मित्रांनो, अलीकडच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाचेच आपल्या आहाराकडे लक्ष देत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच जंग फु, फास्ट फूडचे तसेच तेलकट, तुटकर अशा पदार्थांचे सेवन अति प्रमाणात केल्यामुळे आपणाला अनेक त्रास सहन करावा लागतो. पोट साफ न झाल्यामुळे आपणाला अनेक रोगांचा सामना देखील करावा लागतो. तेलकट, तुपकट असे पदार्थ खाल्ल्याने आपले पोट साफ होत नाही. मग त्यामुळे अपचन, ऍसिडिटी, पित्त अशा समस्या उद्भव्हायला लागतात. मग आपण बरीचशी आपण औषधे घेतो तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घेतो.
परंतु आपले पोट साफ न होण्याचा त्रास कमी होत नाही. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असे दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुमचे पोट नक्कीच साफ होईल. मग तुम्हाला पित्त, ऍसिडिटी, छातीत जळजळ याचा कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात हे दोन उपाय नेमके कोणते आहे ते. तर मित्रांनो पहिल्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे जिरे. जिरे हे प्रत्येकाच्याच घरी उपलब्ध असते. मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्याला जिरे हे हमखास पाहायला मिळते.
मित्रांनो जिऱ्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने आतड्याला जे काही घाण चिटकलेली असते ती घाण पुढे सारण्यासाठी त्याचा फायदा होतो. जिऱ्यामध्ये असणाऱ्या कॉलोमिल नावाच्या घटकामुळे आपली जी काही आतडी आहे ती आतडे स्वच्छ करण्यास फायदेशीर ठरतात.
तर मित्रांनो तुम्हाला एक चमचे जिरे सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्याच्या अगोदर अनुशापोटी चावून खायचे आहेत. जिरे असे चावून खा की त्याचा चोथा हा आपल्या शरीरात गेला पाहिजे. यानंतर मित्रांनो तुम्हाला एक ग्लास किंवा दोन ग्लास पाणी गरम करून घ्यायचे आहे आणि हे पाणी तुम्ही प्यायचे आहे म्हणजेच घोटघोटभर तुम्हाला हे पाणी प्यायचे आहे. जर तुम्ही एक ग्लास पिणार असाल तर तुम्ही एक ग्लास पाणी गरम करून ते घोट घोटभर पाणी प्यायचे आहे.
जेवढी तुम्हाला तहान आहे तेवढेच पाणी तुम्हाला गरम करून घ्यायचे आहे आणि ते पाणी तुम्ही घोट घोटभर प्यायचे आहे. तर मित्रांनो हा उपाय करीत असताना तुम्हाला हा उपाय बसूनच करायचा आहे. तुम्हाला या उपायासाठी पाच मिनिटे लागतील. तर पाच मिनिटे तुम्ही बसूनच हा उपाय करायचा आहे.
हा उपाय झाल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन मिनिटे वॉकिंग करायचे आहे. वॉकिंग केल्यामुळे तुम्हाला प्रेशर येऊन पोट साफ तुमचे नक्की होईल. पोट साफ झाल्यामुळे आपल्याला कोणत्याही रोगांचा मग सामना करावा लागणार नाही. तर मित्रांनो पोट साफ करण्याचा दुसरा उपाय आता आपण जाणून घेऊया.
या उपायासाठी आपणाला लागणार आहे आलं. आलं हे आपल्या किचनमध्ये सहजतेने उपलब्ध असते. मित्रांनो आलं हे उष्ण असल्याकारणाने त्याचा विशिष्ट आणि योग्य पद्धतीने आपणाला वापर करायचा आहे. आपल्याला एक छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या आल्याच्या तुकड्याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत आणि जे आपण भाग केलेले आहे ते तुकडे तुम्हाला तव्यावर भाजून घ्यायचे आहे.
हे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यामुळे यातील जे काही उष्णता आहे ती थोडीफार कमी होते. आपल्या शरीरातील आतड्यांमध्ये असणारी घाण स्वच्छ करण्यास तसेच शरीरामधील मल रोध करण्यास आल्याचा खूप फायदेशीर उपयोग आल्यामध्ये असणाऱ्या घटकामुळे होतो. तर हे भाजलेले आल्याचे तुकडे तुम्हाला रोज दोन तुकडे चावून खायचे आहेत.
हे आल्याचे तुकडे चघळायचे आहेत आणि नंतर ते चावून खायचे आहेत. चावून खाल्ल्यानंतर तुम्हाला जेवढे सहन होईल तेवढे गरम पाणी करून घ्यायचे आहे आणि एक ते दीड ग्लास तुम्हाला हे गरम पाणी घोट घोटभर प्यायचे आहे. नंतर पाणी पिऊन झाल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन मिनिटे वॉकिंग करायचे आहे. वॉकिंग करून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला शौचास प्रेशर येईल आणि तुमचे पोट साफ होईल.
तर मित्रांनो आलं हे जरासं तिखट असल्याकारणाने तुम्ही त्या आल्याबरोबर छोटासा गुळाचा तुकडा देखील खाऊ शकता. तर मित्रांनो हे दोन उपाय तुम्हाला तुमचे पोट साफ करण्यास नक्की मदत करेल. याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला देखील जर पोट स्वच्छ होत नसेल किंवा पोट साफ होत नसेल मग त्यामुळे अपचन, जळजळ यासारखे आजार जर उद्भवत असतील तर हे घरगुती आयुर्वेदिक दोन उपाय तुम्ही अवश्य करून पहा. याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.