मित्रांनो, आपण सर्वजण स्वामींची मनोभावे सेवा करीत असतो. स्वामी हे आपल्यावर कोणतीही अडचण किंवा संकट येऊ देत नाहीत. त्यांचा सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये ते निर्माण करतात. तसेच अडचणीतून आपणाला बाहेर देखील स्वामी करतात. स्वामी आपल्या सदैव पाठीशी असतात. त्यामुळे प्रत्येक सेवेकरी हा स्वामींची अगदी भक्ती भावाने पूजा सेवा करीत असतात. मित्रांनो बऱ्याच जणांना स्वामींची प्रचिती अनुभव आलेले आहेत.
तर मित्रांनो आज आपण अशाच एका ताईंचा अनुभव जाणून घेणार आहोत त्यांच्याच शब्दांमध्ये. तर त्यांना देखील स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव त्या आपणाला सांगत आहेत. तर मित्रांनो त्यांच्याच भाषेमध्ये जाणून घेऊयात हा स्वामींचा अनुभव
नमस्कार मित्रांनो माझं नाव उज्वला संतोष कोसरे. तर मित्रांनो मला आलेला स्वामींचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्ही देखील सुन्न व्हाल. लग्नानंतर मला एका वर्षाने दिवस गेले. परंतु ते मिस कॅरेज झालं. असं माझ्या बाबतीत दोन ते तीन वेळा झालं. मग आम्ही डॉक्टरांच्या सांगण्यावरून चेकअप देखील केलं. पण सर्व रिपोर्ट नॉर्मल आले.
आम्ही परत एकदा चान्स घेतला. त्यावेळेस मला दोन महिने पंधरा दिवस झाले होते. मग मला अचानक रक्तस्त्राव होऊ लागला. त्यावेळेस मला खूप अशक्तपणा देखील आला होता.आम्ही डॉक्टरकडे गेलो. तेव्हा डॉक्टर बोलले बाळाचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. दहा पंधरा दिवसांनी सोनोग्राफी माझी चालू होती.डॉक्टरांनी सांगितलं होतं की सतत अबोषन केल्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे मला नऊ महिने कोणतेही हालचाल न करता पूर्णपणे आराम करायला सांगितला. मी खूप घाबरले होते.
मला चवथा महिना लागला होता. मला देवपूजेची खूपच आवड होती. त्यामुळे मी आईला सांगितलं की मी घटस्थापनेची पूजा करेन. कारण सगळंच बसून करायचे होते आई हो म्हणाली.
म्हणून मी देवपूजेला लागले. देवघर वगैरे स्वच्छ करून मी देवपूजा आटोपली.
दोनच्या दरम्यान मी झोपायला गेले. त्यावेळेस मला मग अचानक रक्तस्त्राव होऊ लागला माझ्या मिस्टरांनी मला जवळच्या दवाखान्यांमध्ये नेले. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितले की यांची ट्रीटमेंट जिथे चालू आहे तिथे घेऊन जा.
परंतु शनिवार रविवार असल्यामुळे तो दवाखाना बंद होता आणि त्या डॉक्टर हे परगावी गेलेल्या होत्या. त्यामुळे आम्हाला ट्रीटमेंट ज्या ठिकाणी चालू होती त्या दवाखान्यामध्ये जाणं शक्य झालं नाही. मग रविवारी अचानकच माझ्या पोटांमध्ये दुखू लागलं. रक्तस्त्राव भरपूर प्रमाणात होऊ लागला आणि पोटातून सळसळ असा आवाजही येऊ लागला.
मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं. मिस्टरणि लगेचच आमच्या सासूबाईंना सांगितल्यानंतर घरातील सर्वच जण घाबरून गेले. घशातून अन्नाचा कण नव्हे तर पाणी देखील उतरत नव्हते. माझी सासुबाई आणि मिस्टर देखील घाबरले होते. परंतु त्यांनी मला तसं जाणवू दिलं नाहीय. उलट ते मला आधार देत होते. माझी स्थिती खूपच घाबरलेली होती. कारण डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की जास्त प्रमाणात जर रक्तस्त्राव झाला तर आम्हाला नाईलाजपणे गर्भाशय काढावा लागेल.
नंतर माझ्या मिस्टरांनी देवघरामधील अंगारा आणून मला लावला. आमच्या सासुबाई देखील देवघरामधून उठल्या नाहीत. सर्वजण आम्ही परमेश्वरा जवळ प्रार्थना करत होतो. अचानक मिस्टरराना डोळा लागला. त्यावेळेस त्यांना स्वप्न पडलं की आमच्या इथे जी महादेवाची पिंड आहे तिथे मी आणि माझे पती आणि आमच बाळ देखील होत.
ते अचानक उठले. त्यांनी सर्व आम्हाला सांगितलं आणि मला सगळे काही नीट होईल असे सांगितले. खात्री करण्यासाठी आम्ही डॉक्टरांकडे जाणार होतो. त्यावेळेस पहाटेचे साडेपाच झाले होते आणि मी आधी आंघोळ करून देवासमोर बसले. देवासमोर उदबत्ती लावून देवाकडेच माझं मन मोकळं केलं. थोडं रागात मी म्हणाले की आता जर माझ्या बाळाला काही झालं तर मी तुझ तोंड देखील बघणार नाही.
आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो. त्यांनी माझं चेकअप केलं. ते म्हणाले बाळाचे ठोके व्यवस्थित सुरू आहेत. पण आपण सोनोग्राफी करून पाहू. डॉक्टराणि सोनोग्राफी केली आणि रिपोर्ट देखील नॉर्मल आले. डॉक्टरांनी सांगितलं तुमचा रक्तस्त्राव थांबत नसल्याने तुम्ही पूर्णपणे आराम करायचा. कसलीच हालचाल करायची नाही. अगदी खानापिन देखील बेडवरच करायचं. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले तरी रक्तस्त्राव काही थांबत नव्हतं.
नंतर डॉक्टरांनी चार दिवसांनी परत चेकअप साठी बोलवलं होतं. तेव्हाही सोनोग्राफी केली त्यावेळेस मात्र बाळाच्या डोक्यात रक्ताचे गाठ असल्यास रिपोर्ट मध्ये दिसलं. डॉक्टरांनी सांगितलं की जर बाळाला त्रास झाला तर ऑपरेशन करावे लागेल. मग आम्ही घरी आलो आणि मला माझ्या घरच्यांनी आराम करण्यासाठी माझ्या नंदेकडे मला ठेवलं होतं.
मी ताईच्या घरी आल्यावर सुद्धा खूप रडत होते. ताईंना भेटायला त्यांची एक मैत्रीण आली होती. त्यांनी मला रडताना पाहिलं आणि म्हणाल्या रडू नको. समर्थ आहेत. त्यांनी स्वामींची सेवा सांगितली आणि त्या मला म्हणाल्या तू गुरुचरित्राचे पारायण कर. मला पाचवा महिना उलटून पंधरा दिवस झाले होते. मग मी सात दिवसांच पारायण करायचं ठरवलं.
माझ्या घरचे खूप घाबरत होते की, बाळ जर अपंग झालं तर काय करायचं. या गोष्टीच खूप टेन्शन यायचं. म्हणून मी पारायणाला सुरुवात करण्याआधी असा संकल्प सोडला होता की, माझं बाळ अपंग न होता हुशार होऊ दे. मग मी त्याच नाव गुरु ठेवेन.
माझा रक्तस्त्राव देखील थांबू दे. असा संकल्प सोडून मी पारायणाला सुरुवात केली. त्या दिवशी ताई मला म्हणाल्या की उद्यापासून तू स्वतः उठून सर्वात जर. पण खूप जास्त गोळ्या असल्यामुळे मला गुंगी यायची. सतत झोप यायची. त्यामुळे माझा डोळा लागायचा. मात्र स्वामींना माझी काळजी होती.
ते स्वतः मला उठवायला यायचे. त्या दिवशी मी एका कुशीवर झोपले होते आणि मला जमिनीतून कोणीतरी काहीतरी वाजवण्याचा आवाज आला. मला अचानक जाग आली आणि माझ रक्त देखील थांबल. मला आठव्या महिन्यातला एक दिवस बाकी होता. मग आम्ही चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेलो. तिथे आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की आताच्या आता दुसऱ्या हॉस्पिटल अडमिट व्हावं लागेल.
डॉक्टर म्हणाले की तुमच बाळ पायाळू आहे. तुमच आता सिजर कराव लागेल आणि बाळाला काच पेटीमध्ये ठेवाव लागेल. त्यावेळेस मी आणि माझे मिस्टर खूप घाबरलो. डॉक्टरांनी मला ऍडमिट केलं. त्या दिवशी गुरुवार होता आणि त्याच रात्री मला मिस्टरांच्या स्वप्नाप्रमाणे मुलगा झाला.
पण मुलाचे पाय थोडे वाकडे होते. म्हणून त्याच हॉस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट सुरू होती. त्यावेळेस डॉक्टर बोलले होते की बाळाच्या डोक्यात गाठ असल्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. पण आता आमच्या बाळाला एक वर्ष सहा महिने झाले आहे पण आमच बाळ स्वामींच्या कृपेने उत्तमरीत्या चालू शकते.
त्याला कसलाच त्रास नाही. त्या दिवशी मला स्वामींच्या अशक्य हे शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती आली. स्वामींची लीला अपारंपार आहे. असा माझा अनुभव होता.
मित्रांनो अशा प्रकारे उज्वलाताईंना स्वामींचा अनुभव आला. म्हणजेच जे शक्य नव्हते ते देखील स्वामींनी शक्य करून दाखवले. त्यामुळेच मित्रांनो तुम्ही स्वामींची सेवा करताना अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करा. तुम्हाला देखील स्वामींची प्रचिती नक्कीच येईल.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.