स्वतःला बदलायचं आहे? मग या १० ठिकाणी शांत राहा… आणि पहा स्वतःमध्ये किती बदल होतो?

Uncategorized

मित्रांनो,आजच्या जमान्यात सगळीकडे गोंगाट, धावपळ आहे. त्यामुळे मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला, तर ते तुमच्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी करते. यामुळे तुमचे मन शांत होते. रागावर नियंत्रण राहते आणि तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होते. आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी शांत राहावे? आणि कोणत्या प्रसंगी बोलावे? त्याचबरोबर शांत राहून आपल्यात कोणता बदल होऊ शकतो? हे सुध्दा आपण पाहणार आहोत.

 

संध्याकाळची वेळ होती. गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलावतात आणि म्हणतात, उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहावे. प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक केली आहे का? पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून, प्रत्येकजण योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुजींकडे परत येतात.

 

गुरु म्हणतात, आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे. ते म्हणतात की या 10 प्रसंगी तुम्ही जर शांत झालात, म्हणजे शांत राहिलात, तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरु होतील. जास्त बोलणे किंवा गप्प बसणे ही चांगली गोष्ट नाही. अति पाऊस किंवा सूर्यप्रकाश, दोन्ही समस्या निर्माण करतात. तसेच विनाकारण बोलल्यानेही खूप नुकसान होते.

 

गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे आणि ASTER तथ्यांशिवाय बोलू नये. गुरु म्हणाले, जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प बसलेलेच बरे. शांत बसल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात. आणि यामुळे ज्ञान वाढते. बोलणे तेव्हाच योग्य असते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते. तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोललात तर तिथे तुमची खिल्लीही उडवली जाऊ शकते. तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच पण लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल.म्हणून अशा ठिकाणी शांत राहा जिथे तुम्गाला काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही. बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात. काय बोलावे तेच कळत नाही पण तरीही ते बोलत राहतात. आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करतात. तुम्हाला त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलू नये. त्यामुळे तिथे गप्प राहण्यातच शहाणपणा असतो.

 

गुरु म्हणाले, दुसरा प्रसंग जिथे मौन राहावे : तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्यांना शब्दांनी दुखवू नका. त्यामुळे तिथे शांत बसावे. दुर्बल व्यक्तीबद्दल काहीही बोलून तुम्ही महान होऊ शकत नाही. कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान व्हाल. अनेकवेळा असे घडते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत राहतात. समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे तो तुला काही बोलणार नाही, पण नेहमी तुम्ही त्याच्या डोळ्यात खुपत राहाल. हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाऊ शकतो. जेव्हा तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करेल. एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही. जर तुम्हाला महान व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिकले पाहिजे.

 

आणि त्याच वेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा. लोकांना असे वाटते की जर ते उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे होतील. तर ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडत राहाल. गुरू पुढे म्हणाले, म्हणून शिष्यांनो, जेंव्हा बोलता तेंव्हा आदराने बोला. जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल. बोलताना भाऊ, ताई, काका, मित्रा असे शब्द वापरा. यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल. आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्ती व्हाल. गुरु पुढे म्हणाले.

 

तिसरा प्रसंग, जिथे व्यक्तीने गप्प राहणे चांगले.जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागावते किंवा तुमचा अपमान करत असते, तेव्हा तुम्ही गप्प राहावे. जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा. जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका, आणि गप्प राहा आणि योग्य वेळेची वाट पहा. तो स्वतः तुमची माफी मागेल, जेव्हा त्याला त्याची चूक कळेल. गुरु पुढे म्हणतात की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागावला असेल आणि त्या वेळी तुम्ही शांत असाल तर ते आदराचे लक्षण आहे. यावेळी कोणीही लहान किंवा मोठा नाही.

 

जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तेथून निघून जाऊ शकता. किंवा गप्प राहा. राग व्यक्त केल्याने आपले नाते बिघडू शकते. नेहमी रागावल्याने राग करणाऱ्या व्यक्तीचेच नुकसान होते. गुरू पुढे सांगतात की, एकदा एक साप जंगलातून पळून एका राजाच्या घरी पोहोचला. लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करत होते. तव्हा तो साप खूप संतापतो. आणि स्वतः घरात पडलेल्या एका तलवारीला गुंडाळण्यास सुरुवात करतो .. त्यामुळे हळूहळू त्याचे संपूर्ण शरीर कापले जाते. त्याचप्रमाणे आपला रागही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत राहतो. रागाचा शेवट ध्यानाने होतो. जर तुम्ही – दररोज ध्यानाला बसलात तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील. गुरु पुढे म्हणतात की, हाच मार्ग आहे.

 

तु दररोज ध्यानाचा सराव कर. यामुळे राग वाढवणारे शरीरातील सर्व हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहतील. ज्यामुळे शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवेल. पण एक मार्ग असाही आहे की, जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता की माझा राग योग्य आहे की नाही? तिथे बोलायचे की नाही? जेव्हा तुम्ही स्वतः याचे आकलन करू शकाल. तेहवा तुम्हाला कळेलकी आपल्याला राग यायला हवा की नाही. तरीही, तुम्हाला राग येत असेल, तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करा. तिथून निघून जा. तुमचे मन शांत होईल.

 

गुरु म्हणाले, चौथा प्रसंग जिथे माणसाने अत्यंत हुशारीने वागले पाहिजे. तिथे तुम्ही गप्प बसले पाहिजे. जिथे तुमचा त्या मुद्याशी संबंध नाही. जर तुमचा कोणत्याही समस्येशी संबंध नसेल, तर तिथे गप्प बसणे आवश्यक आहे. तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्यावर बोललात तर समोरच्याचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही. यात फक्त आणि फक्त तुमचं नुकसान आहे. दोन लोकांच्या वादात अडकू नका. जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांचा वाद मिटवण्यासाठी बोलावत असेल तरच तिथे जा. जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा वादात हस्तक्षेप करू नये.

 

गुरु सांगतात की दहा प्रसंगांपैकी पाचवा प्रसंग जिथे माणसाने अत्यंत हुशारीने मौन बाळगले पाहिजे. तुमच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान होऊ नये. जर तुमचे शब्द इतर व्यक्तीच्या कुटुंबाच्या किंवा मित्रांच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तुम्ही शांत राहावे. एखाद्याच्या कुटूंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल वाईट बोलल्याने तुम्हीच वाईट व्हाल. जे सहज नष्ट होऊ शकते, ते शब्दाने मोठे करू नका. ओरडून न बोलता बोलण्याचा प्रयत्न करत राहावे. जर तुम्ही ओरडल्याशिवाय काहीही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी गप्प राहणेच हिताचे आहे. जास्त बोलण्याने नेहमी गोष्टी बिघडतात.कधी कधी खूप मोठ्याने बोलल्यामुळेही तुटतात.

 

त्यामुळे आवाजात गोडवा आणा. तुमच्या शब्दांनी तुमच्या मित्राचे नुकसान होऊ नये. कधी कधी आपण मित्रांसोबत चेष्टा करतो तेव्हा आपल्या बोलण्याने कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी घ्या. विनोद नेहमी अर्थपूर्ण करा. जिथे कुणी शब्दांनी दुखावला जातो तिथे गप्प बसा. जास्त बोलल्याने नेहमीच नुकसान होते. एखाद्याच्या बोलण्याने दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये.

 

गुरू म्हणतात सहावा प्रसंग जिथे मौन पाळावे. जेव्हा कोणी कोणाचे वाईट करत असेलः जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल, तेव्हा तुम्ही गप्प बसून ऐकून घ्या. आपले मत व्यक्त करू नये. कारण, जो आज तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतो, तो उद्या तुमच्याबद्दलसुद्धा वाईट बोलू शकतो. तुम्ही काही बोललात तर तो माणूस त्याच तोंड बंद करेल आणि हुशारीने काम करेल. विनाकारण बोलणे, कुणाबद्दल बोलणे, चुकीचे आहे. कधी कधी अशा ठिकाणी तोंड न उघडण्यातच शहाणपणा असतो.

 

गुरु म्हणतात की सातवा प्रसंग आहे, जिथे माणसाने मौन बाळगावे. जेव्हा कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही. किंवा समजून घेण्याचा प्रयलही करत नाही. तो तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीसमोर सारलंबगप्प बसावे. कारण, अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखाची पर्वा नसते. अशा लोकांना तुमचे रहस्य सांगून तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. त्यामुळे अश्या व्यक्तीला तुमच्या मनात काय आहे ते सांगू नये. जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुम्ही काय बोलत आहात ते समजू शकत नाही, तुमच्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत, तर अश्या ठिकाणी बोलू नये. कारण, अश्यावेळी तुमचाच विनोद बनेल..

 

जर तुम्हाला असे वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्या भावना योग्य प्रकारे समजून घेत आहे. तुम्ही जे बोलत आहात, ते ता ASTER नीट ऐकत आहे. तरच तुम्ही त्याला त्यांच्या मनातले सांगावे. आठवा प्रसंग जिथे तुम्ही मौन ठेवावे. जेव्हा एखादी व्यक्ती आपले दुःख आपल्यासमोर व्यक्त करते. जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्याचे दुःख किंवा समस्या सांगत असेल.तर याचा अर्थ असा होतो की, तो तुम्हाला स्वतःचा समजतो. अशा परिस्थितीत, त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी, शांत रहा त्याच्या वेदना किंवा समस्या ऐका. त्याचे दुःख किंवा समस्या इतर कोणाला मात्र सांगू नका.

 

तो हे सांगत यासाठी सांगत नाही कि त्याचे प्रश्न सुटतील. तो यासाठी सांगत आहे जेणेकरून त्याची वेदना कमी व्हावी.ER गोष्टी अनेक वेळा सांगितल्याने वेदना कमी होतात. तो कदाचित तुम्हाला त्याचे दुःख सांगत असेल कारण त्याला वाटत असेल की तुम्ही त्याचा मुद्दा समजून घेत आहात. शेअर केल्याने दुःख कमी होते, म्हणून जेव्हा कोणी आपले दुःख तुमच्यासमोर व्यक्त करते तेव्हा तुम्ही शांत राहून त्याचे ऐकून घ्या. त्यामुळे त्याचा त्रास कमी होतो. त्याच्या मनावरील ओझे हलके होते. नववे ठिकाण जिथे तुम्ही शांत राहावे. जिथे दुष्ट स्वभावाचे लोक राहतात, शिव्या देतात तिकडे जाऊ नका.

 

अश्या ठिकाणे शांत राहा. म्हणजेच तुम्ही तुमची प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा. कारण ज्यांची जीभ वाईट असते ते दुष्ट स्वभावाचे असतात. अशा वेळी तुम्ही त्यांना समजू शकत नाही. जेव्हा त्याचे मन पूर्णपणे शांत होईल तेव्हाच तो तुमचे ऐकेल. त्यामुळे अश्या प्रकारच्या लोकांच्यासमोर काहीही बोलू नये. आणि शेवटचा दहावा प्रसंग जिथे तुम्ही थांत रहावे. तुमच्या यशाचे रहस्य सर्वांना सांगू नका. बरेचदा असे घडते की काही लोक ज्यांना खूप लवकर यश मिळते, ते सर्वत्र आपल्या यशाबद्दल बढाई मारु लागतात. अशा स्थितीत काय होते की, अनेकदा काही लोकांना यशाने आनंद होत नाही.

 

जर जर तुम्ही तुमच्या यशाबद्दल जबरदस्तीने लोकांसमोर बढाई मारत असाल, तर लोकांची नकारात्मक ऊर्ज तुमच्यावर परिणाम करु शकते. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लोकांना कळेल की, तुम्ही यशस्वी झाला आहात. बढाई मारल्याने तुमचेच नुकसान होईल.एवढे बोलून गुरु म्हणाले, शिष्यांनो आज मी सांगितलेल्या या दहा गोष्टी जर तुम्ही अंगीकारल्या तर तुम्ही बऱ्याच समस्यांपासून दूर व्हाल.

 

अशाप्रकारे नको त्या ठिकाणी बोलल्याने आपण आपले नुकसान करून घेत असतो. म्हणून योग्य ठिकाणी शांत राहणेच चांगले असते.

Leave a Reply

Your email address will not be published.