स्वप्नात देव दिसले तर आपल्याला मिळतात हे संकेत, अजिबात दुर्लक्ष करू नका जाणून घ्या यांचा अर्थ…..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, प्रत्येकाला स्वप्ने पडत असतात, प्रत्येक स्वप्नाला अर्थ असतो आणि त्या नुसार त्याचे फळ मिळत असते . दोन प्रकारची स्वप्ने असतात, एक म्हणजे आपण गाढ झोपेत असताना जी स्वप्ने पाहतो आणि दुसरे म्हणजे आपण आपल्या अद्भुत भविष्याबद्दल विचार करत असताना जे पाहतो. स्वप्न हे वास्तव नसून एक कल्पना असते, जी आपण भविष्यात साध्य करू इच्छितो. आपण झोपेत पाहत असलेली स्वप्ने आपल्या आयुष्याशी संबंधित असतात. अनेक वेळा स्वप्नात आपण अशा घटना पाहतो ज्याचा संबंध आपल्या भूतकाळाशी किंवा भविष्यात घडणाऱ्या घटनाशी असतो.

 

काही वेळा, आपण रात्री स्वप्न पाहतो कारण आपल्या जीवनात “मणी वसे ते स्वप्नी दिसे” अशी स्थीती असते.

स्वप्ने नेहमीच अपूर्ण नसतात, ती अनेकवेळा सत्यात उतरतात, कधी स्वप्ने क्षणार्धात सत्यात उतरतात तर कधी काही काळानंतर ती फळ देतात. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ आणि महत्त्व असते. स्वप्ने हे आपल्या भविष्याचे आरसे आहेत, ते आपल्याला आगामी संकटांबद्दल आगाऊ चेतावणी देतात. सकाळी पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरतात असे म्हणतात. यात कितपत तथ्य आहे याची खात्री नाही, परंतु स्वप्नात दिसणारी प्रत्येक वस्तू, व्यक्ती किंवा घटनेचा काही खोल अर्थ असतो.

 

जितके जास्त आपण ही घटना आणि त्याचा अर्थ समजून घेऊ, तितकेच आपण आपल्या आंतरिक भावना आणि खोल रहस्ये समजून घेऊ शकतो. स्वप्नांचा अर्थ लावण्याची क्षमता असणे हे एक शक्तिशाली साधन आहे. तुमची स्वप्ने तुमच्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही.स्वप्नात प्रत्येक गोष्ट, व्यक्ती, प्राणी, भावना, मनःस्थिती, रंग, ठिकाण, सर्व काही दाखवले जाते. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर तुम्ही तुमच्या स्वप्नात काय पाहता ते लक्षात ठेवायला हवे.

 

बर्याच लोकांना ही समस्या आहे ती म्हणजे, त्यांना रात्री पडलेली स्वप्ने सकाळी आठवतच नाहीत, सकाळी उठल्यानंतर आपण रात्री जे पाहिले ते विसरतात. सकाळी, आपल्या स्मरणशक्तीवर ताण द्या आणि पडलेल्या स्वप्नाबद्दल विचार करा; जेणे करून आपण ते लक्षात ठेवू शकाल, आजच्या लेखन मध्ये जर आपल्याला स्वप्नामध्ये देवी देवता दिसले तर त्याचा अर्थ काय होतो याची माहिती जाणून घेणार आहोत.

 

स्वप्नामध्ये देवी देवता अनेक कारणाने दिसत असतात त्यातील पहिले कारण म्हणजे तुमची देवी देवतांवर असलेली श्रद्धा. त्याचबरोबर तुम्ही जर कोणते देवाचे कार्य करण्यास राहून गेला असाल तर या अशा वेळेस देखील देवी देवता तुम्हाला पुन्हा एक संधी देण्यासाठी तुमच्या स्वप्नामध्ये येतात. तसेच स्वप्नामध्ये देवी देवतांचे दर्शन होणे हे भविष्यामध्ये काहीच शुभ संकेत असल्याचे देखील संकेत असतात. जर स्वप्नामध्ये तुम्हाला श्रीहरी विष्णू दिसले तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला भविष्यामध्ये आपला भाग्योदय होणार आहे. आपले भविष्यामध्ये चांगले होणार आहे. आपले सर्व स्पष्ट संपणार आहे. श्रीहरी विष्णू स्वप्नामध्ये पाहणे हे सुख व समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

 

देवी लक्ष्मीला स्वप्नामध्ये पाहणे हे सुख-समृद्धी आणि प्रतिष्ठेचे लक्षण आहे. तसेच याचा अर्थ असा देखील होतो की आपल्याला व्यापारामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. प्रभू श्रीराम जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसले तर याचा अर्थ असा होतो की आपण लवकरच यशाचे शिखर गाटणार आहोत. देवी सीता जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसला तर याचा अर्थ असा होतो की आपण ज्या कार्याची खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत होतो ते कार्य आता पूर्ण होणार आहे.

 

श्रीकृष्ण आपल्याला स्वप्नामध्ये दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की आपले प्रेम संबंध योग्य दिशेने जात आहेत व आपण लवकरच आपला प्रेम संबंध मध्ये यशस्वी होणार आहे. स्वप्नामध्ये देवी राधा चे दर्शन झाले तर असे समजून जावे की आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद येणार आहे. जर तुम्हाला स्वप्नामध्ये महादेवांचे दर्शन झाले तर याचा अर्थ असा होतो की आपण अध्यात्मिक मार्गामध्ये उन्नतीच्या शिखरावर आहोत. त्याचबरोबर आपली पापे व संकटे नष्ट होत आहेत. जर स्वप्नामध्ये हनुमानाचे दर्शन झाले तर याचा अर्थ असा होतो की आपण भीतीवर विजय मिळवला आहे.

 

त्याचबरोबर देवी दुर्गा आपला स्वप्नामध्ये आल्या तर हे शक्तीचे प्रतीक आहे व आपली सर्व रोग दूर होण्याचे प्रतीक आहे. जर स्वप्नामध्ये ब्रह्मदेव आले तर याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये सर्व चांगले होणार आहे. त्याचबरोबर जर गणपती आपल्या स्वप्नामध्ये आले तर आपली सर्व अडलेली कामे पूर्ण होणार आहे. आपली सर्व संकटे दूर होणार आहेत व आपण उन्नतीच्या मार्गावर जाणार आहोत असा अर्थ होतो. देवी सरस्वती जर तुमच्या स्वप्नामध्ये आली तर तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करणार आहात असा अर्थ मानला जातो.

 

जर स्वप्नामध्ये यमदेवाले तर तुमचे आयुष्य वाढण्याचा संकेत मानला जातो. कालीमाता जर तुमच्या स्वप्नामध्ये आली तर तुम्ही आध्यात्मिकेकडे तुमचा कल असल्याचे सांगितले जाते. जर तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी आल्या असतील आणि आपण काय करावे हे कळत नसेल. खूप गुंतलेल्या स्वरूपाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही असाल. तर अशावेळी तुमच्या स्वप्नामध्ये देवी देवता आले तर असे समजून जा की त्या कामांमध्ये तुमच्या मागे देवी देवतांचा आशीर्वाद आहे आणि तुमचे काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहे.

 

अशाप्रकारे देवी देवता जर आपल्या स्वप्नामध्ये आले तर त्याचा अर्थ हा काय होतो ते आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेतलेल्या आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published.