मित्रांनो एका आठवड्यात चार किलो वजन वाढवा आणि तेही फक्त घरगुती उपायाने असा हा साधा सोपा घरगुती उपाय आज आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपण पाहतो की काही व्यक्ती या अंगाने अत्यंत सडपातळ असतात. तसेच मरगळलेली देखील असतात. अशा काही व्यक्ती असतात ज्यांचे गाल नेहमी बसलेले असतात अंगातली हाडे वरती आलेली दिसतात.
यामुळे अगदी लग्नासारखी उदाहरण घ्यायचे झाले तरी असा मुलगा किंवा मुलगी कोणी पसंत करत नाही. आणि चार चौघांमध्ये देखील अशा व्यक्तींना नावे ठेवली जातात. चेष्टा केली जाते. असे अनेक उदाहरणे प्रकृती खराब असल्याने वजन कमी असल्याने आपणाला दिसून येतात.
तर मित्रांनो अशा व्यक्तींना वजन वाढवणे अंगातील मास वाढविणे अशा गोष्टींची गरज असते. यासाठी आपण दवाखान्यामध्ये गेले असता तेथील उपचार हे आपल्या खिशाला परवडणारे नसतात त्याचबरोबर वेळेचा देखील अभाव असतो. तर मित्रांनो अशा ज्या व्यक्तींना आपले वजन वाढवायचे आहे तब्येत प्रकृती सुधारणा करून घ्यायची आहे त्यांनी हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि सविस्तर माहिती जाणून घ्या.
मित्रांनो वजन वाढीसाठी आपण जो उपाय पाहणार आहोत त्यासाठी आपणाला खारीक, एक ग्लास दूध, पांढरे तीळ, गुळ हे पदार्थ लागणार आहेत. मित्रांनो आपण वजन वाढीसाठी जो पदार्थ तयार करणार आहोत त्याची कृती आता थोडक्यात पाहू…
मित्रांनो सुरुवातीला काही खारका घेऊन त्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पूड करून घ्यावी. यानंतर चांगल्या फॅटचे म्हशीचे दूध एक ग्लास भर घ्यावे. आणि पांढरे तीळ गरम करून त्याची देखील बारीक पूड करून घ्यावी या तिन्ही वस्तू तयार झाल्यानंतर जे आपण एक ग्लास दूध घेतलो आहोत ते गरम करून घ्यावे.
मित्रांनो हे दूध गरम करताना त्यामध्ये एक ते तीन चमचे खारीक पावडर जी आपण बारीक करून ठेवला होता ती टाकावी. यानंतर पांढरे तीळ ज्याची आपण पूड केलं होतो ती एक चमचा घालावी आणि चवीसाठी थोडासा गुळ घालावा यानंतर हे दूध उकळून कोमट झाल्यानंतर आपण ते प्यायचे आहे.
शक्यतो हे दूध पिताना आपण सकाळी नाष्ट्याचे वेळी प्यावे किंवा रात्री जेवण झाल्यानंतर झोपताना जेवणानंतर एक तास झाल्यानंतर पिऊन झोपावे. त्याचबरोबर हे पिल्यानंतर काही वेळाने दोन केळी खाल्ल्यास अत्यंत उपयुक्त ठरते. मित्रांनो या उपायाने आपण एका आठवड्यामध्ये चार किलो वजन वाढवू शकता. असा हा घरगुती रामबाण उपाय आपण नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.