विसरून जातो. त्यामुळे होतं काय की समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्व द्यायला विसरून जाते.

३) ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाही.

४) ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीही जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची मुळीच इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्व कमी करून घेऊ नका.

५) त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न केलेले नाहीत.

६) आयुष्याला कधीही दोष देत बसू नका कारण जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे.

७) आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी या नशिबाने मिळत नसतात.. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं.

८) जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा की “माझी मदत करशील का ?” मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेचच कळेल.

९) उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्षांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते.

१०) संघर्ष करताना माणूस हा नेहमीच एकटा असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असला तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो.

११) आयुष्यामधील काही जखमा या अशा असतात की त्या दिसत जरी नसल्या तरी त्या दुखत असतात.

१२) जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्या पासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिल असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमची विचारपूस करता पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्या बरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून : तर नेहमी दूर राहा कारण ते लोक मतलबी असतात.

१३) नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुले वाहता देवाला नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवतात पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की मी हे काम करू शकेल की नाही.

१४) ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदर कधीच करत नाही.

१५) आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांसोबत वागा.

१६) मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्या मध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटू देत नाही.

१७) प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाटच पाहत नाही त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत.

१८) जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर ही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि तुम्हाला सुद्धा धोका मिळाला.

१९) माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईल तर यामध्ये बदललं काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती.

२०) जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा “फुगे घेऊन खुश होतो,तर दुसरा मुलगा फुगे विकून खुश होतो”.

२१) बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणं मात्र तुमचाच हातात आहे.

२२) आयुष्याचा नियम पण कबड्डी या खेळासारखा आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात.

२३) वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी.

२४) आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं.

२५) जिथे चूक नसेल तिथे चुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका.

२६) लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला हा कधीही भांडण करून घेऊ नका तर समोरच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊन हा बदला घ्यायचा असतो.

२७) चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात परंतु दुर्बल लोकांना नेहमी पावरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त दिखावा करण्यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात.

२८) चांगले लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा देखावा करत नाहीत त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील, पण खोटे लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी ते दिखावा करता आणि ती गोष्ट त्यांच्या जवळ नसेल तर दुसऱ्याकडून मागून आणून त्याचा दिखावा करतात.

२९) चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे.

३०) जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगले लोक त्याचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटे लोक मात्र सगळ्यांना सांगत सुटतात की जे काही झालं ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झाल आहे.

३१) जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे, कोण काय करतो ? कशासाठी करतो? आणि का करतो? या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे तुम्ही जास्त खुश राहाल.

 

अशाप्रकारे स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. की जेणेकरून तुम्हाला समाजामध्ये मानसन्मान मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published.