कधीही कोणासाठी जास्त प्रेम व्यक्त करू नका .. मला तुझी काळजी आहे हे पण दाखवू नका कारण………

Uncategorized

मित्रांनो,आपण जर एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम व्यक्त करू लागला तर त्या व्यक्तीसमोर आपली किंमत ही कमी होत जाते. ती व्यक्ती आपल्याला इतका भाव देत नाही इतका भाव तू आधी आपल्याला देत असतात. आणि यामुळे आपली किंमत त्या व्यक्तीकडे शून्य होते. म्हणूनच कोणालाही कधीही कोणासाठी जास्त प्रेम व्यक्त करू नये. याचे कारण आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

अश्या लोकांपासून नेहमी लांब राहा, जे कधीही स्वत:ची चूक कबूल करत नाही. आणि प्रत्येक चुकीला तुम्हाला जबाबदार धरतात.सतत लोकांना खुश करायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जसे आहात तसेच राहा. स्वत:वर काम करत राहा, कठोर परिश्रम करा, कष्ट करा.जी योग्य लोक आहेत, ती स्वत:हून तुमच्या आयुष्यात येतील आणि कायमस्वरूपी राहतील.ज्या लोकांना फक्त गरज असताना तुमची आठवण येत असेल तर वाईट वाटून घेऊ नका.

 

स्वतःला भाग्यवान समजा कारण तुम्ही त्या मेणबत्ती सारखे आहात, जी कितीही गडद अंधार असला तरी, पूर्ण परिसर प्रकाशमय करून टाकते.नेहमी अश्या व्यक्तींबरोबर राहात जा, जी तुमच्यामधून Best गोष्टी बाहेर काढेल, Stress नाही.ह्या जगात कोणालाही तुम्हाला Judge करायचा अधिकार नाही.कारण तुम्ही किती संकटे पार करत इथे पोहोचला आहात, हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे लोकांच्या मताला जास्त महत्व देऊ नका.

 

तुम्ही आयुष्यात जे काही कराल, चांगले किंवा वाईट.लोक काहीतरी कुरापत काढून तुमच्याबद्दल Negative बोलतीलच आणि ह्यालाच आयुष्य म्हणतात.तुम्ही जे काही ऐकता त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कारण खोटे सत्यापेक्षा जास्त वेगाने पसरते.नातं टिकवण्यासाठी कधीही भीक मागू नका. ज्याला तुमच्या सोबत राहायचे आहे, त्याचा आत्मविश्वासाने स्वीकार करा.जे फक्त तुमच्यासोबत असण्याचे ढोंग करतात, त्यांना बाजूला सारा.

 

तुम्ही एखाद्यासाठी ९९ चांगल्या गोष्टी करा, आणि त्यांना फक्त एक गोष्ट आठवेल, जी तुम्ही त्यांच्यासाठी केली नाही.आयुष्याचे ३ सोपे नियम

१. तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही, तर तुम्हाला ते कधीच मिळणार नाही.

२. तुम्ही जर विचारलेच नाही, तर उत्तर नेहमी नाही असणार आहे.

३. जर तुम्ही पुढचे पाऊल टाकले नाही, तर तुम्ही नेहमी त्याच ठिकाणी राहाल.

ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही, त्या व्यक्तीवर कधीही प्रेम करू नका.ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही, त्याचा द्वेष करू नका.जी गोष्ट तुम्ही करू शकत नाही, ती बोलू नका. तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टींबद्दल मत मांडू नका.चुकीच्या नात्यामध्ये राहून संसार करण्यापेक्षा. Single राहिलेले कधीही चांगले.कधीही कोणाला जास्त प्रेम, आपुलकी किंवा मला तुझी काळजी आहे हे दाखवू नका.

 

कारण माणसाला कोणतीही गोष्ट फुकट मिळाली, कि त्याची त्याला किंमत राहत नाही.मानसशास्त्र सांगते की, लोकांना माफ करायला शिका.ह्याचा अर्थ असा नाही कि समोरचा माफी साठी पात्र आहे. ह्याचा अर्थ तुमच्यासाठी मन:शांती महत्वाची आहे.तुमचे हृदय म्हणजे टेन्शन आणि दुःख ठेवण्याची टोपली नाही.

ते तर आनंद आणि गोड आठवणींचे गुलाब ठेवण्यासाठी सोन्याची पेटी आहे.

 

अशाप्रकारे हे काही कारण आहे. ज्यामुळे आपण आपले प्रेम कधीही कोणावर जास्त व्यक्त करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published.