आता घरच्या घरी फक्त स्टीलच्या ग्लासमध्ये दुधापासून बनवा कुल्फी कोणालाही जमेल अशी सोप्पी आणि योग्य पद्धत …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो उन्हाळा म्हटला की अंगाची लाहीलाही, एप्रिल महिना म्हणजे तर उकाड्याचा कहरच. या दिवसांत थंडावा देणार आइस्क्रीम आणि कुल्फी म्हणजे शरीराबोरबरच मनाला शांत करण्याचे पर्याय सतत बाहेरचे आइस्क्रीम आणि कुल्फी खाण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीने मलाई कुल्फी केली तर? कमीत कमी वेळात आणि कष्टात तयार होणारी ही कुल्फी खायला तर बाहेरच्यासारखी लागतेच पण घरात स्वच्छतेत केल्याने ती आरोग्यासाठीही जास्त चांगली असते. उन्हाळ्यात कधी सूर्य डोक्यावर असताना तर कधी रात्रीच्या वेळी उकाडा कमी करण्यासाठी आपण आवर्जून कुल्फी खातो.

आणि दुधापासून तयार केली जाणारी ही कुल्फी घरी अगदी झटपट तयार करता येते. विशेष म्हणजे विकतपेक्षा कमी खर्चात होत असल्याने आपण ती मनसोक्त खाऊ शकतो. लहान मुलांनाही आवडणारा हा पदार्थ घरी केल्याने बाधण्याची शक्यताही नसते. आता पाहूयात घरी मलाई कुल्फी कशी तयार करायची. दूध एका कढईमध्ये किंवा पातेल्यात घेऊन 15 ते 20 मिनीटे मध्यम गॅसवर ठेवून उकळावे आणि हलवत राहावे. आणि उकळलेल्या दूधात साखर आणि सुकामेव्याचे काप घालायचे आहेत आणि जर तुम्हाला सुक्या मिळवायचे काप घालायचे शक्य होत नसेल तर अशा वेळी फक्त तुम्ही इलायची ची पावडर एक अर्धा चमचा घालायची आहे आणि त्यानंतर गाठी होणार नाहीत असे हलवत मध्यम आचेवर ठेवावे.

आणि दूध आटवल्यामुळे हे मिश्रण काहीसे घट्टसर व्हायला हवे. कुल्फीचे साचे असतील तर त्यात नाहीतर बाऊल किंवा लहान आकाराच्या ग्लासमध्येही आपण हे मिश्रण घालू शकतो. आणि हे मिश्रण घातलेले साचे 6 ते 7 तासांसाठी फ्रिजरमध्ये ठेवावेत. त्यानंतर ते बाहेर काढल्यानंतर साध्या पाण्यात बुडवून त्याची कुल्फी काढून खाण्यासाठी घ्यावी आणि आपल्या आवडीनुसार वरुन ड्रायफ्रूटस, जेली, केशर असे घातल्यास आणखी चांगले लागते. आणि त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये आपण मँगो, पिस्ता, स्ट्रॉबेरी असे आपल्या आवडीची फळे घातल्यास तसा फ्लेवर येतो.

तर मित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरामध्ये दुधापासून सोप्या पद्धतीने कुल्फी नक्की तयार करून बघा आणि मित्रांनो आपण वर ज्या पद्धतीने कृती केलेले आहे त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्याच प्रमाणात सर्व पदार्थ वापरायचे आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही हा उपाय घरामध्ये करत असताना जे दूध वापरायचे आहे ते ताज वापरायचा आहे म्हणजेच जर तुम्हाला तुमच्या घराजवळच जर म्हशीचे किंवा गाईचे दूध मिळाले तर ते ताजे दूध वापरूनच तुम्ही अशा पद्धतीने कुल्फी तयार करून पहा कारण मित्रांनो आपण जेव्हा या गोष्टीसाठी ताजे दुध वापरतो तेव्हा या कुल्फीचा स्वाद आणखीनच छान बनतो म्हणूनच शक्यतो हा उपाय करत असताना तुम्ही ताजे दूध वापरा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.