मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे. आज श्री गणेशाचा कृपा आशीर्वाद चार राशीवर होऊन या राशीतील लोकांना प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे. यांचे खूप अडकून पडलेले जमीनसंबंधित कोर्टाचा निकाल या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहेत. नोकरी व्यवसायात या राशीतील लोक हे आपली एक वेगळी ओळख निर्माण करतील. नवीन चालू केलेल्या उद्योगांमध्ये भरपूर नफा प्राप्त होऊ शकतो. विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अनेक संधी उपलब्ध होतील त्यात त्यांना यश देखील संपादन होईल. एकूणच आजचा दिवस या राशीसाठी उत्तम राहील. उर्वरीत राशीसाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक ठरेल.
चला तर जाणून घेऊयात पंचांग शास्त्रानुसार कसा असेल आजचा दिवस…..
मेष राशी
तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात परंतु, तरी ही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. कौटुंबिक कार्यक्रमात नवे मित्र जोडले जातील, मात्र मित्रांची निवड काळजीपूर्वक करा. चांगले मित्र हे अनमोल खजिना जपावे तसे असतात. आजच्या दिवशी रोमान्सची आशा धरू नका. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल.
वृषभ राशी
अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. सावधनता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करु शकते. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकतात ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही आपला महत्वाचा वेळ खराब केला. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल.
मिथुन राशी
तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा. तुमची मुलेही घरातील शांतता, सौहार्द, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हा उभयतांमध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हाला दोघांना अनुभवता येईल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. कौटुंबिक आणि महत्त्वाचे कार्यक्रम समारंभ पार पाडण्यासाठी शुभ दिवस. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजुबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. या राशीतील जातक आज रिकाम्या वेळेत रचनात्मक काम करण्याचा प्लॅन बनवतील परंतु, त्यांचा हा प्लॅन पूर्ण होऊ शकणार नाही. आयुष्यातील अनेक चढ-उतारांनंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्णदिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात.
कर्क राशी
अडचणींचा बाऊ करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतीधैर्य खचेल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकतात. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल परंतु, तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल.
सिंह राशी
तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. आज तुम्ही धन संबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतीत राहू शकतात यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला, एकमेकांत गुंफलेले. तुम्ही रिकाम्या वेळचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.
कन्या राशी
तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल – परंतु ते खरे नाही – तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे प्रेम. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.
तुला राशी
दुसºयांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका आणि तसे केले तर गुप्तपणे केल्या जाणाºया तुमच्यावरील शेरेबाजीलाही तुम्ही निष्प्रभ करू शकाल. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला आहे. कामाच्या ठिकाणी इतरांचे नेतृत्त्व करा, तुमचा प्रामाणिकपणा काम करण्याच्या पद्धतीमुळे तुमची प्रगती होईल.
वृश्चिक राशी
आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. तुमच्या जवळचे कुणीतरी अंदाज करता येणार नाही अशा मूडमध्ये असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे/भागादाराकडे दुर्लक्ष केले तर तो किंवा ती नाराज होतील. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा.
धनु राशी
अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. जर तुमच्या व्यस्त दिनचर्येचा नंतर ही आपल्यासाठी वेळ मिळत आहे तर, तुम्ही या वेळेचा सदुपयोग करणे शिकले पाहिजे. असे करून आपल्या भविष्याला तुम्ही सुधारू शकतात. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे.
मकर राशी
तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका नाहीतर तो मानसिक आजार बनेल. दानशूर कार्यात स्वत:ला झोकून द्या व त्यायोगे नकारात्मक विचारावर मात करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका, प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. तुम्ही विनयशीलपणे आणि मदतीच्या भूमिकेतून वागलात तर तुमच्या भागीदाराकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबत ही व्यतीत करू शकतात. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.
कुंभ राशी
धार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज धन लाभ होण्याची शक्यता आहे परंतु, असे होऊ शकते की, आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही पैसा कमावण्यात सक्षम होणार नाही. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. वेळेला पैशाइतपतच असणारे महत्त्व तुम्ही जाणत असाल तर तुमच्या क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. जीवनसंगी सोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही ऑफिस मधून लवकर निघू शकतात परंतु, रस्त्यात अत्याधिक ट्राफिक मुळे तुम्ही असे करण्यात समर्थ नसाल. तुमचे पालक तुमच्या जोडादीराला आज सुंदरशी बेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल.
मीन राशी
तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आजच्या दिवशी चुकून ही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की, तो पैसे परत केव्हा करेल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही – तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही – तुमचे हृदय ठकठक करणार नाही. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणा-या लोकांना तुम्ही वचन द्यााल. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतुट आहे.