चांगले विचार ….चांगले संस्कार.. घाबरु नका काही नाती तुटण पण गरजेचं असतं कारण ….!!

Uncategorized

मित्रांनो, चांगले विचार व चांगले सुविचार आपल्याला नेहमीच प्रत्येक वेळी सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात. ते आपल्या विचारांच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका अदा करतात. ज्या व्यक्तीकडे विचारांचा भक्कम पाया असतो तो व्यक्ती नेहमीच सकारात्मक राहतो व अशा व्यक्तीच्या सानिध्यात राहण्यास इतर व्यक्तींनाही खूप आवडते. असेच काही चांगले विचार आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

तुम्ही कधी नोटीस केलाय का? जे लोकं खुप कमी बोलतात.. पण तेच लोकं त्यांच्या आवडत्या व्यक्ती समोर खुप जास्त बोलत असतात…

बोलण तर सर्वांशीच होत पण आता विश्वास कोणावरच नाही राहिला.. आम्हाला जे ignore करतात त्यांच्याकडे आम्ही बघत सुद्धा नाही..

जीवनामध्ये कायम एकच नियम ठेवा.. मैत्री मध्ये गद्दारी नाही करायची आणि गद्दाराण सोबत मैत्री नाही करायची..

जर चूक ला चूक म्हणण्याची क्षमता तुमच्या मध्ये नाही.. तर तुमची ताकत आणि धाडस दोन्ही गोष्टी व्यर्थ आहेत..

एक नातं अस पण असल पाहिजे की आपण आपल प्रत्येक दुःख आणि तक्रार सांगू शकू.. खरं प्रेम फक्तं तीच लोकं करू शकतात जी कोणाच तरी प्रेम मिळावं म्हणून धडपडलेली असतात..

कोण म्हणतं की वेळ खूप फास्ट चालते.. कधी तर कोणाची वाट पाहून बघा समजून जाईल की वेळ किती हळू चालते..

प्रश्न हा आहे की.. जर एक जोक आपल्याला सारख सारख हसवू शकत नाही, तर मग एकच दुःख सारख सारख रडवू कस काय शकत..?

आम्ही वाकतो, कारण आम्हाला नाती निभवायला आवडतात.. नाहीतर तसे चुकीचे आम्ही काल पण नव्हतो आणि आज सुद्धा नाही..

जेव्हां लोक तुम्हाला copy करायला लागतील.. तेव्हा समजून जा की तुम्ही जीवनामध्ये प्रगती करत आहात..

ते तर आपलं आपलं नशिब आहे, कोणाला प्रेम करणारे मिळतात तर कोणाला भाव खाणारे मिळतात..

आम्ही तर हसतो दुसऱ्यांना हसवण्यासाठी नाहीतर घावं इतके आहेत की सरळ रडता पण येत नाही..

वेळ कधी काय रंग दाखवेल हे मला नाही माहीत.. कारण ज्या रामाला ज्या रात्री राज्य मिळणार होत त्याच सकाळी वनवास नसता मिळाला..

तुम्ही कितीपण चांगले व्यक्ती असलात.. तरी सुद्धा कोणाच्या ना कोणाच्या Life मध्ये किंवा त्यांच्या story मध्ये वाईट नक्कीच असता..

ज्याची काहीच गारंटी नाही त्याच नावं जीवन आहे, आणि ज्याची फुल गारंटी आहे त्याच नावं मृत्यु आहे..

दुसऱ्यांच्यावर अवलंबून असलेले लोकं कधीच आनंदी नाही राहू शकत.. म्हणुनच इतके सफल बना की तुमच्या गरजा आणि इच्छा तुमच्या तुम्हीच पुर्ण करू शकाल..

कोणाला स्वतःचा इतकाही वेळ देवू नका की तो तुमची किंमतच विसरुन जाईल..

जो तुम्हाला समजुन घेतो आणि वेळ पडलीच तर समजावून सुद्धा सांगतो.. त्याच्यापेक्षा चांगला जोडीदार असूच शकत नाही..

जो माणूस नियम बनवून आजच काम आजच करेल.. तोच माणूस एक दिवस जगावर राज्य करेल..

 

अशा प्रकारे हे काही चांगले विचार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.