मित्रांनो अलीकडे एक जागतिक समस्या निर्माण झालेली आहे. ती म्हणजे खूप लोकांचे वजन वाढत आहे. वाढलेले वजन कमी कसे करावे या चिंतेत सर्वच लोक आहेत. यासाठी ते वेगवेगळे उपाय डायट करून आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच आपण असे एक फॅट कमी करण्याचे ड्रिंक पाहणार आहोत म्हणजेच फॅट कटर ड्रिंक पाहणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल. आपण जे अन्न खातो त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते.
परंतु जास्त जेवण केल्याने किंवा संतुलित आहार न घेतल्याने आपले वजन वाढते. अतिरिक्त जेवण केल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर एनर्जीत न होता ते फॅट्स मध्ये रूपांतर होते म्हणजेच चरबी मध्ये रूपांतर होतं. जेव्हा आपले वजन वाढायला लागते. तेव्हा सर्वप्रथम ही चरबी पोटावर साठते आणि आपल्या पोटाचा घेर वाढतो. वेळीच उपचार न केल्यास हा पोटाचा घेर आणखीनच वाढत जातो.
मित्रांनो एकदा का पोटाचा घेर वाढला म्हणजे चरबी अतिरिक्त प्रमाणात वाढली की, रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि हाय ब्लड प्रेशर हृदयातील ब्लॉकेज यांसारख्या भयानक आजारांना तोंड फुटते. तसेच डायबिटीस सारखे आजार बळावतात तर असे हे आजार होऊ नये आणि तुमचे वाढलेले वजन आणि सुटलेले पोट कमी व्हावे यासाठी अत्यंत तुमच्यासाठी एक अत्यंत प्रभावी असे फॅट कमी करण्याचे ड्रिंक घेऊन आलेलो आहोत.
या फॅट कमी करण्याचे ड्रिंकमुळे तुमच्या पोटावरील चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल आणि तुमचे पोट अगदी सपाट होईल. चला तर जाणून घेऊयात हे फॅट कमी करण्याचे फॅट कटर ड्रिंक कसे बनवायचे आणि ते कशा पद्धतीने घ्यायचे.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी एका बाऊलमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा सुंठ पावडर घ्यायचे आहे. मित्रांनो सुंठ पावडर आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल आणि जर तुम्हाला ती मिळाली नाही तर अशावेळी तुम्ही जे आलं असतं ते उन्हामध्ये वाळवून त्याची पावडर तयार करू शकता. तर मित्रांनो अशी ही सुंठ पावडर आपल्याला एक ते दोन चमचा सर्वात आधी एका बाऊलमध्ये घ्यायची आहे.
त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा काळीमिरी पावडर घ्यायची आहे. मित्रांनो काळीमिरी पावडर सुद्धा आपल्याला किराणा मालाचे दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल किंवा जर तुमच्या घरामध्ये काळी मिरी असेल तर ती तुम्ही बारीक करून त्याची पावडर या उपायासाठी वापरू शकता. तर मित्रांनो सर्वात आधी या दोन पदार्थांची पावडर आपल्याला एक एक चमचा घ्यायची आहे.
त्यानंतर मित्रांनो हे दोन्ही पावडर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याच बाऊलमधे एक चमचा लॉंग पेपर्स म्हणजे लेंडी पिंपळी. मित्रांनो ही तुम्हाला आयुर्वेदिक दुकानांमध्ये याची पावडर सहज उपलब्ध होईल. जर तुम्हाला ही मेडिकलमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळाली नाही तर अशावेळी तुम्ही ऑनलाईन सुद्धा याची पावडर मागवू शकता.
तर मित्रांनो हे तिन्ही पदार्थ घेतल्यानंतर त्याची आपल्याला पावडर एकत्र करून घ्यायचे आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळच्या जेवणानंतर आपल्याला एक एक चमचा या तिन्ही पावडर यांची मिश्रण केलेली जी पावडर आहे ती पावडर घ्यायची आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने याचे सेवन जर आपण नेहमीच पणे सात ते आठ दिवसांपर्यंत केले तर यामुळे आपल्या शरीरावर असणारे अतिरिक्त चरबी निघून जाईल. जेव्हा आपल्या शरीरावरचे चरबी निघून जाते. त्यावेळी आपले वजन आपोआप कमी होते. म्हणूनच मित्रांनो आपण आपल्या आयुर्वेदिक पदार्थ वापरून हा एक छोटासा उपाय जर आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपले वजन नक्की कमी होईल. त्याचबरोबर आपली पचनसंस्था ही या उपायामुळे नक्की चांगली होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.