रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक चमचा घ्या सकाळी उठल्याबरोबर पोट झटपट साफ : बद्धकोष्ठता, अपचन, पोटात गॅस होणार नाही : आतड्यातील जुनाट घाण झटक्यात बाहेर …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणे, बद्धकोष्ठता, अपचन, गॅस, मळमळ अशा अनेक व्याधींवर एक रामबाण उपाय आज आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो सध्याच्या यांत्रिकी युगामध्ये कष्टाचे काम कमी झाल्याने तसेच बैठे काम वाढत चालल्याने मानवी आरोग्याचा धोका हळूहळू वाढत चालला आहे. त्यामध्ये व्यायामाचा अभाव वेळी अवेळी आहार यामुळे मानवी शरीराचे प्रचंड नुकसान होत चालले आहे. परिणामी प्रत्येकाला विविध व्याधी उद्भवत चालले आहेत.

यामध्ये बद्धकोष्ठता, शौचास साफ न होणे, मुळव्याध, पोटांचे विविध विकार याचबरोबर वर सांगितल्याप्रमाणे अनेक व्याधी तसेच आजाराला सामोरे जावे लागत आहे. मित्रांनो या आजारांवर मात करण्यासाठी आपण पाण्याचा वापर दररोज अधिक करावा जास्तीत जास्त पाणी प्यावे हा एक अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. याचबरोबर जो विशेष उपाय आपण आजच्या या लेखांमध्ये पाहत आहोत तो खालील प्रमाणे..

मित्रांनो या उपायासाठी आपणाला एक मूठभर खिष्मिश/काळे मनुके, अर्धी वाटी दही, चमचा व वाटी इत्यादी साहित्य लागणार आहे. मित्रांनो सुरुवातीला काळे मनुके एक मूठ घेतल्यानंतर ते अगदी बारीक चेचून घ्यावेत. यानंतर हे मनुके एका अर्ध्या वाटी मध्ये दही घेऊन त्यामध्ये टाकावेत. आणि एका चमच्याच्या साह्याने सर्व दही व मनुके हलवून घ्यावेत.यानंतर हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवावे.

आणि हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवल्यानंतर रात्री जेवण झाल्यानंतर झोपायच्या वेळी खाऊन झोपायचे आहे. मित्रांनो लक्षात ठेवा हा उपाय आपण रात्री झोपायच्या वेळी करायचा आहे. आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर हे मिश्रण खाऊन झोपायचे आहे. हा उपाय साधारणतः आपणाला किमान सात दिवस करायचा आहे. या उपायाच्या दरम्यान शक्यतो कोणतेही व्यसन करू नये.

मित्रांनो सात दिवसाच्या या उपायानंतर आपणाला वर सांगितलेल्या सर्व व्याधी बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, चिडचिड अंगदुखी अशा सर्व गोष्टी कमी होऊन मूळव्याध सारखे आजार देखील बरे होतील. मात्र वर सांगितल्याप्रमाणे हा उपाय योग्य पद्धतीने करावा. यानंतर आपणाला हा उपाय आपणास जेव्हा शक्य असेल त्यावेळी दोन महिने सहा महिने अशा कालावधीत अधून मधून करत राहावा. त्यामुळे उद्भवणाऱ्या अशा प्रकारच्या सर्व व्याधी कायमच्या नष्ट होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.