मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा एक भाग आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. पण आता याची चिंता अजिबात करू नका. आज आम्ही तुम्हाला वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरघुती आणि रामबाण उपाय सांगणार आहोत.
मित्रांनो आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हणतात. .ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेचा काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो.त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे येतात. मित्रांनो अशा प्रकारचे काळे डाग किंवा चट्टे ज्यावेळी आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर येतात त्यावेळी आपण खूप घाबरून जातो. ज्यावेळी आपण ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स आणि महागडी औषधे लिहून देतात.
आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग कमी होत नाहीत. याउलट आपल्या चेहऱ्यावर त्या औषधांचा साईड इफेक्ट होण्यास सुरुवात होते. तर मित्रांनो जर तुम्हालाही अशा पद्धतीने चेहऱ्यावर काळे डाग किंवा चट्टे उठले असतील आणि तुम्हीही डॉक्टरांकडे जाण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो थांबा. याआधी आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले सोपे घरगुती उपाय करून पहा. हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या समस्या लवकरात लवकर दूर होतात. कारण हे उपाय आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले असतात आणि त्याचबरोबर हे उपाय आपण नैसर्गिकरित्या आपल्या घरामध्ये सहज करू शकतो. तर मित्रांनो आज आपण आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या काळे डाग, वांग यांवरच काही सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिला एक बटाटा घ्यायचा आहे बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे व एकदम बारीक मध्ये गोल गोल चिरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक वाटी घ्यायची आहे व त्याच्यामध्ये मुलतानी माती तुम्हाला घ्यायची आहे किंवा चंदन पावडर घेतला तरी देखील चालू शकते आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे गुलाब जल तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एका वाटीमध्ये मुलतानी माती दोन ते तीन चमचे घ्यायचे आहेत व त्याच्यामध्ये गुलाब जल एक चमचा टाकायचा आहे .
त्याचे योग्य असे मिश्रण करून तुम्हाला तयार करून तुम्हाला घ्यायचा आहे व त्याच्यानंतर आपण जो बटाटा चिरलेला आहे त्याची एक काप तुम्हाला घ्यायची आहे व त्याच्यावर गुलाब जल टाकायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पिगमेंटेशन किंवा काळे डाग किंवा सुरकुत्या आल्या असेल त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रब करायचा आहे आणि स्क्रब करून झाल्यानंतर आपण जी तयार पेस्ट केलेली आहे ती तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचे आहे .
तुम्ही ब्रशच्या साह्याने लावू शकता किंवा हाताच्या साह्याने लावला तरी देखील चालू शकतो ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त काळे डाग दिसतात किंवा जिथे सुरकुतलेला भाग जास्त आहे त्या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे आणि त्याच्यानंतर न तुम्हाला 20 ते 25 मिनिटे ते तसेच ठेवून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला कोमट पाण्याने स्वच्छ चेहरा धुऊन घ्यायचा आहे.असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग पुरळ किंवा आणि काही वेगवेगळे प्रॉब्लेम असतील तर ते निघून जाणार आहेत तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.