मित्रांनो, आजकाल स्त्रियांसाठी खूप काही करून देखील स्त्रिया खुश होत नाहीत. पुरुष मात्र दिवस रात्र काम करून स्त्रीला काय हवे नको ते पाहत असतात व त्यांचे सर्व हट्ट पुरवत असतात. परंतु एवढे करून देखील ती स्त्री पुरुष होत नसेल व रोज नवनवीन मागण्या करत असेल तर अशावेळी एखादी स्त्री एखादा पुरुषाकडून जर खुश होत नसेल तर अशावेळी त्या पुरुषांनी काय केले पाहिजे? याचीच माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम पुरुषांनी ओळखण्याची गरज आहे की त्याने स्त्रीला खुश ठेवण्याची इच्छा जरूर धरावी पण तिने खुश रहावे ही त्याची जबाबदारी नाही. हे मात्र लक्षात ठेवावे. जेव्हा एखादा पुरुष स्त्रीच्या सुखाची वाजवीपेक्षा जास्त जबाबदारी स्वीकारतो तेव्हा जर ती सुखी झाली नाही तर तो त्याला जबाबदार ठरवत असतो. वास्तविक पाहता पुरुषाने स्त्रीच्या आनंदा बद्दल स्वतःला जबाबदार मानलं नाही पाहिजे. शहाण्या पुरुषाला हे मात्र नक्की कळतं की तिला जे काही वाटत आहे त्याला सर्वस्वी फक्त तीच जबाबदार आहे.
फक्त तिच्या दुःखात मात्र जबाबदारी ही त्याची असते. स्त्रीला खुश ठेवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणं आणि इतके प्रयत्न करून देखील तर ती खुश झाली नाही तर हे पाहण्याची गरज मात्र तुमची असते. या दोन गोष्टी म्हणजे प्रचंड तफावत आहे. स्त्रीला सुखी ठेवण्यासाठी तिच्यासाठी फक्त ती जेव्हा दुःखी असते तेव्हा तिच्याशी सहानुभूतीने वागण्याची गरज असते. जेव्हा स्त्री दुःखात असते तेव्हा तिच्या दुःखात सामील होणारा पुरुष तिला हवा असतो. तिला फक्त एवढेच हवे असते की तिला जे आता जाणवत आहे ते फक्त त्याला जाणवले पाहिजे.
मला आता काय वाटत आहे ते त्या पुरुषांनी आत्ता ओळखावं. असं तिला वाटत असत. स्त्रीला खुश ठेवण्यासाठी प्रत्येक पुरुषाने तिला प्रत्येक सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला घेऊन गेले पाहिजे. तिच्या आवडीच्या जागी जसं की समुद्रकिनारी घेऊन जाऊन तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला सांगितले पाहिजे. वेळोवेळी तिच्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव तिला करून दिली पाहिजे. कारण बहुतेक गोष्टी कितीही घेऊन जर ती खुश राहत नसेल तर तुम्हाला भरपूर प्रेम देऊनच तिला खुश करावे लागेल.
बऱ्याच पुरुषांचं असं म्हणणं असतं की आम्ही तिला कितीही बाहेर घेऊन गेलो तरी देखील ती खूश होत नाही. आम्ही तिला फिरायला घेऊन जातो, जेवायला घेऊन जातो, तिच्यासाठी गजरा घेऊन येतो तरी देखील बहुतांश स्त्रिया या खुश होत नाहीत. तर अशावेळी त्या पुरुषांनी स्त्रीच्या दुःखाच्या वेळेस तिला आधार दिला पाहिजे. ज्यावेळेस तिला एकटं वाटत असेल त्यावेळेस तिला आधार दिला पाहिजे. तिच्या सोबत राहिले पाहिजे. जेणेकरून तिला तुम्ही तिच्यावर करत असलेल्या प्रेमाची जाणीव होईल.
अशाप्रकारे या काही गोष्टी आहेत ज्या पुरुषाकडून एखादी स्त्री समाधानी होत नसेल तर त्या पुरुषांनी या गोष्टी केला पाहिजे.