तुमच्या ही देवघरांमध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर या चुका अजिबात करू नका, नाहीतर स्वामी कधीच प्रसन्न होणार नाहीत ….!!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण सगळे स्वामी भक्त आहोत. आणि आपल्या सर्वांनाच त्यांची सेवा करण्याची त्याची भक्ती करण्याची खूप आवड आहे. आपल्या पैकी प्रत्येक जण आपापल्या परीने आणि जमेल तसे स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि मित्रांनो अजूनही बरेच स्वामीभक्त स्वामींची सेवा करू इच्छितात, आणि त्यांची अशी इच्छा असते की आपण एखादा असा छानसा फोटो स्वामींचा विकत घ्यावा. आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये लावावा. परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांना म्हणजेच स्वामीभक्तांना नेहमी प्रश्न पडतो, तो म्हणजे की घरात ठेवण्यासाठी स्वामींचा कोणता फोटो विकत घ्यावा.

मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की तुम्ही स्वामींचा कोणताही फोटो घ्या. पण त्या फोटोमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले असायला पाहिजेत. ज्या फोटोमध्ये स्वामी उभे आहेत. असा फोटो तुम्हाला घ्यायचाच नाही. त्याच बरोबर जर का त्या फोटोमध्ये कोणता प्राणी असेल. किंवा स्वामी समर्थ महाराज कोणत्या प्राण्या बरोबर बसलेली असतील. तर तो फोटो सुद्धा तुम्हाला घ्यायचा नाही. अगदी साधा सरळ फोटो ज्यामध्ये स्वामी बसलेले आहेत. फक्त असाच फोटो विकत घ्यावा. मित्रांनो स्वामींचा फोटो आपल्याकडे आधीपासून असेल. तर तो कोणत्या दिशेला लावावा याबद्दल आपल्या मनात शंका येतात.

तुम्ही स्वामीचा फोटो कोणत्याही रूम मध्ये लावा काही हरकत नाही, पण तो फोटो पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावावा. मित्रांनो तुम्ही एका पाटावर सुद्धा, शुभ्र धुतलेल वस्त्र मांडून त्यावर फोटो ठेवू शकता. परंतु मित्रांनो एक गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल तर तो आपण आपल्या घरामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी स्थापन करायचं आहे.

परंतु मित्रांनो आजच्या आपण गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत ही गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर स्वामींचा फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर मित्रांनो अशावेळी आपण एक गोष्ट न चुकता केली पाहिजे ती म्हणजे स्वामींची सेवा.

मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे किंवा ज्या काही अडचणी आपल्या जीवनामध्ये आहे त्या सर्व दूर करण्यासाठी स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे असतातच. फक्त आपण दररोज स्वामींची सेवा करून स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा आणि मित्रांनो यावेळी आपण स्वामींचे नित्यसेवा करतो किंवा स्वामींची तर कोणती सेवा करतो. तर यामुळे स्वामी आपल्यावर कायमच प्रसन्न राहतात.

म्हणून मित्रांनो आज आपण गोष्ट जाणून घेणार आहोत हीच आहे की आपल्याला आपल्या घरामध्ये असणारे स्वामींचे फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसून स्वामींची कोणती ना कोणती तरी एक छोटीशी सेवा तरी नक्की करायची आहे.

अशा पद्धतीने मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल तर अशावेळी तुम्ही स्वामींची एखादी तरी सोपी सेवा करायला नक्की सुरुवात केली पाहिजे आणि मित्रांनो जर तुम्हाला सेवा करणे शक्य होत नसेल तर अशावेळी तुम्ही स्वामींचा जो वार असतो म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामींची विशेष सेवा तरी नक्कीच केली पाहिजे.

त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल तर अशावेळी तुम्ही स्वामींची एखादी तरी छोटीशी सेवा घरांमध्ये नक्की करायला सुरुवात करा आणि त्याचबरोबर मित्रांना स्वामींची सेवा करत असताना किंवा स्वामींची पूजा करत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे स्वामींच्या पूजेमध्ये आपल्याला काळ्या कलरच्या गोष्टींचा किंवा कापडांचा वापर करायचा नाही.

मित्रांनो काळा कलर आपल्या स्वामींना आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये या रंगाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वापरणे आपल्याला टाळायच आहे. त्याचबरोबर मित्रांनो स्वामींची सेवा करत असताना स्वामींना रोज तोच हार घालत असाल किंवा एकच हार तुम्ही जास्त दिवसांपर्यंत वापरत असाल तर मित्रांनो ही एक चूक आजपासूनच करणे तुम्ही बंद करा.

कारण मित्रांनो यामुळे स्वामी आपल्यावर नाराज होऊ शकतात आणि म्हणूनच तुम्ही स्वामींना दररोज एकच हार घालणे टाळायचा आहे. मित्रांनो जर तुम्हाला हा दररोज हार घालणे शक्य नसेल तर तुम्ही दोन ते तीन फुले सुद्धा स्वामींना वागू शकता.

त्यानंतर मित्रांनो शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट मध्ये जेव्हाही तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा दररोजच्या कामासाठी जेव्हा घराच्या बाहेर जात असतात तेव्हा तुम्हाला स्वामींना मुजरा करून किंवा स्वामींना नमस्कार करूनच घराच्या बाहेर पडायच आहे. घराच्या बाहेर या महत्त्वाच्या कामासाठी जात असताना आपल्याला सर्वात अधि स्वामींचा नमस्कार घ्यायचा आहे.

स्वामींना प्रार्थना करायचे आहे की जे काही काम करण्यासाठी मी चाललो आहे त्या कामांमध्ये मला यश मिळू दे. अशा पद्धतीने स्वामींना नमस्कार करायचा आहे. मगच त्या कामासाठी आपल्याला बाहेर जायचं आहे. तर मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत याचे पालन तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असेल तर नक्कीच केल्या पाहिजे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.