मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात उन्हामध्ये जास्त फिरल्यामुळे किंवा चेहऱ्यावरती केमिकलयुक्त फेस वॉश लोशन क्रीम लावल्यामुळे देखील चेहऱ्यावरती वांग येऊ शकतात चेहऱ्यावर पिंपल्स उठल्यामुळे चेहऱ्यावरती काळे डाग येतात मित्रांनो वेगवेगळी कारणं असतील पण चेहऱ्यावर वांग येतात काळे डाग येतात आणि त्यामुळे सौंदर्यामध्ये निश्चितच बाधा निर्माण होते आणि प्रत्येकालाच वाटतं माझा चेहरा सुंदर मुलायम असावा.
म्हणून मित्रांनो त्यासाठी मी एक घरगुती उपाय घेऊन आलो आहे अगदी स्वस्तामध्ये एक रुपयांपेक्षाही कमी खर्च आहे आणि सर्वांना करता येण्याजोगा हा उपाय आहे. वांग येण्याची कारण ही अनेक आहेत. मग ते पोटाचे विकार असतील, उन्हात फिरणे असेल, केमिकलयुक्त क्रीम चेहऱ्याला लावणे तसेच प्रदूषण असे हार्मोन्स बॅलन्स असेल किंवा त्याची वेगळी कारणे असतात. चेहऱ्यावरील पिंपल्स फोडल्यामुळे देखील चेहऱ्यावरती काळे डाग येतात.
आपल्या त्वचेमध्ये कोलेजन फायबर असते आणि हे चेहऱ्यातील त्वचा आहे ती मऊ सुंदर टाईट ठेवण्याचं काम करते. जेव्हा आपण कामानिमित्त आपण उन्हात फिरतो आणि आहारावर नियंत्रण ठेवत नाही तसेच कुठेही फिरतो कोलेजन फायबर डॅमेज होते आणि मग आपला चेहरा काळा दिसायला लागतो किंवा चेहऱ्यावर मुरमाचे डाग खड्डे येतात, काळे डाग येतात हे सर्व कमी होण्यासाठी मी आज तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि सहज व घरगुती उपाय सांगणार आहे.
यासाठी तुम्हाला पहिली बदलायची आहे ती म्हणजे रोज सकाळी तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर ती सवय आजच बदलून टाका जरा समजा एखाद्याला थंड पाण्याने अंघोळ करणे शक्य नाही मग या व्यक्तीने काय करायचं तर आंघोळ केल्याच्या नंतर थंड पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा धुवायचा. जेव्हा आपण गरम पाण्याने चेहरा धुतो तर आपल्या चेहऱ्यावर रोम छिद्र असतात ते फुलतात म्हणजे त्याची साईज मोठी होते साईज मोठी झाली की जे साबणामध्ये जे घटक आहेत जसं सोडियम सल्फेट पुन्हा पॅरामीन आणि अनेक प्रकारचे केमिकल्स आपल्या त्वचेमध्ये प्रवेश करतात यामुळेच चेहऱ्यावर काळे डाग खड्डे, वांग येतो आणि पिगमेंटेशन येतं मग हेच घालवण्यासाठी तुम्ही शक्यतो गरम पाण्याने अंघोळ न करता थंड पाण्याने करा आणि थंड पाण्याने करणे शक्य नसेल तर मग आंघोळ केल्याच्या नंतर साधारणतः थोड्यावेळाने किंवा लगेच थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. थंड पाण्याने धुऊन घेण्यासाठी जरी नको वाटत असेल तर थंड कपडा घ्या ओला कपडा घ्या साधा सुती असेल तरी तो पाण्यात भिजवा आणि चेहरा पुसून घ्यायचा आहे यामुळे निश्चितच तुमचे चेहऱ्यावरील डाग सुरकुत्या किंवा जे काळे पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल.
दुसरा उपाय आपल्याला रोज संध्याकाळी करायचे आहे आपल्याला दोनच घटक आहेत आपल्याला जेष्ठमध आणि दुध लागणार आहे. ज्येष्ठमध आयुर्वेदिक मेडिकल किंवा बऱ्याच दुकानावर किराणा दुकानावर सहज उपलब्ध होईल. जेष्ठमधाचा पावडर बनवायचे पावडर बनवा आणि याच साधारणता एक चमच किंवा एक चम्मच पावडर बनवलं तर तुम्ही एक चमचा दूध घ्या आणि ते मिक्स करून ते तुम्ही चेहऱ्यावर लावायचे. संध्याकाळी झोपण्यापूर्वी सलग पाच ते सात दिवस आणि सात दिवसानंतर बघाल की तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग पिगमेंटेशन आणि जे मुर्वाच्या खड्डे ते भरून निघतील.
ब्लॅकहेड्स त्यावरही हा उपाय केला तरी चालतो. ज्येष्ठमध आणि दुध यांचे मिश्रण हे कॉटन कापसाचा वापर करून तुमच्या त्वचेवर असं लावून सर्क्युलर मोशन मध्ये थोडीशी मालिश करायची आहे आणि हे अर्ध्या तासाने धुऊन टाकायचा आहे. मात्र गरम पाणी कोमट पाणी न वापरता फक्त थंड पाणी वापरायचे. मग तुमच्या चेहऱ्यावरील जे कॉलेजन आहे ते चांगले ठेवण्याचं काम करतात आणि यामुळे तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग सुरकुत्या मुरमाचे खड्डे किंवा वांग पिगमेंटेशन येत नाही आणि असेल ते हळूहळू कमी होऊन जातात या पद्धतीने तुम्ही जर हा उपाय केला व ती आंघोळीची एक सवय बदलली तर तुमचे ह्या समस्या आहेत त्या सहज सुटतील.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.