मित्रांनो घाणेरी ही वनस्पती आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत असते याचे अनेक आयुर्वेदिक फायदे देखील आहेत आणि याची फुले फळे देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतात. मित्रांनो या झाडाची फांदी आहे त्या फांदीला काटे असतात यामुळे आपल्याला हात देखील लावू शकत नाही तर मित्रांनो या झाडाला रंगीबेरंगी कलरची फुले येत असतात काही ठिकाणी याला फक्त लाल कलरची फुले येतात याला जी फळे येतात ती फळे देखील खाण्यासाठी खूपच चांगले आणि चविष्ट असतात.
मित्रांनो याच्या पानांचा आपल्याला आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदा होत असतो याची जे पाने आहेत ती खूप औषधे असतात तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कोवळी पाने घ्यायचे आहे . डोकेदुखी मित्रांनो या पानांचा किंवा या फुलांचा जर तुम्ही वास घेतला तर तुमची डोकेदुखी काही वेळातच कमी होणार आहे . तीव्र डोकेदुखी साठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे. मुळव्याधासाठी देखील याचा खूप जास्त फायदा होतो.
या पानांचा काढा करून पिल्याने तुमचा मुळव्याध लवकरच कमी होणार आहे. मित्रांनो तुम्हाला यासाठी आठ ते दहा पाने घ्यायचे आहेत एक ग्लास पाण्यामध्ये ही पाने तुम्हाला उकळवायची आहेत आणि त्याचा अर्धा ग्लास पाणी होईल इतपत तुम्हाला उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर नाही जे आपल्याला काढा मिळालेला आहे तो एक कप सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला प्यायचं आहे याने मूळव्याध तुमचा लवकरच कमी होणार आहे.
दुसरा फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला घाणेरीच्या मुलांचा वापर करायचा आहे तुम्हाला यासाठी घाणेरी ची मुळे काढून घ्यायचे आहेत ती वाळवून तुम्हाला त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि ते पावडर तुम्हाला पाण्यामधून घ्यायची आहे. सर्दी खोकल्यावर देखील याच्या पानांचा काढा अतिशय गुणकारी ठरणार आहे दात दुखत असेल तर या पानांचा काढा केला आणि त्यांनी जर गुळण्या केला तर तुमची दात दुखी कमी होणार आहे.
त्याचबरोबर जर तुम्हाला कुठे लागले असेल किंवा जखम झाली असेल तर त्या जखमेवरती या पानांचा लेप लावला तर तो जखम लवकर कमी होणार आहे त्याचबरोबर मच्छरांना पळवून लावण्यासाठी देखील अतिशय चांगला याचा उपयोग होतो याची पाने तुम्हाला चुरगाळून तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी ठेवायचे आहेत याच्यावासाने मच्छर पळून जातात आणि जर तुमच्याकडे वाळलेले पाने असेल तर तुम्ही त्याची धुरी केला तरी देखील चालू शकते.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.